मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2553. डिग्रीची रद्दी आणि वडापावची गाडी

 परवा मी एका लग्नात गेलो होतो. तिथे एक उच्चशिक्षित तरुण भेटला—डबल ग्रॅज्युएट, टाय-कोट घातलेला, पण चेहऱ्यावर प्रचंड तणाव. मी विचारलं, "काय चाललंय?" तर म्हणाला, "सर, दोन वर्षे झाली नोकरी शोधतोय, पण लायकीचा पगारच मिळत नाही. १०-१२ हजार देतात, तेवढ्यात पेट्रोल पण परवडत नाही."
मी त्याला खिडकीतून बाहेर बोट दाखवलं. तिथे रस्त्यावर एक वडापावची गाडी होती. तिथे प्रचंड गर्दी होती.
मी त्याला म्हणालो, "तो मुलगा बघतोयस? तो दहावी नापास आहे. पण त्याची दिवसाची कमाई तुझ्या महिन्याच्या अपेक्षित पगारापेक्षा जास्त आहे. त्याला 'इंग्लिश' येत नाही, पण त्याला 'बिझनेस' येतो."
तो तरुण रागाने म्हणाला, "सर, पण मी एवढं शिकलोय, आता मी वडापाव विकू? लोक काय म्हणतील? माझ्या डिग्रीची किंमत काय राहिली?"
हेच तर आपलं चुकतंय !
आपल्याला 'गरिबीची' लाज वाटत नाही, पण 'कष्ट' करून श्रीमंत होण्याची लाज वाटते.
डिग्री भिंतीवर लावण्यासाठी असते. पण पोट भरण्यासाठी 'कौशल्य' लागतं. जर तुम्ही एमबीए होऊन घरी बसला असाल, आणि एखादा दहावी पास मुलगा चहा विकून महिना ५० हजार कमवत असेल, तर खऱ्या अर्थाने 'शिक्षित' कोण?
मित्रहो, कामाची लाज बाळगू नका. टाटांनी सुद्धा सुरुवातीला कोळसा उचलला होता. धीरूभाईंनी भजी विकली होती.
ज्या दिवशी तुम्ही "लोक काय म्हणतील" हा विचार कचऱ्यात टाकाल आणि हातात जे काम येईल ते सोन्यासारखं कराल, त्या दिवशी तुम्हाला कोणाच्याही हाताखाली काम करायची गरज पडणार नाही.
लक्षात ठेवा: रिकाम्या खिशाने फिरण्यापेक्षा, हाताला पीठ लागलेला माणूस कधीही श्रेष्ठ असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...