बुधवार, १६ जुलै, २०२५

2052. शेवटचा फोन

      पावसाळा नुकताच सुरू झाला होता. शहराच्या रस्त्यांवर वाफाळता धुरकटपणा, सिग्नल्सवर वाजणारे हॉर्न्स आणि ऑफिसमध्ये धावपळ. या सगळ्याच्या मधोमध संजय नावाचा तरुण एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होता. हातात आयफोन, चेहऱ्यावर घाई आणि कानावर सतत ईअरफोन.
“हो सर, मी मेल पाठवला आहे...प्रेझेंटेशन उद्या तयार राहील...”
त्याचे दिवस आता घड्याळाच्या काट्यावर चालत होते. सकाळी ८ ची मिटिंग, दुपारी रिपोर्टिंग, संध्याकाळी क्लायंट मीटिंग, आणि रात्री घर.
त्याच्या आयुष्यात आता फार कमी माणसं होती. बायको, एक लहान मुलगा आणि वडील  जे गावी राहत होते.
त्याचे वडील शंकरराव...साठीतले, निवृत्त शिक्षक. एका लहानशा गावात, जुन्या वाड्यात एकटे राहत होते. संजयला त्यांना शहरात आणायचे नव्हते. “इथे एवढं टेंशन आहे, आणि त्यांना इथे काही समजणारही नाही. त्यांचं राहणं वेगळं, आपलं वेगळं,” तो बायकोला म्हणायचा.आणि त्यांना ही गावीच बर वाटायचं. फक्त अधून मधुन लेकाने फोन करावं अस मात्र त्यांना वाटायचं. संजय ला मात्र कामातून वेळच नसायचा. त्या दिवशी संध्याकाळी संजय ऑफिसमधून थेट घरी आला. घरात टीव्ही सुरू होता, मुलगा मोबाईलवर गेम खेळत होता. बायकोने सांगितलं,
“आज बाबांचा फोन आलेला. तुझ्याशी बोलायचं होतं म्हणाले.”
“अरे काय सारखा फोन करत बसतात. इथ कामातून कुठे सुधरतय मला वेळ मिळाला की करेन फोन” असं म्हणून त्याने मोबाईल बाजूला टाकला आणि काही क्षणांतच कामात गुरफटून गेला.
-
दुसऱ्या दिवशी सकाळी 
संजय ऑफिसमध्ये होता. लंच ब्रेकमध्ये जेवण करताना त्याला एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. आवाज थरथरत होता:
“शंकरराव...तुमचे वडील...आमच्या हॉस्पिटलमध्ये आहेत...रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांनी कोणाचाही नंबर दिला नाही, पण खिशात एक चिट्ठी सापडली... त्यावर तुमचं नाव आणि नंबर होता.”
संजय सुन्न झाला. त्याचे हात थरथरायला लागले. शब्द बाहेर येईनासे झाले.
“कसं झालं?”
“उन्ह्यात चालत चालत आले असावेत. रक्तदाब खूप कमी आहे. वयही बरंच झालंय. सध्या ICU मध्ये आहेत, पण बघा, शक्यता फार कमी आहे.”
---
हॉस्पिटलच्या दारात जेव्हा संजय पोहचला, तेव्हा रुग्णालयात पावसाची थोडी थोडकी सर होती. अंगणात एक जुनं झाड, खाली एक रिकामी खुर्ची आणि ICU चे दरवाजं. शंकरराव तिथे शांतपणे झोपलेले होते. चेहऱ्यावर अशक्तपणा, पण शांततेची एक विलक्षण छाया. डोळे हळूच उघडले. संजय दिसला.
बाबांनी डोळे उघडले, संजयला पाहिलं… ओठ हलले —
"फोन...रोज वाट बघायचो…फक्त एकदा 'कसा आहेस बाबा?' हे ऐकायचं होतं."
त्यांच्या हातातील पकड हळूहळू सैल झाली आणि एक श्वास, जो अनेक आठवणी घेऊन निघून गेला…
संजयला वाटून गेलं काल फोन केला असता तर.
---
पश्चात्ताप
संजय तसाच बसून राहिला. वडिलांचा हात हातात धरून. डोळ्यातून ओघळणारे अश्रू ओठांवर पोहचू शकत नव्हता. उद्या फोन करू असा विचार करणारा फोन आता त्याला कधीच करता येणार नव्हता. बापाचा फोन बंद झाला होता. आयुष्य कितीही यशस्वी झालं, तरी आईवडिलासाठी वेळ नसेल तर माणूस यशस्वी नाही, केवळ श्रीमंत होतो.
"आईवडील कधीच काहीच मागत नाहीत. त्यांना फक्त तुमचा थोडासा वेळ हवा असतो किती ही व्यस्त असलात तरी आई वडिलांना बोलण्यासाठी तरी वेळ काढा." फक्तं बाबा कसे आहात एव्हढ ही तुमचं बोलण त्यांच्यासाठी संजीवनी असते कधी कधी वेळेची कमी नसते. आपुलकीचीच उणीव असते. आईवडिलांचं प्रेम फक्त "हवे तेव्हा" आठवायचं नसतं, ते रोज जपायचं असतं…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...