"प्रेम म्हणजे प्रेम असतं,ते तुमचं आमचं सेम असतं" ह्या पाडगावकरांच्या ओळी सर्व सामान्यांसाठी चपखल लागू होतात परंतू काही व्यक्ती ह्या अशा पण असतात की त्यांच एकमेकांवर जे जीवापाड प्रेम असतं नं ते प्रेम इतरांसारखं सेम नसतं, ते जरा आगळवेगळं, हटके आणि खरोखरचं मस्त असतं. अश्या ह्या जरा वेगळ्या वळणावरील प्रेम हे पण खूपशा गोष्टी आपल्याला शिकवून जातं,समजवून सांगतं जणू. .
अशीच एक लव्हबर्ड्सच्या जोडीची परत एकदा आठवण झाली. दोघेही प्रतिभावंत,हाडाचे अस्सल कलाकार म्हणून नावाजलेले,प्रत्येक रसीक मायबाप प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरलेले. खरतरं ह्या दोन्हीही व्यक्तींच कार्यक्षेत्रच मुळी झगमगतं, सारखे चढउतार असलेलं वलयांकित, मोहनगरी म्हणजेच आपली मायाजगतातील सिनेसृष्टी.
त्यात तिचं वय तेव्हा अल्लड,नुकतचं सोळावं वरीस लागलेलं. रोज काहीतरी सनसनाटी खबर पसरविणा-या ह्या सिनेसृष्टीतील एका शानदार पार्टीत एकमेकांना बघितलं आणि एका नजरेत एकमेकांना पसंतीची पावती दिली.जणू आँखोही आँखोमे ईशारा हो गया स्टाईल. एका नजरेत विश्वास, पटलेलं हे प्रेम मात्र तसचं पक्कं,अक्षय टिकणारं बरं कां. त्या प्रेमाची परिणती मात्र अगदी सर्वसामान्यांच्या प्रकरणात होते तशीच झाली. प्रेमात आकंठ बुडलेल्या ह्या जोडगोळीनं ताबडतोब लग्नाच्या बेडीत अडकायचा निर्णय घेऊन चट मंगनी पट ब्याहं उरकून देखील टाकला. प्रेमाचे दिवस सुरू असतांनाच त्यांच्या प्रेमाला मूर्त स्वरुप येऊन एका गोड परीचं आगमनं देखील झालं. तोपर्यंत हळूहळू काळ जावू लागला तसतसां एकमेकांवरील प्रेम तर तसूभरही कमी झालं नाही पण लग्न ही सुंदर संकल्पना असली तरी तीला उगीचच लग्नाची बेडी नाही म्हणतं असा हळूहळू अनुभवातून साक्षात्कार व्हायला लागल्याची हलकीशी जाणीव होऊ लागली.
दोघांचही वलयांकित सिनेसृष्टी हे कार्यक्षत्र, अगदी दोघांच्याही नसानसांत कला भिनलेली. प्रेम हाच फक्त आपला श्वास नसून आपल्या आत दडलेलं कलावंताचे उसळी मारुन वाहणारं रक्तं पण आपला दुसरा श्वासचं आहे ह्याची एव्हाना दोघांनाही हळूहळू जाणीव व्हायला सुरवात झाली होती. .
सिनेसृष्टीतील चप्पा न चप्पा जाणणा-या ह्या जोडगोळीतील "तो"नी आधीच "ती"ला विवाहानंतर संसार आणि अभिनय ह्यामध्ये अभिनयावर पूर्ण काट मारुन फक्त आणि फक्त संसाराला प्राधान्य द्यावं लागेल हे आधीचं स्पष्ट सांगितलेलं. विवाहापूर्वी पूर्ण कल्पना आधीच दिल्याने फसवणूक ह्या प्रकाराला अजिबातच थारा नव्हता. त्या स्वप्नाळू डोळ्यांवर हलकेच पांघरलेल्या प्रेमाच्या लाटेनी ही अट सहज मान्य केली. आणि मगच संसार सुरु झाला.
संसारांतील गोड गुलाबी प्रेमाचे दिवस हळूहळू जातांनाच काही गोष्टी त्या दोघांनाही नव्याने कळतं गेल्यां,नव्हे मनातल्या मनात हलकेच उलगडतं गेल्यातं. दोघंही हाडाचे अस्सल कलाकार. कलाकार म्हणजे भावनाप्रधान, झोकून देणारा,हळूवार तरल मनाचा,कुठल्याही आवडणा-या,पटणा-या व्यक्तींवर, गोष्टींवर झोकून देऊन मनापासून प्रेम करणारा .
पण जसेजसे दिवसं जावू लागले तसेतसे ह्या दोन्ही प्रतिभावंत, आपल्या कलेवर निस्सीम प्रेम भक्ती करणा-या ह्या प्रेमवीरांना एव्हाना कळायला लागलं होतं की ह्या अथांग पसरलेल्या जीवनरुपी सागरात फक्त एकाच व्यक्तीवर,वा एकाच गोष्टीवर आपलं प्रेम हे सिमीत,बांधलेलं नाही राहू शकतं. कारण ह्या जीवनात प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती ही विविध नात्यांनी विविध व्यक्तींशी, वेगवेगळ्या गोष्टींशी बांधल्या गेली असते. त्यामुळं ह्यातील "तो" ने आपली भूमिका आधीच स्पष्ट सांगितल्याने तो चूक नव्हताच परंतु यातील "ती" च दुसरा श्वास असलेला अभिनय पण तीला स्वस्थ बसू देत नव्हता. तिच्यातील कसलेला कलावंत जितकं स्वतःला दाबावं तितका सिनेसृष्टीत अभिनय करण्याचा विचार हा उसळी मारुन वर येत होता.
खरचं "तो" पण चूक नव्हता तसचं "ती" पण चूक नव्हती. काही वेळेस दोन्हीही व्यक्ती चूक नसतात तरीही काहीतरी बिनसत जातं,उसवतं जातं. त्यामुळेच काही उदाहरणांमध्ये "तो"पण चुकीचा नसतो आणि "ती"पण चुकीची नसते .चुकीची असली तर ती फक्त आणि फक्त परिस्थिती असते.
"थप्पड" हा चित्रपट खरतरं आत्ता बनला, गाजला परंतु ह्यातील कथानक हे आधीच घडून गेलं होतं म्हणतात. आणि ह्या "थप्पड"मधील कथेनं ह्या दोघांच्याही आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली.एकमेकांवरील प्रेम तसूभरही कमी न होऊ देता हे प्रेम आपल्या दोघांच्याही आयुष्यात काहीतरी गमावलेले साखळदंड न बनावेत म्हणून ह्या दोघांनी कुठलाही कायदेशीर घटस्फोट,वादावादी, भांडणं किंवा एकमेकांवर ताशेरे, कुरघोड्या ,आपल्या खाजगी गोष्टींमध्ये दोघांशिवाय तिस-याचा हस्तक्षेप, लुडबूड ह्या संगळ्यांना थारा न देता थोडसं वेगळं होऊन आपल्या आतील आपला आवाज नीट ऐकून शांतपणे घेतलेला निर्णय ही बाब मात्र खरोखरच इतरांपेक्षा वेगळी होती, हटके होती आणि विशेष म्हणजे एकमेकांना समजून घेणारी होती. .
आजही अजून ते थोडे लांबून, थोडे दुरुन एकमेकांवर निस्सीम प्रेम करतात आहेत, एकमेकांची काळजी घेतात आहेत ती पण एकमेकांना स्पेस देऊन, परस्परांच्या मनाचा विचार करून. खरोखरच अलौकिक अद्वितीय पण जरा आगळीवेगळी अशी ही अजूनही सुरू असलेली प्रेमकहाणी. "ती" आपली निसर्गाच्या सानिध्यात राहून आपली पशूसंवर्धनाची, शेतीची आवड जोपासते आहे तर ह्यातील "तो" आपल्या अद्वितीय अशा शायरीने रसीक प्रेक्षकांना खिळवून ठेवतो आहे.
नुकताच येऊन गेलेला 18 आँगस्ट हा दिवस म्हणजे ह्या अनोख्या प्रेमकहाणीतील "तो" चा वाढदिवस. त्यांना रसिक प्रेक्षकांकडून, त्यांच्या मधील प्रतिभेवर प्रेम करणा-या दर्दीं कडून खूप खूप शुभेच्छा. खरचं जर मनाच्या आतील कप्प्यातून अक्षय टिकणारं प्रेम हे शेवटच्या श्वासापर्यंत टिकत हेच खरं आणि ह्या प्रेमात ना कुठला आकस असतो ना कुठला द्वेष. बस प्यार ही प्यार ही प्यार.
तर अशा ह्या भारतीय शायरीच्या विद्यापीठाला, एकाच व्यक्तीत प्रतिभावंत लेखक, यशस्वी दिग्दर्शक, निर्माता,पट्टीचे गीतकार सामावलेल्या गुलजारजीना आणि अजरामर शर्मिली साकारण्या-या, आपली स्पेस जपतांना समोरच्याचा पण आदर राखणा-या राखीजींना मानाचा मुजरा. ही झाली अजब दूनियाकी गजब प्रेमकहानी. उद्याची स्वतंत्र पोस्ट फक्त गुलजार ह्यांच्या बद्दल.
पोस्टची सांगता मा गुलजारजींच्या जणू राखीजींसाठीच लिहीलेल्या शायरीने करते ती पुढीलप्रमाणे ः
"शामसे आँख मे नमी सी है,
आज फिर आप की कमी सी है।
सौ.कल्याणी बापट (केळकर)
9604947256
बडनेरा, अमरावती
22/08/2024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा