नमस्कार ,
मी केबीसीचा नवा होस्ट.प्रश्नोत्तरांच्या या अफलातून, अद्भुत,अद्वितीय, अफाट
आणि अनोख्या दुनियेत आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करतो.
माझ्यासमोर हॉट-सीटवर विराजमान आहेत श्रीयुत अर्जुन.वय वर्षे अवघ अठरा…
आणि आतापर्यंत कॉम्प्युटर महोदयांनी विचारलेल्या चौदा प्रश्नांची उत्तरं त्यांनी अगदी बिनचूक दिलेली आहेत.
व्हेरी वेल प्लेड, सर!
यासाठी आपलं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!
असं म्हणत टाळ्यांच्या गजरात केबीसीचे यजमान पन्नास लाखांचा चेक अलगद त्याच्या समोर ठेवतात आणि शेवटच्या प्रश्नाकडे वळतात…
प्रश्न क्रमांक पंधरा…
हिंदुस्थानला स्वातंत्र्याची प्राप्ती केव्हा झाली?
आणि पर्याय आहेत…
“सर, जस्ट अ मिनिट…”
हॉट-सीटवर बसलेला तो मध्येच हस्तक्षेप करतो.
आपण विचारलेल्या प्रश्नात ‘हिंदुस्थान’ हा शब्दप्रयोग भ्रम निर्माण करणारा आहे. खरे तर या ठिकाणी ‘भारत’ हा शब्द अधिक योग्य आहे, असं मला वाटतं. आणि ‘स्वातंत्र्याची प्राप्ती’ असं विचारल्यामुळे, हे स्वातंत्र्य कुणीतरी देऊ केल्यासारखा एक नकारात्मक अर्थ त्यातून व्यक्त होतोय, असंही मला वाटतंय…
आणखी एक, सर…
कोणतीही मदत न घेता आपण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं बिनचूक उत्तर देणाऱ्या माझ्यासारख्या ब्रिलियंट पर्सनॅलिटीला इतका साधा प्रश्न विचारून अंडर-एस्टिमेट केलं जातंय, असं माझं प्रामाणिक मत आहे.
“No, no, Mr. अर्जुन… Don’t take this in any other sense.”
तुम्हाला तसं वाटावं, असं अजिबात नाही. उलट, तुमच्याकडे असलेला अमर्याद ज्ञानाचा खजिना आणि तुमची विनयपूर्ण विद्वत्ता याचा आम्ही मनापासून आदर करतो.
आपली सूचना गांभीर्यानं घेत, केबीसीच्या इतिहासात पहिल्यांदाच, तुमच्यासाठी विचारलेल्या प्रश्नाची शब्दरचना आम्ही बदलत आहोत. मात्र, यासाठी आमचीही एक अट असेल.
जर या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलंत, तर अर्थातच करोडपतीचे हक्कदार तुम्हीच असाल. पण जर उत्तर चुकलं, किंवा उत्तर न देता तुम्ही या खेळातून बाहेर पडला, तर आतापर्यंत जिंकलेले पन्नास लाख रुपये केबीसीला परत द्यावे लागतील.
तर बोला—पुढे खेळायचं की इथेच थांबायचं?
“No, सर!
इथे खेळ थांबवण्याचा प्रश्नच येत नाही. मला आपली अट मान्य आहे. मी शेवटच्या प्रश्नासाठी पूर्णपणे तयार आहे.”
आपल्या कॉन्फिडन्ससाठी पुन्हा एकदा अभिनंदन!
आणि आता, आपल्यासाठी शेवटचा एक कोटी रुपयांचा प्रश्न…
स्वतंत्र भारताची निर्मिती केव्हा झाली?
आणि पर्याय आहेत…
1857
1947
1950
NOTA
“सर, पुन्हा एकदा नम्रपणे सांगू इच्छितो की या प्रश्नाच्या उत्तरांसाठी दिलेल्या शेवटच्या पर्यायामध्ये थोडीशी गडबड आहे…”
“Mr. Hot Seat, आपण आपल्या मर्यादा ओलांडत आहात.
‘सुज्ञास सांगणे न लगे’ ही फ्रेज लक्षात ठेवा आणि केवळ आपल्या लक्ष्याकडे लक्ष द्या.”
स्वतंत्र भारताची निर्मिती केव्हा झाली?
1857 (१० मे १८५७)
1947 (१५ ऑगस्ट १९४७)
1950 (२६ जानेवारी १९५०)
NOTA (None of the above)
एक कोटी रुपयांचं मूल्य असणारा प्रश्न इतका सोपा कसा असू शकतो—यात कुठेतरी नक्कीच गोची असणार, अशी त्याला शंका येते. तो क्षणभर डोळे मिटतो आणि पटकन बोलून जातो…
“सर, मी लाईफ लाईनची मदत घेऊ इच्छितो.”
“ओके, कोणती लाईफ लाईन?”
“Audience Poll, sir.”
पुढल्याच क्षणी व्यासपीठावरील स्क्रीनवर निकाल झळकतो…
1857 — 25%
1947 — 25%
1950 — 25%
NOTA — 25%
बापरे!
तो पूर्णपणे चक्रावून जातो.
उत्तर इतकं सोपं नाही, हे आता स्पष्ट होतं.
“सर, मी दुसरी 50-50 लाईफ लाईन ट्राय करतो.”
“ओके. कॉम्प्युटर महाशय, दोन चुकीचे पर्याय काढून टाका.”
आता स्क्रीनवर उरतात...
1947
NOTA
चेहऱ्यावरचा घाम पुसत, चक्रव्यूहात अडकल्यासारखा तो विनंती करतो…
“सर, फोन-ए-फ्रेंड, प्लीज…”
“ओके. आपल्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव सांगा.”
“सर, ती ‘ब्युटी-क्वीन मिस भारती’ या नावाने ओळखली जाते.”
“बाय द वे, कोण आहेत या मिस भारती?”
“सर, कुशाग्र बुद्धीसह अप्रतिम सौंदर्य लाभलेली ती आधुनिक भारताची अर्थात Z-Gen ची प्रतिनिधी आहे.”
“वा! मैत्रीण असावी तर अशी!”
यजमान मनापासून दाद देतात.
थोड्याच वेळात फोन लागतो—
“हॅलो, डियर भारती… मी केबीसीच्या हॉट-सीटवरून अर्जुन बोलतोय. प्रश्न असा आहे की…”
स्वतंत्र भारताची निर्मिती केव्हा झाली?
तो प्रश्न पूर्ण होण्याआधीच पलिकडून मिस भारती संतापून प्रतिप्रश्न करते…
“अरे, प्रश्न विचारायची ही काय पद्धत आहे?
आणि स्वातंत्र्याची निर्मिती म्हणजे काय? जे स्वातंत्र्य दानपात्रात टाकलं गेल त्याचं असं उदात्तीकरण करणं चुकीचं आहे!”
ती पोटतिडकीनं बोलतच राहते…
आणि अचानक केबीसीचा सायरन वाजतो.
हुश्श…
उत्तरासाठी दिलेली वेळ केव्हाच संपलेली असते.
हॉट-सीटवरचा अर्जुन आता निर्विकारपणे शून्यात हरवतो.
“मिस्टर अर्जुन, अजून एक लाईफ लाईन तुम्ही वापरू शकता
Switch the Question.”
यजमान आशेचा एक किरण सोडतात.
प्रश्न बदलला जातो…
‘स्वतंत्र भारताची निर्मिती केव्हा झाली?’
या ऐवजी नवा प्रश्न असा आहे...
‘स्वातंत्र्य म्हणजे काय?’
आणि पर्याय असतात...
गणतंत्र
स्वयंतंत्र
स्वराज्य
सुराज्य
यक्षप्रश्नाला बिनतोड असा प्रश्न टाकून यजमान खुर्चीत टेकून बसतात जसा जाळं टाकून पारधी बसतो, तसा.
आता “स्वातंत्र्य म्हणजे काय?”
हा त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न ठरतो.
सर्व लाईफ लाईन्स संपलेल्या…
कुरुक्षेत्रावर उभ्या असलेल्या अर्जुनासारखा तो गोंधळून जातो.
आणि नेमकं त्याच वेळी अघटित घडतं
केबीसीची वेबसाईट हॅक होते.
संपूर्ण सिस्टीम व्हायरसनं ग्रासली जाते
काळ्याकुट्ट स्क्रीनवर केशरी,पांढऱ्या आणि हिरव्या प्रकाशरेषा धावू लागतात…
तोच केबीसीचा होस्ट म्हणतो,
“मिस्टर अर्जुन…माफ करा, Something is going wrong पण खेळ पुन्हा सुरू होईपर्यंत तुम्हाला काही सांगायचं आहे का?”
अर्जुन शांतपणे उभा राहतो. आता त्याच्या डोळ्यांत वेगळीच चमक असते.
“हो सर…
सिस्टीममधला व्हायरस क्लिअर झाल्यावर ‘स्वातंत्र्य म्हणजे काय?’ या प्रश्नाचं उत्तर कदाचित कळेलही.
पण त्याआधी मला एवढंच सांगायचं आहे...
स्वातंत्र्य ही फक्त भूतकाळात मिळालेली एक तारीख नाही,ती वर्तमानात जगायची आणि भविष्यासाठी सिद्ध करायची जबाबदारी आहे.
आजच्या झेड-जनरेशनमधील प्रत्येक तरुणानं, वारसाने मिळालेल्या या स्वातंत्र्याला स्वतःच्या विचारान, कृतीनं,
हक्कान आणि जबाबदारीनं, संविधानाच्या चौकटीत सिद्ध केलं पाहिजे…
कारण
स्वातंत्र्य म्हणजे जिंकलेला खेळ नाही…
तर तो रोज खेळायचा संघर्ष आहे.’
आणि ते जर जपलं नाही,
तर पुढची पिढी कधीच माफ करणार नाही.
दरम्यान,कॉम्युटर सिस्टिममधले व्हायरसचे काळे ढग दूर होऊ लागतात आणि कुठूनतरी एका जुन्या गाण्याची धून घुमू लागते
“अब तुम्हारे हवाले वतन साथियों…”

राजन पोळ
( लवकरच आपल्या भेटीला येणाऱ्या माझ्या "तू तिथ मी" या कथासंग्रहातून)
।।भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा