तीन वर्षांची तुलसी आपले छोटे छोटे हात जोडून विठ्ठलाला नमस्कार करत होती आणि चांगली बुद्धी दे अश्या बोबड्या बोलाने तिने त्याला सांगितले आणि तिथला छोटा झाडू घेऊन जसे जमेल तसे देऊळ स्वच्छ करू लागली. येणारे जाणारे कोतुकाने पाहत होते आणि कसे व्हायचे या पोरीचे म्हणून देव दर्शन घेऊन जात होते तुलशीला सगळे तुलशी म्हणत ती हे ऐकून नुसतीच गोड हसे,तिला यातले काहीच कळत नव्हते हळूहळू तुलशी विठ्ठलाची परम भक्त झाली.
रोज देऊळ झाडणे, फुले गोळा करणे त्याचा हार करणे, जमेल तशी भक्ती गीते गाणे असा दिनक्रम तिने आखून घेतला होता,येणारा जाणारा प्रत्येक जण हळहळत असे कसं होणार या मुलीचे करण तुलशी होतीच तशी.
अत्यंत काळी ,उंचीला कमी. तुलशीला रोज हे ऐकून ऐकून पाठ झाले होते पण ते असे का म्हणतात हे मात्र कळाले नव्हते.एके दिवशी एक बुआ कीर्तन करत होते त्यात काळ्या विठ्ठलाचे वर्णन ते करू लागले. त्याची मनापासून भक्ती केली तर तो कसा भक्तांना प्रसन्न होते हे ते सांगत होते आणि त्यांच्याजवळ एक फोटो होता. त्यात तुलशीला तिचे प्रतिबिंब दिसले आणि मग तिच्या लक्ष्यात आले लोक रोज असे का म्हणतात ते.
दुसरे दिवशी पासून तिने लोकांना सांगून टाकले मी काळी आणि तो विठ्ठल पण काळा तो माझ्याशी लग्न करेल तुम्ही कोणी माझी काळजी करू नका.लोक हसून तिची चेष्टा करू लागले आता तर तिने ध्यासच घेतला लग्न करेन तर विठ्ठलाशीच.
तिने विठ्ठलाला साद घालायला सुरवात केली रात्रंदिवस ती अखंड नामस्मरण करू लागली.हळूहळू तिच्या अंगातले त्राण कमी होऊ लागले सगळे तिला नाद सोडायला सांगू लागले पण व्यर्थ.
इकडे विठ्ठलाने रुक्मिणीला सांगितले मला धरतीवर ताबडतोब जावे लागेल माझा भक्त माझी आठवण काढतो आहे रुक्मिणी म्हणाली चला जाऊ पटकन विठ्ठलाने मनाई केली.बायकांचा स्वभाव मुळातच संशयी मग रुक्मिणी कशी सुटेल तिने प्रश्नांचा भडिमार करायला सुरुवात केली.
ती आहे का तो आहे? पणविठ्ठलाने काहीच सांगितले नाही इकडे तुशी शेवटच्या घटका मोजू लागली विठ्ठलाचे लक्ष उडाले. भक्ताला असे पाहणे त्याला जमेना तो धावत आला. तो पर्यंत तुलशीचे सगळे अंग थंड पडले होते. तिचा प्राण फक्त तिच्या टाळूत होता केसातून तो बाहेर पडणार इतक्यात देवाने तिचे केस वरच्यावर धरले.
त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याचे थेंब तुलशीच्या डोक्यात पडले आणि त्याच्या मंजिऱ्या झाल्या.देवाने तुलशीला सांगितले तूं माझी खरी भक्त आहेस. तू सदैव माझ्या जवळ राहशील. तू तुझ्या भक्तीने माझ्या हृदयात स्थान मिळवले आहेस.
माझ्या अश्रूंच्या ज्या मंजिऱ्या झाल्यात त्यातून तुळस उगवेल तुझ्या नावाची आणि इथून पुढे मंजिऱ्या असेलेलाच तुळशीचा हार मला घातला जाईल आणि तूं माझ्या अखंड सहवासात राहशील युगानुयुगे तेंव्हापासून कायम विठ्ठलाला मंजिऱ्या असेलेलाच हार घातला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा