शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

1360. इतरांना त्रास

      एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला. त्याचा सह-प्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच, पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल. राज्याच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला. हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राज्याला विनम्रपणे म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."     
राज्याने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले. कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली. थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला. त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला "पहा. पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."   
प्रवाशी हसून म्हणाला "महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज."
 
📍तात्पर्य : 
जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही, तोपर्यंत इतरांच्या त्रासाची कल्पना येत नसते. त्यामुळे असे वागावे की, दुसऱ्याना त्रास होऊ नये. सध्याचा घडीला समाजात बरीच जहागीरदार किंवा आयतं काहीतरी भेटलेल्या जीवावर दिमाख दाखवणारी माणसं शक्यतो अशापद्धतीने कसंही वागतात. गरिबांना गरजूंना आपल्यापेक्षा दुबळ्याना काय त्रास होईल याचा विचार करत नाहीत. मग एकदिवस देव आशा लोकांना कर्माने चांगलं होरपळून टाकतो. त्यामुळे जे कोणी असाल इतरांना त्रास होणार नाही असे वागत चला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...