सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

1328. संतुलन Balance

     आज बऱ्याच दिवसांनी परत गप्पा मारण्याचा योग आला. आपल्या या गप्पांमध्ये माझे विचार पटायलाच हवेत असा काही आग्रह नाही. याउलट मैत्री मध्ये मतभेद हे हवेच फक्त त्याचे रूपांतर वादात व्हायला नको. म्हणजेच काय तर संतुलन बिघडायला नको.
         हल्ली एकत्र कुटुंब नसल्या मुळे आणि त्यातही आईवडील दोघं काम करणारे आसल्याने एकत्र कुटुंब पद्धति मध्ये मिळणाऱ्या बऱ्याच सुखांपासून मुल वंचित झालेत. परंतु ठीक आहे. अस असल तरी जगातल्या प्रत्येक आईला असच वाटत की जास्तीत जास्त वेळ मी माझ्या मुलांसोबत घालवावा. परंतु आर्थिक सथैर्य, मुलांचे उज्वल भविष्य यासाठी तीदेखील बाहेर पडली. तरीही २४ तास एक Guilt तिच्या सोबत असतो किं काहीतरी कमी पडतंय का?आपण हवा तेवढा वेळ मुलांना देत नाहीत का? आणि मग त्या अपराधी पणा मधुनच सुरू होते तो अपराधी पना भरून काढण्याची आईवडिलांची धडपड. नकळत छोट्या छोट्या तडजोडी दोघंही करायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ मुलांच्याच आवडीचे टीव्ही वर कार्टून चॅनल पहाणे, मुलांच्याच्च आवडीचे जेवण बनवणे. जो रंग मुलीला आवडतो त्याच् रंगांचे कपडे, वस्तू तिला घेऊन देणे etc. थोडक्यात मुल म्हणतील तस वागणं सुरू होतं वेड्या प्रेमापोटी आणि तिथेच कुठेतरी बिघडत संतुलन.
    हल्ली साधारण एक किंवा दोनच मुल आसल्याने प्रत्येकाला राजकुमार यादव किंवा राजकुमारी सारखी वागणुक घरात मिळायला सुरुवात होते आणि हिच मुल मग आई बाबाना आमच्यासाठी वेळ नाही या नावाखाली  हवं ते करुन घेण्यास सुरुवात करतात. हट्टी बनतात. परंतु त्यांना मिळणारी उत्तम लाईफ स्टाईल ही दोघांच्या बाहेर जाऊन काम करण्याच फळ आहे हे पालकांनी वेळीच त्यांच्या वयाला समजेल अशा भाषेत पटवून सांगायला पाहिजे. तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकता पण सगळच नाही  हे त्यांना वेळीच समजायला आणि पटायला हव.
ज्या मुलांना अशी खास वागणुक घरी मिळते म्हणजे आवडीचच खान, आवडीच्च घालन, आवडीचच पाहणं या गोष्टींची सवय होते ती मुल जेव्हा प्रौढ बनतात कोणीतरी वेगळी व्यक्ती त्यांच्या ok आयुष्यात येते. वेगळी मत घेऊन, वेगळी आवड घेऊन. तेव्हा त्यांना ते स्वीकारणं आतिषय कठीण जात. माझ्या मता पेक्षा वेगळी  मत कोणाचं आसू शकत हे त्यांना पचवता येत नाही. कारण आई बाबा नी त्याच्या वरील प्रेमापोटी आणि अपराधीपणामुळे ते व्यक्तच केलेलं नसत . तसेच ही मुल एवढी आत्मकेंद्री म्हणजे स्वार्थी होतात की समोरचा व्यक्ती कुठल्यातरी त्रासात आहे ही गोष्ट त्यांच्या पर्यंत पोहचतच नाही. हि मुल समोरच्या व्यक्तीला समजुन घेण्यात कमी पडतात आणि  जीवन संतुलन बिघडण्याची शक्यता निर्माण होते.
     हल्ली शैक्षणिक यश हाच एखाद्या मुलाला किंवा मुलीचया योग्यतेचा करण्याचा पाया बनला आहे. म्हंजे असं अभ्यासात खुप हुषार असणारी पण आतिशय उर्मट आणि उद्धट मुल आपण आजूबाजूला पाहतो. शैक्षणिक क्षेत्रा मध्ये बरीच वर्ष घालवल्याने अशी बरीच मुलं मुली पहिली आहेत जी अभ्यासात उत्तम आसूनआपले शिक्षक आणि मित्र यांच्याशी आतीशय उद्धट पणे वागतात. मी चुक असुच शकत नाही हा आविर्भाव त्यांच्या मध्ये येतो आणि मग तिथेच संतुलन बिघडते. त्यामुळं लहानपणीच कुठ थांबायचं आणि कुठ मुलाला थांबवायचं हे समजून घ्यावं.  मी इतरानपेक्षा वेगळी आणि सरस आहे आस जेव्हा व्यक्ती समजायला लागते तिथेच त्याची प्रगती थांबते. यश आणि अपयश या पालिकडेही जीवन आहेच की हे वेळीच समजायला हवं. पुर्वी ३-४ मुल असायची प्रत्येकाला सर्वसामान्य वागणुक घरात मिळायची. हव्या असणाऱ्या चार गोष्टी मधून एक गोष्ट मिळायची. अभ्यासात हुशार असणार मुल इतर भावंडाना, मित्रांना मदत करायचा. पालक सर्व मुलांवर एक सारखेच बारीक लक्ष ठेवीत. पण attention देत नसत. बारीक निरिक्षण आणि attension यामध्ये खुप फरक आहे आणि परिणामा मध्येही. पालकत्व हि कुणी कोणाला शिकवू नाही परंतु केवळ अनुभवातून काही उमगल ते तुमच्यासमोर व्यक्त केलं. सगळ बरोबरच असेल असं काही नाही. पोटच्या मुलासमोर माणूस किती हतबल असत हे माहीत का नाही कोणाला? परंतु भान हरपायला नको. वेळीच सावरायला हवं इतकच. एकमेकांचे  कमजोरी होण्यापेक्षा शक्ती शाली आधार बणुयात  😊
इतके महाग म्हणजे कठीण बनू नका की मुल अडचणीमध्ये असताना तुमच्या कडे येऊ शकणार नाही. आणि एवढे स्वस्त बनु नका की मुल पालकांच्या प्रेमाला तुडवून जाईल. दोन टोका मधला मध्य म्हणजेच संतुलन. नाही का?😊
धन्यवाद.

वैशाली धोंडगे 
पिंपळे सौदागर
पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...