गुरुवार, ३ जुलै, २०२५

2037. आई वडिलांना वेळ द्या

 "मुलगा खूप मोठा अधिकारी झालाय!" गल्लीमधल्या बायका जेंव्हा आहिल्या काकूंना बघायच्या, तेंव्हा हेच बोलायच्या.
काकू फक्त एक हलकीशी स्माईल द्यायच्या आणि चेहऱ्यावर काही क्षणात उदास भाव यायचे... जणू काळजाच्या एका कोपऱ्यात काहीतरी उध्वस्त झालंय.
राघव... त्यांचा एकुलता एक मुलगा, एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत डायरेक्टर होता.
महिन्याला लाखोंचा पगार, आलिशान फ्लॅट, मोठी गाडी, परदेश दौरे, उच्चभ्रू मित्रपरिवार — सर्व काही होतं त्याच्याकडे.
पण आई?
आई अजूनही त्या जुन्याच गल्लीच्या कोपऱ्यातल्या छोट्याशा घरात एकटीच राहायची.
एक खोली, एक स्वयंपाकघर, आणि काही अपूर्ण आठवणी...
राघव अनेकदा म्हणायचा,
"आई, आता इथे राहून काय उपयोग? माझ्याकडे चल ना — AC, नोकर-चाकर, गाडी — काहीच कमी नाही."
आई हसायची आणि म्हणायची,
"बाळा, या भिंतींमध्ये तुझं बालपण दडलंय. इथे तू पहिली सायकल चालवलीस, इथे तापात रात्रभर बसले होते. या घराशी तुझं अस्तित्व जडलेलं आहे… मी ते सोडू शकत नाही."
राघवला ते समजत नव्हतं.. कदाचित समजून घ्यायचं नव्हतं.
तो दर महिन्याला पैसे पाठवायचा, एक कामवाली ठेवली होती, मोबाईल पण दिला होता..
पण आई फोन करत असताना अनेकदा फक्त एकच उत्तर मिळायचं..
"आई, मी मीटिंगमध्ये आहे... नंतर बोलतो."*
आई फोन ठेवताना फक्त एवढंच म्हणायची,
"ठीक आहे बेटा... वेळ मिळाला तर बोल."
काही महिन्यांनंतर...
शेजारी राहणाऱ्या सुमन आत्यांनी एक दिवस पाहिलं, काकूंच्या घरातून आवाजच नाहीये.
दार ठोठावलं, पण काही प्रतिसाद नाही.
दार उघडलं... आणि पाहिलं.. काकू जमिनीवर पडलेल्या होत्या.
तडक हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर म्हणाले,
"ब्रेन स्ट्रोक आहे... फारच गंभीर स्थिती आहे. काही तासांचा प्रश्न आहे. कुटुंबाला बोलवा."
सुमन आत्यांनी राघवला फोन लावला —
"बाळा, आईची तब्येत खूप खराब आहे... लवकर ये."
राघव क्षणभर शांत राहिला.
आणि मग गडबडीत फ्लाईट पकडून थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला.
काकू  ICU मध्ये होत्या. नाकात ऑक्सिजनची नळी, मशिणींची बीप आणि वातावरणात एक गारठा.
राघव आईच्या हाताशी बसला, तिचा थरथरता हात धरून म्हणाला —
"आई... आई... मी आलोय. माफ कर मला... खूप बिझी होतो... पण तुला कधी विसरलो नव्हतो..."
आईने डोळे हळूहळू उघडले. खूप थकलेले होते, पण मुलगा दिसताच ओठ थरथरले...
हळू आवाजात म्हणाल्या —
"फक्त... पाच मिनिटं हवी होती... संपूर्ण आयुष्यात..."
...आणि त्या क्षणाला मशीनची बीप सरळ झाली...
राघव तसाच बसून राहिला. हात हातात होता — पण आता तो हात थंड पडलेला होता... कायमचा.
😭😭
दुसऱ्या दिवशी, राघवने आईच्या जुन्या खोलीत पाऊल टाकलं.
प्रत्येक कोपरा आठवणींनी भरलेला होता.
एक जुनी पेटी उघडली, त्यात एक डायरी सापडली.
पहिल्या पानावर लिहिलं होतं:
"राघव मोठा अधिकारी झालाय.
आता त्याच्याशी बोलण्यासाठी ‘वेळ ’ लागतो.
मी वाट बघतेय... मी आई आहे ना..."
राघव धायमोकलून रडला.
त्याला पहिल्यांदाच जाणवलं..
ज्या "वेळेची"ची आई वाट बघत होती,
तीच वेळ आता त्याला आयुष्यभराचा पश्चात्ताप देऊन गेली.
"आई फक्त अन्नच नाही शिजवत तर मुलाच्या आयुष्यालाही आकार देते.
पण जर मुलगा एवढा मोठा झाला की आईसाठी वेळच मिळत नाही..
तर मग त्या यशाचं काय अर्थ?" 😔✍️💯

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...