शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

1364. अनमोल

      एक उच्चशिक्षित नवरा आपल्या बायकोला एके दिवशी समजावून सांगत होता की तु पैसे कमावून बघ आणि मग तुला कळेल की पैसा कसा खर्च करावा. मी तुला आज एक दिवस देतो घराच्या बाहेर निघ आणि बघ किती स्पर्धा चालू आहे. काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी. ती ही एक शिक्षित बायको, एक आई आणि एक सून होती. ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली. खुप माहिती घेतली आणि घरी आली. दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे सासू सासरे यांना वेळेला नाश्ता जेवण, मुलांचा डबा, वेळेला शाळेत पाठवणे, नवऱ्याला डबा, त्याचा आवडीचा नाश्ता जेवण बनवले आणि खोलीत गेली. नवरा म्हणाला आज कळाले असेल मार्केट मध्ये किती स्पर्धा चालू आहे. पैसे कमावणे किती अवघड आहे पण तू फक्त घरात बसतेस. तिने एक स्मित केले आणि एक लिस्ट  त्यांच्या हातात दिली. त्यात तिने घरात  घालवलेले अनेक वर्षे  आणि घरातील कामाचे  मार्केट मध्ये जी किंमत मोजली जाते त्याचा ताळेबंद दिला. नवऱ्याला एकदम घाम फुटला ज्यावेळेस त्याने वाचायला सुरुवात केली.
१.  मुलांचा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणे ज्याला मार्केट मध्ये Baby sitting म्हणतात.
Salary Rs.15,000/-
२. घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि घर काम करणे, ज्याला मार्केट मध्ये Maid म्हणतात.
Salary Rs 10,000/-
३. सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक, ज्याला मार्केट मध्ये Cook म्हणतात.
Salary Rs.10,000/-
४.घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार, ज्याला मार्केट मध्ये Host of the Guest बोलतात.   
Salary Rs.15,000/-
५. इत्यादी इत्यादी
     असा तिने नवऱ्याकडे महिन्याचा Rs.50,000/ - पगार या हिशोबाने वर्षाला सहा लाख रुपये आणि गेल्या २५ वर्षाचे दिड कोटीची  मागणी केली. मग त्याचे डोळे खाडकन उघडले. ज्या व्यक्तीने स्वतःचा  कणभरही विचार न करता  माझ्या घराला वेळ दिला, ज्याची किंमत मार्केट मध्ये शोधूनही न मिळणारी होती. तात्पर्य एवढेच की ज्यावेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खुप विचार करुन सगळं काही करत असते. तिला माहिती असते आज जर आपण आपल्या मुलांना सोडून फक्त बाहेर काम करण्याचा विचार करू त्यावेळेस वेळेअभावी आपल्याच मुलांचे भविष्य अंधारात लपलेले असेल. कारण एक आई चांगले संस्कार मुलांना देऊ शकते चांगले लक्ष देऊ शकते.🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...