शाळेत गुरूंनी सांगितलं होतं —
"आईच्या पदरावर निबंध लिहा..."
मग एक विद्यार्थ्यानं लिहिलं...
"आईच्या पदरावर..."
संपूर्ण वाचाल, तर मन भरून येईल...
"आईच्या पदरावर निबंध लिहा..."
मग एक विद्यार्थ्यानं लिहिलं...
"आईच्या पदरावर..."
संपूर्ण वाचाल, तर मन भरून येईल...
आदरणीय गुरुजी,
"आईचा पदर" ही तिच्या मातृत्वाची, तिच्या गरिमेची एक सुंदर छाया होती.
आईचा पदर चुलीवरून गरम भांडी उतरवण्यासाठी उपयोगी यायचा.
आईचा पदर मुलांचे घाम, अश्रू पुसण्यासाठी, घाण झालेले कान, तोंड साफ करण्यासाठी वापरायचा.
मुलं जेवून झाली की, आईच्या पदराने तोंड पुसण्यात एक वेगळाच आनंद असायचा.
कधी डोळ्यात काही गेले की, आई पदराचं छोटं गोळं करून त्यावर फुंकर मारून डोळ्यावर ठेवायची,
आणि जादूसारखं दुखणं थांबायचं.
आईच्या कुशीत झोपणाऱ्या मुलांसाठी तिची कुशी गादीसारखी
आणि आईचा पदर चादरीसारखा असायचा.
कोणी अनोळखी पाहुणा घरी आला, तर मुलं आईच्या पदरामागे लपायची.
मुलांना जेव्हा लाज वाटायची, तेव्हा ते आपलं चेहेरं आईच्या पदराने झाकायचे.
जेव्हा बाहेर कुठे जायचं असे, तेव्हा मुलं आईचा पदर घट्ट धरून ठेवायची.
तोच पदर त्यांना वाट दाखवायचा –
तेव्हा वाटायचं की, आईचा पदर हातात आहे म्हणजे सारं विश्व आपल्या हातात आहे.
थंडीमध्ये आई आपल्या पदराने मुलांना चारही बाजूंनी लपेटून उब द्यायची.
आणि...
पावसात आईचा पदरच छत्री बनायचा.
आईचा पदर कधी अंग पुसण्यासाठी वापरला जायचा,
कधी झाडावरून पडलेली फुलं किंवा जाबूक गोळा करण्यासाठी.
कधी अनाज, दान, प्रसाद बांधून आणण्यासाठी...
आईचा पदर घरात वस्तूंवरची धूळ साफ करण्यासाठीही उपयोगी पडायचा.
कधी काही हरवलं की, आई पदराला गाठ मारायची आणि म्हणायची — “सापडेल...”
आणि खरंच, ती वस्तू सापडायची.
आईचा पदर म्हणजे
एक चालतं-फिरतं बँक लॉकर —
कधी कधी मुलांच्या नशिबाने त्या बँकेतून एखादी चॉकलेटची नाणीही मिळायची.
आईचा पदर काही जादूच होती.
अशी जादू जी आजची पिढी कदाचित समजू शकणार नाही.
आता जीन्स घालणाऱ्या "Mom"
पदर कुठून आणतील...?

साडी नेसणाऱ्या त्या आईंच्या पदराला समर्पित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा