रात्रीची वेळ होती. अंदाजे साडेबारा ते एकच्या दरम्यान. एसटी थांब्यावरून एक काकू उतरल्या. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यांत भीती आणि मनात असहायता. त्या आजूबाजूला पाहू लागल्या- रिक्षा शोधत होत्या. पण दुर्दैव असं की त्या वेळी एकही रिक्षा तिथे नव्हती. थोड्याच वेळात एक रिक्षावाला आला.
“काय हो, कुठे जायचं?” त्याने विचारलं.
काकूंनी हळू आवाजात उत्तर दिलं,
“आनंद नगरला जायचं आहे.”
रिक्षावाला क्षणभर थांबला आणि म्हणाला,
“शंभर रुपये होतील.”
ते ऐकताच काकूंच्या चेहऱ्यावर एक वेगळीच छाया उमटली. त्या म्हणाल्या,
“दादा, माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत…”
तेवढ्यात रिक्षावाला काही न बोलता पुढे निघून गेला.
काकू घाबरल्या.
“दादा, दोन मिनिटं थांबा ना…”
असं म्हणत त्या रिक्षाच्या मागे धावल्या.
तेव्हा त्यांनी आपली कहाणी सांगायला सुरुवात केली…
“माझा भाऊ ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे.
मी त्याला पाहायला आले आहे.
मी आज पुण्यात पहिल्यांदाच आलेय.
मला काहीच रस्ता माहीत नाही…
माझ्याकडे मोबाईल सुद्धा नाही.”
असं म्हणत त्यांनी हातातली एक चिठ्ठी दाखवली—
भावाचा पत्ता, हॉस्पिटलचं नाव… सगळं त्यावर लिहिलेलं होतं.
त्या पुढे म्हणाल्या,
“माझ्याकडे फक्त ८० रुपये आहेत.
हवे तर सगळे घ्या…
पण प्लीज मला तिथे सोडा.”
त्या क्षणी त्या बाईंची भीती, असहायता, प्रामाणिकपणा सगळं स्पष्ट दिसत होतं.
पण रिक्षावाल्याचं उत्तर ऐकून काळजाला चटका बसला…
“आहो ताई, रात्रीची वेळ आहे.
डबल भाडं लागतं.
तरीसुद्धा मी कमीच सांगतोय.
यायचं तर या नाहीतर सोडा ”
तेव्हा माझ्या मनात एक विचार चमकून गेला.
दिवसा तर याच अंतरासाठी फक्त २० रुपये घेतात.
आणि आज, एका अडाणी, घाबरलेल्या बाईसमोर
दुप्पट नाही, तिप्पट नाही, तर पाचपट पैसे मागितले जात होते.
तरीसुद्धा ती बाई ८० रुपये द्यायला तयार होती…
कारण तिच्यावर परिस्थिती तशी आली होती.
ती एकटी होती.
अनोळखी शहरात होती.
काकूंनी शेवटचा प्रयत्न केला…
“तुम्ही मला आनंद नगरला सोडा.
मी नातेवाईकाकडून २० रुपये घेऊन
मी उरलेले पैसे तुम्हाला देते.”
पण रिक्षावाल्याने मान हलवली.
“ताई, दुसरी रिक्षा बघा.
मला तिथून रिटर्न भाडं मिळणार नाही.”
आणि तो निघून चालला होता .
हे सगळं मी पाहत होतो…
आणि माझं मन स्वस्थ बसू शकत नव्हतं.
मी त्याला आवाज दिला.
तो थांबला.
मी विनंती केली,
“अरे, त्या काकू एकट्या आहेत.
रात्रीची वेळ आहे.
तिला घेऊन जा.”
तो म्हणाला,
“साहेब, मला रिटर्न भाडं मिळणार नाही.
म्हणून शंभर रुपये घेतल्याशिवाय परवडत नाही.”
मी शांतपणे म्हणालो,
“मी सगळं तुमचं संभाषण ऐकलं आहे.
त्या काकू घरी गेल्यावर
उरलेले २० रुपये देणार आहेत मग काय प्रॉब्लेम आहे?.”
त्यावर तो म्हणाला,
“अहो, खूप जण असंच सांगतात.
पण लोकेशनला गेल्यावर सगळे बदलतात.”
ते शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला.
फक्त २० रुपयांसाठी माणूस इतका बदलतो?
माणुसकी इतकी स्वस्त झाली आहे का?
शेवटी मी निर्णय घेतला.
मी रिक्षावाल्याला शंभर रुपये दिले
आणि म्हणालो,
“काकूंना सुखरूप घरी सोडा.
पोहचल्यानंतर मला फक्त काकूंना फोन लावून द्या.”
काकूंना मी माझा नंबर दिला.
फक्त पाच मिनिटांत मला रिक्षावाल्याच्या मोबाईल वरून मला फोन आला…
“दादा, मी सुखरूप पोहोचले.
मी गावाला गेल्यावर तुम्हाला मोबाईल नंबर वर टाकायला सांगते.”
त्या क्षणी माझ्या डोळ्यांत पाणी आलं.
मी म्हणालो,
“काकू, राहू द्या. आजकाल शंभर रुपयांत काय येतं?”
त्यावर काकू जे बोलल्या ते थेट काळजात घुसलं.
“दादा, २० रुपयांसाठी तो इथे येऊ शकला नाही.
मी रात्रीची एकटी होते.
मग तुम्हीच विचार करा.
जर २० रुपयांची किंमत इतकी असेल,
तर १०० रुपयांची किंमत किती असेल?”
त्या क्षणी मला काय बोलावं आणि काय नाही हेच कळेना.
शेवटी एवढंच म्हणालो,
“काकू, नशिबात असेल तर पुन्हा नक्की भेटू. काळजी घ्या.”
आणि गंमत म्हणून म्हणालो,
“हा नंबर वर पैसे पाठवू शकत नाही. कारण हा दुसऱ्याचा नंबर मी वापरत आहे.
त्या घाबरून म्हणाल्या,
“अरे बापरे!”
आणि मी फोन कट केला. आज या प्रसंगातून मी एक गोष्ट शिकलो.
पैसे १० रुपये असो किंवा १०० रुपये. त्याची खरी किंमत त्यालाच कळते
ज्याच्यावर परिस्थिती ओढवलेली असते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा