शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

1359. मानसिक डाएट

      ही कन्सेप्ट जरा नविन आहे, पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे. "तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो"  मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का? बघू या. मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल. स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते. मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीचं असते. तर मानसिक डाएट म्हणजे काय करायचं तरं आपले विचार आधिकाधीक फिल्टर्ड कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा. तेलकट-तुपकट म्हणजे फडतुस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही. अती-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसर्याला विसरुन जाणारे विचार आपण जवळ येऊ देणार नाही. दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करु. दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकुन देऊ. आठवड्यातुन  एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ. या अशा मुल्यशिक्षणा बरोबरंच महत्वाचं आहे ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकं ओळखुन स्वत:ला "रीझनेबल" बनवणं. दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं. दुसर्‍यांना वेळ देणं, संवाद चालु ठेवणं.  मनाचं वातावरण नेहमी हलकं फुलकं ठेवणं. एकमेकांच्या अस्तित्वाची जाणिव ठेवणं आणि बरंचकाही.
       या सगळ्यातला समतोल हरवला ना की आपल्या नात्यांना अपंगत्व येणारंच आणि मग नीट डायग्नोसीसंच झालं नाही म्हणुन मनाला कायमची बेडरेस्ट पण मिळु शकते. माणुस आहे, मनं पण थकतं हो कधीकधी. त्याला इंस्टंट एनर्जी मिळते ती फक्त एक कप काॅन्फिडन्सच्या चहाने वाह ताज ! सगळ्यात महत्वाचं कि आपल्या डाएटचे साईड इफेक्ट्स खुप मस्त असतातं. लोकं प्रेमात पण पडु शकतात तुमच्या.  तुमच्या चेहर्‍या वरचा ताण कमी होतो, तुम्ही यंग वाटू लागता, टेंन्शन कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्न इतकंच हलकं होतं.  वास्तविक, मन ओके असेल तरचं लाईफ ओके असतं, नाही कां? असं ह्या डाएट चं व्रत.  हे आजच्या सॅन्डव्हिच जीवनशैली मधे एक संजीवनी देईल हे नक्की. साध्या आणि ताज्या विचारांच सॅलड आपली नक्की काळजी घेईल. शाकाहारी विचार लंबी ऊम्र देऊन जातील. बदल हा नेहमीच चांगला असतो. असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकतं आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...