"आजोबा तुम्हाला कश्याचातरी कॅन्सर झाला न, तुम्ही आता खूप दिवस राहणार नाही न".....पाच वर्ष्याचा नातू हे बोलून गेला आणि आजोबा पुरते खचले....किती खचावं ...तर ते भीतीने थरथरू लागले...अचानक मोठ्याने रडायला लागले....त्यांना असं रडताना पाहून मुलगा ,सून काळजीत पडले...शांत होण्यासाठी नाना प्रयत्न केले पण काही केल्या ते शांत होईना...डॉ ना बोलावलं....शेवटी त्यांना झोपेचं इंजेक्शन दिलं आणि ते झोपले...ते उठेपर्यंत सगळ्यांनाच काळजी वाटत होती...ते उठले तेव्हा समोर धक्कादायक आणि मजेशीर प्रकार दिसला.. नातवाने त्याचा छोटा प्लास्टिकचा टेडीबेअर ताम्हणात पाण्यात ठेवला होता...आजोबांना उठलेललं पाहून तोच आनंदानं म्हणाला, "आजोबा बघा मी तुमच्यासाठी टेडी पाण्यात ठेवला...तुम्हाला लवकर बरं वाटावं म्हणून... मी टीव्ही त पाहिलंय कुणी आजारी असेल तर अस पाण्यात ठेवतात...टीव्ही त बाप्पा ठेवला होता...माझ्याकडे बाप्पा नाही न मग मी टेडी पाण्यात ठेवला"....आजोबांनी त्याला जवळ घेतलं...मुका घेतला त्याचा...रडावं की हसावं त्याच्यासमोर हे त्यांना सुचेना..
पण कॅन्सर या शब्दनेच ते मनातून खूप रडत होते...हे सगळं दृश्य सूुन बघत होती..तिने मुलाला बाहेर पाठवलं आणि आजोबांजवळ जाऊन बसली...विचारपूस केली..काय हवं नको विचारलं...आजोबांना विचारायचं होतं सूनेला कॅन्सर बद्दल ..पण धाडस झालं नाही..सूुनेवर पण त्यांचा विशेष जीव होता ..पण आता एकूणच सगळं बिनसलं होत...ते जर रुसलेच तिच्यावर....तिला त्यांची या वयातली मानसिक अवस्था लक्ष्यात येत होती....तिनीही हलकेच हसून दिलं...
कॅन्सर शब्द ऐकल्यापासून आजोबा तसे अबोल झाले होते, जेवणातही फरक पडला होता...किमान आठवड्याने नातवाने आजोबांकडे एक भन्नाट कल्पना मांडली..."आजोबा, आपण आपल्या देवघरातले सगळे बाप्पा बाथटब मध्ये ठेऊयात का ...म्हणजे शॉवर सुरू केला की सगळे बाप्पा पाण्यात ...मग तुम्ही लवकर बरे व्हाल".... दोघांमध्येही स्तब्धता होती....मग तोच रडवेला चेहरा करून म्हणाला ,"आजोबा मला करमत नाही तुमच्याशिवाय ....तुम्ही बाप्पाकडे जाताना सांगा..मी ही येईन ...प्रॉमिस"....आजोबांच्या डोळ्यातून धारच वाहिल्या ...काय प्रॉमिस देणार होते ते...आणि कुठलं प्रॉमिस...या प्रॉमिस चा अर्थ तरी त्याला कळत होता का.??.....आता मात्र आजोबा मनातून हलले...याचं हे वेड डोक्यातून काढणं गरजेचं आहे ,हे त्यांना पाहिल्यादाच जाणवलं..
ते म्हणाले , "प्रॉमिस"...आणि त्यांनी धूम ठोकली...आजोबा प्रचंड अस्वस्थ...पण धिटाईने सूनेकडे गेले....म्हणाले, "बेटा खरं सांग...मला कॅन्सर आहे न ..मग का लपवलस माझ्यापासून"....सुनेनं आजोबांचा हात हातात घेतला ..म्हणाली, "बाबा कॅन्सर असण्याने काय फरक पडतो...आहे ते दिवस आनंदाने जगायचे आणि समाजाला आनंद द्यायचा हे तुम्हीच सांगता न....आपल्या संस्थेचे हेच वाक्य आहे न...किती लोकांना तुम्ही तुमच्या शब्दांनी उभारी दिलीय आणि आज मृत्यूला घाबरताय."...."हो बेटा शब्द सोपे असतात हे आज कळलं..अनुभव कठीण असतो"..."नाही बाबा, मनात आणलं तर तुम्ही यावरही मात कराल....तुमच्या शब्दनेच उभारी घेऊन मी तुमच्या अंध मुलाशी लग्न केलं..
ते उपकार म्हणून नाही तर समाजच देणं लागतं म्हणून..मी खुश आहे ...नव्हे कणखर झाले तुमच्या शिकवणीत" ..."पण मी का खचतोय...???...यावर उत्तर मला सापडत नाहीये..आणि जेव्हा हा पाच वर्ष्याचा नातू म्हणतो मलाही सोबत यायचं तेव्हा आतडे तुटतात माझे"...."बाबा असं म्हंटल्याने असं घडत नसतं...पण आज एक महत्वाची गोष्ट सांगते जी मी तुमच्यापासून लपवलीय....तुम्हाला तुमचं मरण येईपर्यंत तुमच्या नातवा समोर आनंदानच जगावं लागेल...कारण त्याचाही तुम्ही श्वास आहात...बाबा,...बाबा...त्यालाही कॅन्सर आहे...दत्तक घेताना हे माहिती होत आम्हाला पण तरी आम्ही त्याला घेतलं...त्याच्या उरलेला आयुष्यात आनंद पेरण्यासाठी...तोही काही दिवसांचाच सोबती आहे"......
**
आजोबांनी नातवाला जवळ बोलावलं.. म्हणाले , "बेटा तुझी आयडीया आवडली मला ...आपण देव्हाऱ्यातले सगळे देव बाथ टबमध्ये ठेऊ ..शॉवर खाली ...म्हणजे देव पाण्यात...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा