मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2534. मनातली जागा

 माणसाची उत्तम जागा कुठे असेल, तर ती एखाद्याच्या मनात असते. हे जितकं साधं तितकंच खोल सत्य आहे. पैसा घर, जमीन, पद देऊ शकतो; पण मनातली जागा विकत घेऊ शकत नाही. शब्द, वागणूक आणि प्रामाणिक भावना यांच्यातूनच मनात घर उभं राहतं. एखाद्याच्या आयुष्यात तुमचे नाव आदराने घेतले जात असेल, तर समजा तुम्ही खरे श्रीमंत आहात. अभिव्यक्ती खरी असेल तर ती थेट हृदया पर्यंत पोहचते. दिखावा क्षणभर प्रभाव टाकतो, पण खरी भावना कायम ठसते.
लोक तुमचं बोलणं विसरतील कदाचित, पण तुम्ही दिलेली जाणीव कधीही विसरत नाहीत. मनातली जागा मिळवण्यासाठी मोठं असावं लागत नाही, तर आपलं असावं लागतं. विश्वासाने दिलेली साथ पैशाच्या कुठल्याही किंमती पेक्षा मोठी असते. जे मनात उतरतात, ते कधीच विसरले जात नाहीत. आयुष्याच्या गर्दीत पैसा मागे राहतो, पण भावना पुढे जातात. म्हणूनच, पैशाहून श्रेष्ठ असते ती एखाद्याच्या मनात मिळवलेली जागा.
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला, कोणत्याही नावाची गरज नसते, कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची, परिभाषाच काही वेगळी असते…
विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा, कुठेतरी काही चांगले घडत असते
दरवाजा म्हणतो, अतिथीचे स्वागत कर, घड्याळ म्हणते काळाची पाऊले ओळख. खिडकी म्हणते, दूरदृष्टी ठेव, दुनयेचे भान ठेव देवारा म्हणतो, पवित्र्य ठेव, मांगल्य जप. छत म्हणते, उच्च विचार ठेव, उच्च अंकाशा ठेव पण जमीन म्हणते पाऊले मात्र माझ्यावरच राहु देत.
 साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तीवाद आहे. आणि ओळख हा चांगला संबंध आहे. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसे.
प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो. कोणी आपल्याला केवळ अजमावून  जाते, कोणी आपल्याला  ज्ञान  देऊन जाते, कोणी वापर करून जाते तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते.
धनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसं, धन असेपर्यंतच साथ देतात. पण मनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसं आयुष्याच्या शेवट पर्यंत साथ देतात. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. कारण, समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपण एकटचं चाललेलं कधीही उत्तम...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...