मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2567. परफेक्ट इंटरव्ह्यू

 एका माणसाने इंटरव्ह्यू रूमच्या दारावर हळूच टकटक केली.
“सर, आत येऊ का?”
पॅनलमधील एका सदस्याने म्हटलं, “या.”
तो माणूस काही बोलणार, तोच त्याला बसायला सांगण्यात आलं. तो समोरच्या खुर्चीत बसला.
पॅनलमधील एकाने विचारलं,
“या रूमबद्दल तुमचं काय मत आहे?”
“खूप छान सजवलेली आहे सर. सुंदर कार्पेट, खिडकीला पडदा, बोर्ड, प्रोजेक्टर, व्हाईट स्क्रीन… छानच आहे सर.”
“मग तुम्हाला जमिनीवर पडलेली ती छोटी कागदाची गोळी दिसली नाही का? त्यामुळे रूमचं सौंदर्य बिघडत नाही का?”
“सर, ती मी आत येताच पाहिली होती. पण मी काही बोललो नाही, कारण ती ज्याने टाकली असेल त्याला अवघड वाटलं असतं. ती डावीकडून दुसऱ्या खुर्चीत बसलेल्या व्यक्तीने टाकलेली आहे. त्यांच्या टेबलवरची स्क्रिबल पॅड बघा—त्या कागदाचा थोडा भाग अजूनही पॅडला चिकटलेला आहे, कारण तो परफोरेशनवर नीट फाटलेला नाही.”
“छान निरीक्षण आहे. ठीक आहे, बाहेर असलेल्या सफाईकामगार बाईंना बोलावून ही रूम साफ करून घ्याल का?”
“हो सर. त्यांचं नाव काय आहे सर?”
क्षणभर सगळीकडे शांतता पसरली.
“ठीक आहे सर, बहुतेक इथे कुणालाच त्यांचं नाव माहिती नाही. मी त्यांना घेऊन येतो.”
तो बाहेर गेला. तिथे बसलेल्या शिपायाकडून त्याने सफाईकामगार बाईचं नाव विचारलं.
मग तो म्हणाला,
“भावनी, कृपया आत येऊन ही इंटरव्ह्यू रूम साफ करा.”
इंटरव्ह्यू पुन्हा सुरू झाला.
“तुम्ही खूप छान करत आहात. तुम्ही माणसांचा आदर करता—ते कुठल्याही पदावर असोत. आता सांगा, आमच्यातला बॉस कोण आहे?”
“हो सर. तुमच्यापैकी दोघे फक्त निरीक्षण करत आहात. त्यातला एक फायनान्सचा माणूस आहे—तो फक्त पगारावर चर्चा करायला बोलेल. दुसरा या सगळ्या नाटकाचा दिग्दर्शक आहे—तो HR आहे. शेवटच्या टोकाला बसलेले गृहस्थ अधूनमधून हसत आणि बोलत आहेत. तेच बॉस आहेत. मधोमध बसलेल्याला तुम्ही सगळे जास्त लक्ष देता, त्यामुळे मला तोच बॉस आहे असा भ्रम व्हावा म्हणून.”
“अतिशय छान! तुम्ही आमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करता. थोडा वेळ बाहेर थांबा, तुमचं अपॉइंटमेंट लेटर देतो.”
“आणखी प्रश्न नाहीत सर? उदा. पाटील पुतळ्याची उंची, राष्ट्रपती मुर्मू आधी कुठे आमदार होत्या वगैरे?”
“नाही. फक्त तुमचं नाव कन्फर्म करायचं आहे. तुम्ही हैदराबादचे गिरीधर ना?”
“माफ करा सर. ते बाहेर थांबले आहेत.”
“मग तुम्ही कोण?”
“सर, मी कॅन्टीनमधला प्रकाश आहे. किती चहा–कॉफी घ्यायची ते विचारायला आलो होतो. पण मला खुर्ची दिली गेली आणि इंटरव्ह्यू झाला. खूप छान वाटलं सर.
आता सांगा, किती कप चहा आणि कॉफी आणू?” 🫣
🤣😂🤣😂😊☕

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...