शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

1361. तुम्ही मुलीचे बाप आहात का?

तुम्ही बाप आहात का? 
मुलीचे बाप आहात का? 
मग एवढं जरा ऐकाल का? 

तुमच्या मुलीला तुम्ही 
बाकी काही शिकवू नका. 
पण, एक मात्र करा. 
विनेश फोगाटची गोष्ट तिला सांगा. 

तुमची मुलगी नापास झाली 
तरी हरकत नाही. 
'नीट' वा 'नेट' फेल झाली ती 
तरी बिघडत नाही. 
विनेश कळल्यावर मात्र 
तिचं काही अडत नाही ! 

चौकात आली ती तरी 
शिट्ट्या मारल्या जातील
बसमध्ये तिला 
धक्क्यावर धक्के बसतील

कॉलेजात तिच्याकडे 
त्याच नजरेने पाहिले जाईल
ऑफिसातही तिचे 
संख्याशास्त्र मापले जाईल...!

या सगळ्यापेक्षा वेगळी 
ओळख आहे आपली, 
हे तिला कधी कळू द्या.

शरीराच्या पल्याड जाणारी 
खरी 'आयडेंटिटी' 
आधी तिला मिळू द्या ! 

येणार्‍या नवरात्रात, 
तिला सांगू नका कथा पुराणातल्या.
दुर्गा अथवा त्या मालिकेतल्या.
तिला सांगा गोष्ट विनेशच्या पराक्रमाची.
नराधमांना तिने अद्दल घडवल्याची...!

खरी महिषासुरमर्दिनी अशी असते.
ती थोडा वेळ गप्प दिसते.
पण, बोलू लागते, 
तेव्हा तुमच्या छाताडावर बसते.
पाय रोवून उभी राहाते 

आणि, 
पळता भुई थोडी करते. 
इथली हरेक पोर होईल
विनेश फोगाट
तेव्हा 'माणूस' होईल 
प्रत्येक पुरूष मोकाट!

'तिला' भुलवण्याचा प्रयत्न आता 
तरी ते थांबवतील का? 
अशी पैलवान बहीण या 
लाडक्या भावांना पेलेल का?  

- संजय आवटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...