मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2586. कर्माचे मार्ग निराळे असतात

 मरण येवू नये किंवा मला जगायचे आहे मरायचे नाही हा समज चुकीचा आहे.  मरणाची भिती त्या व्यक्तीला नाही जो नेहमी स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक पणे जगला. लाख प्रयत्न करा जगण्याचा अशक्य आहे कारण मरण जवळ आल्या नंतर सगळं  सोडून एकट्याला जावं लागत. परंतु कर्म चांगले केले असेल तर भगवंत हिशोब चांगलाच करतो..वाईट केले तर त्याचा पण हिशोब असतो.  पण..संपल्यानंतर तो आपल्या जवळ नक्कीच नेतो भगवंत असो की यम. हे विसरुन चालणार नाही खुप छान लेख उदाहरण पुर्ण वाचा..
★***👇😔💯
१) रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रम्हदेवांना विचारले, "या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ?" ब्रम्हदेवांनी कुंडली पाहून सांगितले, "समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्याबरोबर होणार आहे." रावणास राग आला. माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची? शक्यच नाही. नोकरांना सांगितले, "याला समुद्रात फेकून द्या." नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला. तो मुलगा वाहत-वाहत एका बेटावर पोहोचला. तिथला राजा वारला होता. लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते. हा मुलगा दिसल्या बरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्यास त्या बेटा वरचा राजा म्हणून स्वीकारले. मुलगा वयात आला. रावणाची कन्या उपवर झाली, बेटा वरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता एकदा जावयास बोलाविले रावण म्हणाला, "ब्रम्हदेवपण हल्ली खोटे बोलतो." त्याने सांगितले होते, "माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून पण आपण तर राजकुमार आहात." जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे." पायाचा अंगठा दाखविला. मग रावणास खात्री पटली. या ब्रम्हदेवाच्या गाठी असतात.
२)पैसा - ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्या ठिकाणीच मिळतो.
३)मरण -ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते.
***👇😔💯
*1) एकदा गरुडाची आई आजारी पडली. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी, आज कोण कोण आले होते ? आई सर्वांची नावे सांगत होती. एकदा यमराज आले व भेटून गेले. पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईस विचारले, आज कोण आले होते ?  आई म्हणाली,  आज यमराज आले होते व जाताना हसले."
गरुडास शंका आली, का हसले असावे ? त्याने आईस उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले. यमराज दुसऱ्या दिवस तिथेही आले. यमराजांना गरुडाने विचारले, "आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण जाताना आपण हसला का? "यमराज म्हणाले,"आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो." त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती...
     प्रत्येक जिवाचा मृत्यू वेगवेगळ्या पद्धतीने ठरलेला आहे, कुणी शेतात अचानक काम करतांना मरतात ,तर कोणी प्रवासात, कोणी आॅफीस मध्ये तर कोणी बोलता बोलता, कोणी झोपेत कोणी वृद्धापकाळाने. म्हणून तो वरच्याचा खेळ आहे मुत्यृ अटळ आहे. त्याची दोर भगवंताच्या हातात आहे प्रारब्ध वश भगवंत कोणालाही सोडत नाहीत कितीही मोठा व्यक्ती असो..साधु संत महात्मे श्रीमंत गरीब राव रंक. मात्र मरण आलं जावंच लागत फक्त कर्माचे मार्ग निराळे असतात...हेच सत्य..👈💯
 म्हणुन होता होईल तेवढ चांगले कर्म करा. तेच पुण्य कामी येईल. नाहीतर कोणाला फसवुन तुम्हाला देव कधीच
माफ करणार नाही बरोबर ना. आपल्याला काय वाटत नक्की कळवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...