मुलं मोठी झाली आपापल्या मार्गी लागली की आपण मोकळं. असंच वाटतं ना? पण नाही. खरं तर त्यानंतरच खरे प्राॅब्लेमस् सुरू होतात. सगळी आपापल आयुष्य जगू लागतात..आणि मग घरातील स्त्री परत एकटी पडते.
मीरा एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली. बी ए शिकलेली, त्याचबरोबरीने मराठी इंग्रजी टायपिंगही येत होतं. नव्वदच्या आसपासच्या काळातील...फक्त पुढे पुढे शिकत रहायचं,कुणी मार्गदर्शक नाही, त्यामुळे पदवी नंतर जिथे मिळेल तिथे नोकरी केली. मग तेविस चोविसाव्या वर्षी लग्न. त्यानंतर संसार,दोन लेकर. पुढे त्यांचं शिक्षण, घरातील छोटेमोठे प्रश्न, वादविवाद ,सण समारंभ यातच पंचवीस वर्षे कशी निघून गेली कळलं सुद्धा नाही. काळ्यावर आता थोडी चांदी चकाकू लागली होती. मुलांची शिक्षण पण जवळजवळ झाली होती, या सगळ्या गदारोळात मीराला स्वत:कडे बघायला वेळ मिळाला नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष झाले. आरशात पाहिलं की तिला जाणवे शरीर बऱ्यापैकी सुटलेल,चेहरा काळव़ंडलेला, केसांची चांदी झालेली. ड्रेस,ब्लाऊज यांची मापच विस्कटलेली. सतत काळजी मुळे हाय बीपी च्या गोळ्या सुद्धा सुरू झालेल्या. म्हणजे एकंदर सर्वसामान्य मध्यमवर्गीय बाईचं जगणच मीरा जगत होती. बरं, सर्व सामान्य म्हणजे फक्त आचारविचारा बरोबर आर्थिक बाजू ही येतेच.
खर्चांवर नियंत्रण ठेवून,मुलांचे सर्व खर्च, घरखर्च,यानंतर जे उरते त्यातून इतर खर्च यात मीराचा स्वत:चा असा जास्त खर्च नव्हताच, कधीतरी आयब्रो किंवा कापडचोपड. त्यातून थोडंफार इकडेतिकडे देणं होई. मग सेव्हींग तरी काय आणि किती करणार??त्यातूनही जशी जमेल तशी फुल ना फुलाची पाकळी बाजूला ठेवावी इमर्जन्सी साठी हे पिढीजात संस्कार, त्यामुळे तेच बाजूला काढून ठेवलेले कधीतरी कामी येतात. मनाची समजूत घालायची आणि पुढे जे येईल त्याला सामोरं जात जात पंचवीस वर्ष संसार सुरळीत चालू आहे असंच म्हणायचं. एकतर नवऱ्यावर अवलंबून,तो देईल त्यात आनंदी रहायचं, एक मात्र खरं मीराने कधी हात पसरला नाही किंवा एवढंच हवं तेवढंच हवं असा हट्टी पणाही नाही. जितक हातात येई त्यातच व्यवस्थित संसाराची नाव चालवली. जे प्रत्येकच स्त्री करत असते. आता मूल मोठी झालीत,शिक्षण आटोपली की नोकरी धंद्याला लागतील मग तेवढाच जास्तीचा हातभार लागेल, थोडीफार आवक वाढल्याने आपल्यालाही आपल्या हौशीमौजी पूर्ण करता येतील. मीरा ला वाटू लागलं "अभी अपना समय आयेगा". जबाबदाऱ्याही संपतील, मैत्रिणींसोबत फिरु,मनासारखी शाॅपिंग वगैरे करू,स्वत:चं थोडंफार मेकओव्हर करू,आता जरा लक्ष देऊ स्वतः वर.
पुरूष रिटायर्ड झाले की कसे आपापले गृप करतात, पिकनिक पार्ट्या करतात, पण हेच जर बाईने केलं तर लगेच तीला नाव ठेवतात. काय तर म्हणे सुटली आता. घराची काळजी नाही. भटकायला मोकळी. पण एवढे वर्ष संसारगाडा हाकत होती ..मरमर मरत होती, तेव्हा नाहीत ते कौतुक केलंत. तीने आयुष्यभर जुंपुनच घ्यायचे का? नाही, अजिबात नाही, मीराने ठरवले. मूलांना सांगून घरातील कामांना बाई ठेवायची आणि आपण मोकळे व्हायचे. पण कससचे काय !
म्हणतात ना गुण नाही पण वाण लागतो. मूल मोठी झालीत आता. कामाला लागलीत,आपापलं कमवून निभावू लागली. पण पॅकेजच्या नावाखाली सतत नोकऱ्यांची धरसोड चालू आणि आणखी त्यात भर काय तर स्कोपच नाही काय म्हणून इकडं तिकडं करत रहायचं... समाधान काय असतं ते ठाऊकच नाही मुळी. बरं समजवायला जावं तर तुला काय कळतं त्यातलं? पेमेंट जरी पाच आकडी असला तरी यांना काय ते satisfaction नाही, खर्च पण एवढे वाढलेत ना की महिना संपेपर्यंत ठणठणाट, त्यात पार्ट्या,पिकनिका असतातच आणि परत महागाई किती वाढलीय? हे कारण दिलं की बोलायला काही शब्दच उरत नाही. वरून वाद नकोत म्हणून आपणच गप्प बसायचे.
मीरा समजून चुकली, मूलांना जन्म दिला, त्यांना शिकवल,मोठ केलं त्यांना त्यांच्या पायावर उभ केल की आपला कार्यभाग संपला. ते आपलं कर्तव्य होत .असंच समजून आपण असंच आयुष्य रेमटवत रहायचं का? प्रत्येकवेळी याच्यावर त्याच्यावर आपण का रहावं अवलंबून? तसही मुलांना जन्म दिला म्हणून परत त्यांच्या वर जबाबदारीच ओझ का? जे आपण केलं तेच परत त्यांच्या नशिबी का? हे चक्र असंच चालू ठेवायचं?? कुणीतरी नविन सुरवात करणं महत्त्वाचं आहे ना.
मीरान ठरवलं आपण जर स्वत: या मायापाशात अडकून राहिलो तर पुढंच आयुष्य पण असंच जाणार संसारगाडा हाकण्यात, कुणीही आपल्याला असं म्हणणार नाही," जा मीरा जी ले तू भी तेरी जिंदगी,😌तेव्हा आपल्यालाच ये मोहजाल के बंधन तोडके अपनी खुशियां धुंडनी पडेगी. मग काय ,एक दिवस मीरा सकाळी उठली मस्त आलं घालून चहा करून घेतला आणि बाल्कनीत खुर्ची टाकून मन सोक्त निसर्गाचा अस्वाद घेत चहा प्यायली. ऑनलाईन मागवलेला ट्रेक सुट चढवला,शुज घातले आणि माॅर्निंग वाॅकला निघून गेली. खूप लांबवर फेरफटका मारून घरी परतली, आज तिला छान मोकळ मोकळ वाटत होतं. दारात मुकेश, तिचा नवरा उभाच होता वाट बघत,थोडा वैतागलेला, पण मीराला पाहूनक त्याला आश्चर्याचा धक्का बसला,काहीतरी बिनसलय,पण काय? हा गोंधळ त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मीराने त्याच्याकडे पाहिलं, हसली," फ्रेश होऊन येते, जरा बोलायचंय". एवढंच बोलून घरात निघून गेली. मूल उठून नाश्त्याची वाट पहात बसली होती, आई आज वेगळीच वाटत होती दोघांनी एकमेकांना पाहून खांदे उडवले.
मीराने चहा गरम केला, कपांमध्ये ओतला (सर्वांसाठी) आणि डायनिंग टेबलवर बसली,तीने मुकेशलाही बसायला सांगितले. मीरा बोलू लागली," आई आणि पत्नी म्हणून माझी जी कर्तव्य आहेत ती मी आजपर्यंत व्यवस्थित पार पाडलीत. आज पर्यंत मी फक्त मशीन प्रमाणे काम करत राहिले, तुम्हाला काय हवं नको ते साग्रसंगीत पुरवलं. आता मला वाटतं थोडा माझ्यासाठी वेळ द्यावा. माझे छंद,आवडीनिवडी जोपासाव्यात. सन्यास तर मी घेऊ शकत नाही 😄 पण आता बरीचशी तूमची काम तुम्ही स्वतः करावीत. जसे तुमचे कपडे धुणे (मशीन तर आहेच) इस्त्रीला देणे, जेवण झाल्यावर मागचं आटपणे, घरातील वस्तूंची बाजारहाट, स्वत:च्या खोल्या आवरणे. बाकी स्वयंपाक तर मला करणं भाग आहेच पण त्यासाठी एखादी मदतनीस मी ठेवणार तीचा पगार देणं आलंच. शिवाय बाकी साफसफाई साठी पण बाई ठेवावी लागणार तीचे वेगळे पैसे. भरपूर विचाराअंती हा निर्णय मी घेतलाय. आणि हे मी विचारत नाही तर सांगतेय. "धीस इज माय फायनल डिसीजन,"
मुलं व नवरोबा आवासून फक्त मीराचा बदलेला अवतार,तिचं बोलणं,तिचं वागणं बघत होते. रोजची मीरा पहाटे उठून झटपट इकडे तिकडे धावणारी, अवतारात असलेली, सगळ्यांच सगळच व्यवस्थित आवरून देणारी वेगळी आणि ही आजची मीरा पूर्णपणे बदललेली. जणू सारं काही स्वप्नवतच वाटत होतं. " तू तर घरातच असतेस ना? काय काम असतं ग तूला? हे डायलाॅग मारणारे आता स्तब्ध झाले होते. गाडीचं एक चाक पंक्चर झालं की गाडी कशी डगमगते तसं काहीसं मुकेशला वाटू लागलं." का वागतेय ही अशी? त्याने स्वत:लाच चिमटा काढून पाहिला..आआआ..."अरे बापरे स्वप्न नाही हे"
मग काय झालं असेल? खूप विचार केला त्याने,गत पंचवीस वर्षांचा आढावा घेतला. आणि मग त्याला उपरती झाली कि खरंच आपणही नोकरी काम पैसा यातच हरवून बसलो. मुलांची शिक्षणं घरच्या साऱ्या जबाबदाऱ्या, पाहुणे, सणसमारंभ याच नियोजन करणं ते पार पाडणं, त्यातून घरातील कामे, घरातल्यांची आजारपण हे सर्व तर मीराच बघत होती. आजपर्यंत ती निगुतीने सर्व करत आली. या पूर्ण प्रवासात आपण काय केलं? तर तिला फक्त गृहीत धरलं.सर्व तिच्यावर सोडून आपण मोकळे झालो, ती घर सांभाळत होती आपण मात्र मित्रांसोबत मजा करत होतो. लग्न झाल्यावर फिरायला गेलो तेवढंच नंतर वर्षातून एकदा गावाला जातो..पण तिथेही मीराचं रांधावाढा उष्टी काढा हेच असायचं, कधीही असं वाटलं नाही कि मीराला पण थोडा आराम हवा थोडी मोकळीक हवी..थोडी स्पेस हवी..ती तर स्वतः कधी काही बोलत नव्हती पण किमान आपल्याला ते कळायला हव होतं. म्हणूनच ही वेळ आलीय की तिला स्वत: हे जाणवून द्याव लागलं.
चला ठिक आहे, वेळ अजून गेलेली नाही. पण तरीही मुकेश ला अपराधी वाटत होतं( हे ही नसे थोडके). सगळेच पुरुष हे नाही मान्य करत किंवा त्यांच्यावर तसेच संस्कार झालेले असतात. पण मुकेशने मात्र सारासार विचार केलाआणि म्हणूनच मुकेश ने ठरवलं की मीराला घेऊन मस्त दहाबारा दिवसांच्या ट्रिपला जाऊ,तसं त्याने तिला सुचवलंही. परंतु मीराने स्पष्ट नकार दिला, "आता फक्त मी आणि मीच. मी ठरवणार मला काय हवंय."
आता मीरा ठरविल्याप्रमाणे स्वत:साठी बऱ्यापैकी वेळ काढत होती. मस्त पुस्तक वाचत होती,छान छान रोप आणून बाल्कनीत लावत होती, तीच्या आवडीचा डांस क्लास ही तिने लावला होता. संध्याकाळी जवळच्याच बागेत फेरफटका मारायला जाई,तिथला एक लेडीज गृपही जाॅइंट केला होता. पूर्वी सारख घरातलं हे केलंच पाहिजे ते नीट ठेवलंच पाहिजे या गोष्टी आता तिच्यासाठी नगण्य झाल्या होत्या. पण तरीही एवढ्या वर्षांची लागलेली सवय चटकन घटकेत बाजूला करू शकत नाही ना. मन थोडं चलबिचल होतच. पण मेंदू सांगत असतो की नाही आता थोडं स्वार्थी बनावच लागेल. करू दे त्यांना. बनो आत्मनिर्भर..😀👍 थोड कर ग मनाला कठोर, सोड हा माया मोहाचा पदर, आहेतच ही माणसं तुझीच, पण नसेल जर त्यांना तूझी कदर. तर तूला घडवून आणावे लागतील बदल. मग बघ जगणे होईल तुझे सुकर 🙏.काय पटतंय ना?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा