एक एक पेशन्ट आत येत होता, मी त्याच्याशी बोलत होतो. मुळात मी मनसोपचारतज्ञ, म्हणजे पेशन्ट आणि त्त्यांचे नातेवाईक यांच्याशी बोलणे, त्यान्च्या मनातील शंका, भीती, काळजी दूर करणे, त्यान्च्या मनाला स्पर्श करणे आणि मग थोडे औषधीपचार करणे हे माझे काम. गेली वीस वर्षे मी करतो आहे. माझे नाव साऱ्या शहरात झाले आहे. अनेक डॉक्टर्स मानसिक उपचारासाठी माझे नाव सुचवतात. माझ्या हसत हसत बोलण्यामुळे आणि पेशन्टच्या मनात घुसण्याच्या पद्धतीने असेल माझेकडे सतत पेशन्ट येत असतांत अगदी अपॉइंटमेंट घेऊन. आजचा दहावा पेशन्ट विमलने आत पाठविला,रत्नाकर विजयकर. दोघे नवरा बायको आत आली. आत येण्यापासून माझे बारीक निरीक्षण असते. रत्नाकर हसत हसत आले आणि त्यान्च्या पत्नी सुमतीताई टेन्शनमध्ये दिसल्या. दोघे समोर बसले. त्यान्च्या मुलीने सांगलीहून त्त्यांची अपॉइंटमेंट घेतली होती. मी केसपेपर पाहिला. रत्नाकर वय अंदाजे पंचांहत्तर. रेल्वे मधून निवृत्त. त्त्यांचे रिपोर्ट्स पाहिले. ब्लड प्रेशर आणि शुगर दोन्ही होते. बायपास झाली होती. मी दोघांकडे पाहत म्हनालो.
"बोला, विजयकर"
त्त्यांची पत्नी केंव्हापासून माझ्याशी बोलण्यासाठी उत्सुक दिसत होती. ती पहिल्यांदा बोलली.
"डॉक्टर, माझ्या नवऱ्याला विस्मरण होते हो. त्याची काळजी वाटते. काल ते आमच्या घरातील कुत्राचे नाव विसरले.
तेव्हड्यात विजयकर म्हणाले "कुत्र्याचे नाव विसरलो, तुझे नाव नाही विसरलो 'आणि मोठ्याने हसायला लागले. मी त्यान्च्या विनोदाला हसलो.
"डॉक्टर, हे हसण्यावरी घेतात. पण हल्ली ते बऱ्याच गोष्टी विसरतात. म्हणजे त्या दिवशी आपली स्कुटर त्याना आठवेना. ATM चा पिन विसरतात. मला भीती वाटते हो, कदाचित ते मला विसरतील.' मी मोठ्याने हसलो पण मनात म्हंटले ही कदाचित स्मृतिभ्रश ची सुरवात पण असेल. मी सुमतीबाईंना म्हणालो
"अहो, असं काही नसतं. तसे पंचांहत्तर वर्षे झाली की माणूस थोडेफार विसरतो. आपण दुसऱ्या विचारात असतो काहीवेळा ब्लड प्रेशर वाढले असेल तरी किंवा व्हिटॅमिन्स डिफिशान्सी असेल तरी होतं. तुम्ही घाबरू नका. तुमची मुले कुठे असतांत?
"मुलगा दिल्लीला आणि मुलगी सांगलीला '.
"हो हो, तुमच्या सांगलीच्या मुलीनेच अपॉइंटमेंट घेतलेली दिसते.'
"ओके, मी सांगतो त्या काही टेस्ट करून घ्या. सिटी स्कॅन वगैरे आणि मी गोळया लिहून देतो. त्या आजपासून चालू करा. दुसरे त्याना स्कुटर चालवू देऊ नका. एक महिन्या नंतर माझी अपॉइंटमेंट देऊन ठेवतो त्या दिवशी हे सर्व रिपोर्ट आणा' ती मंडळी गेली.
एक महिना होतं आला आणि पुन्हा सांगलीहून सीमा विजयकर (माहेरचे नाव ) हिने माझी अपॉइंटमेंट घेतली. तिने रात्री मला माझ्या वयक्तिक मोबाईल वर फोन लावला.
सीमा -डॉ, बाबा हल्ली बऱ्याच गोष्टी विसरतात. त्यामुळे आई फार काळजीत आहे,
मी -उद्या क्लिनिक मध्ये येणार आहेत ना, तेंव्हा पहातो.
सीमा -डॉ सर्व रिपोर्ट्स मी मेलने पाठवते तुम्हाला.
मी -ओके, ते पण पहातो.
सीमा -डॉ हे आता वाढत जाणारं आहे का?
मी -असच काही नाही, औषधने पण आटोक्यात येत, मी उद्या पहातो. दुसऱ्या दिवशी रत्नाकर विजयकर आणि त्त्यांची पत्नी क्लिनिक मध्ये आली.आत येतानाच माझ्या लक्षात आले, विजयकरांची नजर बदलली आहे.
सुमतीताई -डॉ यांचे विस्मरण वाढले आहे. दोन दिवसापूर्वी आमच्या बिल्डिंग ते विसरले आणि दुसऱ्या बिल्डिंग मध्ये घुसत होते.
मी -होय, तुमच्या मुलीने काल फोन केला होता. यांचे रिपोर्ट्स तिने पाठवलेत. मी पाहिलेत ते. तुम्ही त्याना एकटे कुठे पाठवू नका आणि त्यान्च्या मेंदूला थोडा थोडा व्यायाम हवा म्हणून शब्दकोडी त्याना सोडवू दे किंवा जुन्या आठवणी लिहायला सांगा. म्हणजे मेंदूला व्यायाम होतो. श्लोक मोठ्याने म्हणू दे. मी औषधे बदलून देतो. मेंदू मध्ये काही घटक कमी होतात, त्याची भरपाई होईल. त्यान्च्या आजूबाजूला राहा, एकटे सोडू नका, त्यान्च्या किल्ल्या एका पर्स मध्ये ठेवा म्हणजे गहाळ होणार नाहीत. बघू तीन चार महिन्यांनी किती फरक पडतो आणि महत्वाचे तुम्ही शांत राहा कारण तुमची मुले बाहेरगावी आहेत त्यामुळे तुम्ही त्यांच्या केअरटेकर आहात. दुसरे म्हणजे ते जे विसरतात ते मुद्दाम करत नाहीत हे लक्षात ठेवा, तो त्त्यांचा आजार आहे. त्यावर उपचार सुरु आहेत. ती मंडळी गेली. सर्व रिपोर्ट्स पाहून विजयकरांची डिमेनशिया म्हणजेच विसमरण या आजाराची सुरवात झाली आहे हे माझ्या लक्षात आले.
पुन्हा तीन महिन्यांनी विजयकर आणि त्यांची मुलगी सीमा क्लिनिकमध्ये आली.यावेळी सुमतीताई आल्या नव्हत्या.
मी -काय म्हणतात विजयकर? आणि आई नाही आली?
सीमा -आईला अलीकडे बरे नसते. तिच्या छातीत धडधडत असते. तिची ट्रीटमेंट सुरु आहे, म्हणून मी आले तस सांगली आणि पुणे लांब नाही.
मी -आईची काळजी घे. शेवटी तूझ्या बाबांची काळजी चांगल्या प्रकारे तीच घेऊ शकते.
सीमा -डॉ बाबांना आता कधी थोडे आठवते कधी नाही. केंव्हा सर्वाना ओळखतात. मी नाटकात काम करते ना, म्हणून माझ्या नाटकाची, सहकालाकारांची चौकशी करतात, नाटकातले सवांद म्हणायला सांगतात पण कधी अनोळखी माणसासारखे पहात राहतात. माझ्या तीन वर्षाच्या मुलीला पण ओळखत नाहीत. या सर्वांचा त्रास आईला होतो आहे, तिची झोप उडाली आहे.
मी - साहजिक आहे. काय आहे सीमा. डिमेनशिया हा आजार तूझ्या बाबांना झाला आहे, गाडी घसरगुंडीला लागली आहे. त्याला छोटे छोटे ब्रेक लावणे सुरु आहे एव्हडेच.
सीमा -डॉ मी काय म्हणते, आईला बाबांकडे लक्ष देणे हळूहळू जमत नाही. म्हणून मी या दोघांना माझ्या घरी सांगलीला नेले तर? मी इथे जास्त काल राहू शकत नाही कारण माझे सासरे पण आजारी असतांत. नवरा सतत फिरतीवर असतो. म्हणून ही दोघ सांगलीला आली तर मी व्यवस्थित लक्ष देईन.
मी -तसे करू नका. कारण तुमच्या नाटकाच्या भाषेत सांगायचे म्हणजे नेहेमीचे नेपथ्य असेल तर स्टेज वरील कलाकार चुकत नाहीत, अडखळत नाहीत पण नेपथ्य बदलले तर ते अडखळतात. तसेच तुमच्या वडिलांची स्थिती आहे. या वेळी त्याना थोडी थोडी आठवण आहे, थोडे ते विसरत असले तरीही. म्हणून या वेळी त्त्यांचे नेपथ्य म्हणजे परिसर, वातावरण बदलले तर ते अडखळतील, त्याचे जास्त प्रॉब्लेम सुरु होतील. म्हणून सध्या तरी त्याना येथेच राहूदे.
"बर" म्हणून सीमा आपल्यावडिलांना घेऊन गेली. चार महिन्या नंतर पुन्हा सीमा विजयकर अपॉइंटमेंट घेऊन आणि आपल्या वडिलांना आणि भावाला घेऊन आली. मी तिच्या भावाला प्रथमच भेटत होतो. एक खरे दोन्ही भावंडे हसतमुख आणि स्मार्ट होती. मी विजयकरांकडे पाहिलं. त्यांची नजर शून्यात होती. नेहेमी माझ्याशी हसणारे, ओळख दाखवणारे विजयकर मला ओळखत नव्हते. माझ्या लक्षात आले, डिमेंशिया ने पुरता कब्जा घेतला होता. मी त्यांचा हात हातात घेतला, त्यात घट्टपणा नव्हता.
मग अजित विजयकर बोलू लागला -डॉ, बाबांची परिस्थिती तुम्ही पहाताच. त्याच्यात सुधारणा नाहीच. तुम्ही नु्रॉफीजीशिन कडून तपासणी करून घेतली होतीच पण आम्ही मुंबईत नेऊन पुन्हा सर्व तपासण्या केल्या. त्याचे हे रिपोर्ट.
मी सर्व रिपोर्ट पाहिले. आमच्या पुण्याच्या नु्रॉफीजीशिन चे आणि मुंबईच्या नु्रॉफीजीशिन चे रिपोर्ट सारखेच होते.
मी -ठीक, त्या रिपीर्ट मध्ये काहीच फरक नाही.
अजित -डॉ, दोन महिण्यापुर्वी आमची आई गेली.
मी -काय?
अजित -बाबांच्या काळजीने गेली. ते तिला ओळखत नव्हते, म्हणूंन तिची शुगर वाढली, प्रेशर वाढले. शेवटी गेली.
मी -अरेरे..
अजित -डॉ.मी दिल्लीत राहतो. माझे मोठे घर आहे. मी भारत सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंट मध्ये मोठा ऑफिसर आहे. माझी पत्नी नोकरीं करत नाही. माझा दहा वर्षाचा मुलगा आहे. म्हणजे छोटे कुटुंब आहे. माझी इच्छा आहे की बाबांना माझ्या म्हणजेच त्यान्च्या घरी न्यावे. मी आणि माझी बायको त्त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ, तुमचे काय मत आहे?
मी -हरकत नाही.
एव्हड्यात त्याची बहीण सीमा बोलायला लागली
सीमा -डॉ दादा म्हणाला, बाबांना दिल्लीला नेतो तरी त्याना दिल्लीची हवा मानवणार नाही. दिल्लीत उन्हाळा कडक असतो आणि थंडी फार असते. पूर्वी बाबा बऱ्याच वेळा गेले आहेत दादाकडे. त्याना दिल्ली आवडायची नाही. म्हणून मी दादाला म्हणते, मी त्यांना माझ्या घरी सांगलीला नेते. माझे घर गावाबाहेर आणि मोठे ढाकले आहे. आणि मी घरीच असते. माझ्या लेकीला पण आजोबा फार आवडतात, तेंव्हा मी त्यांना माझ्याचाकडे नेते, पण हा ऐकतच नाही.'
अजित -कसे आहे डॉ, माझे शिक्षण बाहेरगावी जास्त झाले. त्यामुळे मला बाबांचा फरसा सहवास मिळालाच नाही. मला असे वाटते माझ्या मुलाला पण आजोबांचा सहवास काही काळ तरी मिळावा. नाहीतर त्याला मोठी माणसे कशी मिळतील?
एव्हड्यात सीमा काही बोलू पहात होती, तिला थांबवत आणि माझे डोळे पुसत मी बोलू लागलो
"अजित, सीमा तुमच्यासारख्या सेन्सिटिव्ह मुलांना जन्म दिला हे तुमच्या आईवडिलांचे भाग्य. खरतर डॉक्टरनी कुठल्याही पेशन्ट मध्ये भावनिक अडकायचे नसते. मी पण अडकत नाही. पण तुम्ही दोघांनी मला इमोशनल केलत.
सध्या कुणीही म्हाताऱ्या आणि आजारी आईवडिलांची जबाबदारी घेत नाहीत. दुसऱ्या भावंडणे ती घ्यावी अशी अपेक्षा ठेवातात. पण तुम्ही दोघेही त्याना आपल्या घरी नेण्याचा हट्ट धरता, हे क्वचित आहे. असेच राहा. तुमचा हा आदर्श मी माझ्या इतर पेशन्टना सांगेन. सीमा, तू मागे तूझ्या आईबाबांना सांगलीत नेण्या संबधी विचारले होतेस, तेंव्हा मी तूझ्या नाटकाच्या भाषेत म्हणालो होतो "यावेळी नेपथ्य बदलू नकोस कारण कलाकार बदललेलंय नेपथ्यने अडखळतील.' पण आता परिस्थिती अशी आहे की, आपल्या कलाकाराला नेपथ्य असले काय, नसले काय आणि बदलले काय. काही फरक पडत नाही, त्याच्या पलीकडे ते गेले आहेत. तुम्हांला वाटेल तिकडे त्यांना घेऊन जा.
अजित -पण डॉ, यावर काही उपाय?
मी -प्रत्येक आजारावर रिसर्च सुरूच असतो.आपण आशा करूया तोपर्यंत काही चमत्कार होईल.
मी विजयकरांना थोपटले आणि पुढील पेशन्ट साठी बेल वाजवली.
लेखक -प्रदीप केळूसकर 9307521152/9422381299
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा