पत्नीच्या निधनाला आता पंधरा दिवस झाले होते. लोकांचं येणं-जाणं बंद झालं होतं. तो एकटा बसून जुन्या आठवणींमध्ये हरवून गेला होता. तेवढ्यात त्याला पत्नीने लिहिलेलं एक पत्र सापडलं. पत्रात लिहिलं होतं.
प्रिय पतीदेव,
मला कळून गेलं आहे की मला कर्करोग झालाय. तोही शेवटच्या टप्प्यावर. आणि हेही ठाऊक आहे की आता माझे फारच थोडे दिवस उरले आहेत. मला हेही माहीत आहे की तुम्ही माझ्या उपचारासाठी तुमची सगळी बचत खर्च केली आहे, सगळे दागिने विकले गेलेत, आपण ज्या प्लॉटसाठी इतकी मेहनत घेतली होती, तोही माझ्या आजारपणात गमावला. हे सगळं तुम्ही मला सांगितलं नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की मला काही समजत नाही.
मी तुमची अर्धांगिनी आहे. बारा वर्ष तुमच्या सोबत घालवले आहेत. तुमचा चेहरा पाहूनच मला कळतं की तुम्ही कशा अवस्थेत आहात.
पण माझी मजबुरी बघा.
मी तुमचे अश्रूही पुसू शकत नाही.
तुम्ही एकटे असताना रडता,
तेव्हा मी लपून पाहते…
आणि मग मीही रडते.
ह्या निर्घून जीवनाने आपल्याला कोणत्या वळणावर आणून उभं केलं आहे…
एकमेकांचं दु:खही वाटून घेऊ शकत नाही…
अश्रूही पुसता येत नाहीत.
तुम्हाला वाटतं की तुम्हाला रडताना पाहून मी खचून जाईन…
आणि मीही हेच नको म्हणते की तुम्ही खचून जाऊ नका.
किती परकी झालेय ना मी आता…
तुमचं दु:ख काय आहे, हे विचारता पण येत नाही.
सध्या अनेक ओळखीचे, नातेवाईक भेटायला येत आहेत.
बहुतेक मी आता दोन दिवसांची पाहुणी आहे…
बहुधा माझी यात्रा आता संपत आली आहे.
हे कसलं बोलावणं आहे…
ज्याची मला आधीच कल्पना आहे.
मरणाची भीती वाटत नाही मला…
भिती आहे तर फक्त ह्याची
की तुम्ही माझ्याविना कसं जगाल?
संध्याकाळी घरी आलात की मला शोधता…
पण आता मी घरात सापडणार नाही.
घट्ट मनाची तयारी ठेवा.
माझी आठवण पुसून टाकणं फार अवघड जाईल, हे माहीत आहे.
मी दोन दिवस माहेरी गेले तरी तुम्ही माझ्यामागे मागे यायचे..
आणि आता तर कायमचं बोलावणं आलं आहे.
हात आणि साथ दोन्ही सोडून चालली आहे…
पण तुम्ही खचू नका.
आपली मुलं अजून लहान आहेत.
त्यांना सांगू, "आई देवाजवळ गेली आहे, लवकरच परत येईल."
माझ्या गेल्यानंतर रडू नका…
मन घट्ट करा.
तुम्ही नेहमी म्हणायचात ना,
"तू किती भित्रट आहेस, प्रत्येक गोष्टीला रडतेस."
आता बघा,
तुमची बायको किती मजबूत झाली आहे!
मरणासमोर उभी आहे…
रात्रंदिवस दुखणं सहन करतेय…
पण अजिबात रडलेली नाही.
आपला प्रवास फार छोटा राहिला,
पण आता साथ देता येणार नाही.
इतकं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद…
माझे सगळे नखरे सहन केल्याबद्दल धन्यवाद…
माझ्यावर मनापासून प्रेम केल्याबद्दल धन्यवाद…
माहीत आहे,
तुम्हाला माझी सवय लागली आहे.ल
मला विसरणं अवघड आहे…
पण तुम्ही स्वतःला सावरायलाच हवं.
मी दररोज वरून पाहत राहीन.
वेळेवर अंघोळ करा,
वेळेवर जेवण करा…
कारण हे सगळं आठवण करून देण्यासाठी तुमची बायको आता नसेल.
आता मी नसेन,
आळस करणं सोडून द्या.
मी होते तेव्हा तुम्ही घरच्या सर्व जबाबदाऱ्यांपासून मोकळे होता.
तुमचीही मुलासारखी काळजी घ्यावी लागायची…
पण आता ते मुलासारखं वागणं सोडून द्या.
आता रुसणंही सोडून द्या,
कारण तुम्हाला मनवण्यासाठी तुमची पत्नी नसेल.
आता तुटणंही सोडून द्या,
कारण तुम्हाला धीर द्यायला तुमची पत्नी नसेल.
अरे आयुष्या, तुझ्या प्रवासात इतकं दुःख का असतं?
ज्यांना जगायची इच्छा नाही.. त्यांची वाट खूप लांबवतोस तू…
आणि ज्यांना खरंच जगायचंय.. त्यांचे श्वास इतके कमी का असतात?
आता लिहिता येत नाही…
हातात त्राण नाही राहिलं...
तरीसुद्धा लिहितेय,
कारण गेले दोन दिवस तुम्ही झोपलेले नव्हतात,
आज गाढ झोपलात,
मला लिहायला वेळ मिळाला.
पण आता लिहिणं थांबवते…
थोडंसं तुम्हाला डोळे भरून पाहायचंय..
कळत नाही सकाळ होईल का,
आणि मी डोळे उघडेल का…
आज शेवटचा वेळ,
तुमच्या हातांची उशी करून झोपायचंय..
तुमच्या छातीवर कान ठेवून,
तुमच्या धडधडत्या हृदयात हरवून जायचंय..
.....
हे पत्र केवळ कथा नाही,
तर एका स्त्रीचा तिच्या नवऱ्याविषयी असलेला "हातात हात घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत साथ देण्याचा" प्रेमळ, धीरगंभीर आणि असामान्य प्रेमाचा हृदयविदारक दस्तऐवज आहे.✍️💯
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा