"हॅलो, ताई कशी आहेस?"
" चांगलीच आहे. आताच भेटलो होतो विवेक आपण आई वारली त्यावेळी, तू तर पहिल्या आणि बाराव्याला पण आला होता. महिन्याभरात काय फरक पडणार? कसे काय फोन केला? "
"सहजच केला ग. दादा वहिनी पण आले होते म्हणे तुझ्याकडे."
" हो आले होते ना. मीच आग्रहाने घेऊन आली माझ्याकडे. "
" ताई.. ते मी.. असे म्हणत होतो.."
"अरे विचार ना. त्या दोघांना मी चार दिवस आमच्या जवळच्या एका निसर्गरम्य रिसॉर्टला पण घेऊन गेली होती."
"पण ताई.."
"अरे छान रिसॉर्ट आहे ते. शांत सुंदर, हायजीनिक फूड,"
"ताई ते..."
"आणि खूप महागही नाही ते. आम्ही कारनेच गेलो. दादा वहिनी, हे आणि मी."
"तसें नाही ताई मी काय म्हणतो आहे.."
"तू काय म्हणतो आहे ते लक्षात आले माझ्या. आम्ही फारसे कुठे बोललो नाही. फोटोबिटो पण काढण्याच्या भानगडीत पडलो नाही.. तरी कुठून कुठून चर्चा तूझ्या कानावर पडलीच असेल."
"हो ताई... तेच विचारायचे आहे की आई जाऊन महिना दीड महिनाच झाला आणि लगेच तुम्ही चौघे चारदिवस रिसॉर्टला...."
"हो रिसॉर्टला जाऊन एन्जॉय करून आलो असेच म्हणायचं आहे ना तुला?"
"तसें नाही ताई.. चर्चा कानावर आली.. इकडेतीकडे विचारण्यापेक्षा तुलाच विचारतो डायरेक्ट.. गैरसमज नको."
"त्याआधी सांग, आई किती दिवस आजारी होती. आजारी म्हणण्यापेक्षा बेड रिडंन?"
"सात आठ वर्षे कदाचित त्याहूनही जास्त."
"इतके दिवस कोणी तिची सेवा केली?"
"दादा आणि वहिनीने"
" नुसती सेवा नाही केली, बऱ्याच गोष्टीचा त्याग केला. या दहा वर्षात त्यांना कुठेही बाहेरगावी जाता आले नाही, अगदी लग्नकार्याला पण बरेचदा दादाच यायचा, किंवा दोघे आलेच तर संध्याकाळी ते घाईघाईत परत जायचे. अगदी एकदोनदाच दोघांना 2-4 दिवस बाहेर जायचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी मला बोलावले. "
" हो ताई.. तू जे सांगते आहे त्यातले अक्षर आणि अक्षर खरे आहे. मलाही माहिती आहे ते. "
" तूच विचार कर.गेली कित्येक वर्षे त्यांनी काय suffer केले असेल. फारसे बाहेर पडणे नाही.. घरात आजारी व्यक्ती, औषध, गोळया, टेस्ट्स , doctor.Bedpan, huggis adult, रात्रीबेरात्री उठणे, जागरण, चिंता, काळजी,..
कधी मोकळेपणाने बोलले असतील? बसले असतील? कधी खळखळून हसले असतील?
आई गेल्यावर त्यांची काही अंशी सुटका तर झाली... मान्य आहे माझीही आई होती, त्यांनी सेवेत काही कमी पडू दिले नाही तरी होती ती आजारी व्यक्तीचं ना. त्यामुळेच ठरवले त्या दोघांना शांत, निसर्गरम्य वातावरणात पाठवायचे.. थोडे रिलॅक्स होतील..एकमेकांना वेळ देतील, गप्पागोष्टी करतील.. खरेतर त्या दोघांनाच पाठवायचे होते पण दादा ऐकेचना म्हणून आम्ही दोघेही गेलो सोबत. लोकांना बोलायला काय लागते रे.. आईची सेवा करायची वेळ आली तेव्हा किती जवळचे नातेवाईक धावून आले मदतीला? कोणीच नाही.
तेव्हा लक्षात घे. .. दादा वहिनीच्या बाबतीतच नाही, तर ज्यांच्या घरात दीर्घ आजार असलेले वृद्ध असतील त्यांच्या बाबतीत पण त्याच्या मृत्युंनंतर ते हसत असतील,, मोकळेपणाने बोलत असतील, पाणीपुरी खात असतील, तेव्हा हा विचारही मनातं आणू नको ते एन्जॉय करताय..त्यांनी त्याआधी काय सोसले आहे, किती गोष्टींचा त्याग केला आहे त्याचा विचार कर. "
"खरंय ताई... तू माझे डोळे उघडलेस. धन्यवाद.!"
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा