एक दिवस मी माझ्या पतीला म्हणाले, मी एक प्रश्न विचारू का? वारंवार माझ्या मनात तो प्रश्न येतो. त्यावर माझ्या पती मला म्हणाले, परवानगी काय मागतेस, विचार तुला काय विचारायचे ते. मी म्हटलं मला खरे उत्तर अपेक्षित आहे, बहाणेबाजी नको, मला राग येणार नाही, पण खरेच उत्तर द्या. मला खुष करण्यासाठी मला उत्तरे देऊ नका. कारण माझा हा प्रश्न माझ्यासाठी खास आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करता. माझ्या सर्व आवडीनिवडी सांभाळता. तुमचे बोलणे वागणे मला आवडते. मी तर खुप खुष आहे. पण तुम्ही खुष आहात का? तुम्ही माझ्यासोबत लग्न कोणता विचार करून केले. असे माझ्यात काय बघितले की त्यामुळे मी तुम्हाला आवडले? माझे पती गालातल्या गालात हसले आणि मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
तुझ्या दिसण्यावर, तुझ्या लाजण्यावर, तुझ्या सोनेरी केसांवर, तुझ्या गव्हाळ रंगावर, तुझ्या टपोऱ्या आणि पाणीदार डोळ्यावर, तुझ्या चालण्यावर, तुझ्या अदांवर. मी जाम खुष. मला खूपच आनंद झाला. प्रत्येक स्त्रीलाच होतो तिच्या सौंदर्याचे वर्णन केल्यावर. माझे पती मला म्हणाले आग थांब जरा पूर्ण तर एकूण घे.
मी तुझ्या सौंदर्यावर प्रेम केले नाही.
खरे सांगायचे झाले तर मी तुझ्या हृदयावर प्रेम केले,
मी तुझ्या निरागस मनावर प्रेम केले.
मी तुझ्या खरे बोलण्यावर प्रेम केले.
मी तुझ्या लाजण्यावर प्रेम केले.
मी तुझ्या चांगल्या स्वभावावर प्रेम केले,
मी तुझ्या चांगल्या वागण्यावर प्रेम केले,
तु माझ्या आईवडीलाना आपलेसे केलेस, त्याच्यावर प्रेम केले.
तु माझ्या नातेवाईकांना आपले समजलीस, त्याच्यावर प्रेम केले.
तु सर्व नाते सांभाळून घेतलेस, सर्वांत मिळूनमिसळून राहिलीस, त्याच्यावर प्रेम केले.
माझ्या पेक्षा तुला घरात जास्त किंमत देतात. या सर्व गोष्टी वर मी प्रेम केले.
मी निशब्द झाले मी माझ्या पतीचे बोलणे लक्ष देऊन एकत होते.
पुढे ते म्हणाले....
तुझ्या मुखातून येणाऱ्या मधुर शब्दावर आणि त्याप्रमाणे चांगलं वागण्यावर,
तुझ्या चेहेऱ्यावरील निरागस हावभावानवर मी प्रेम केले.
सर्वात महत्वाचे म्हणजे ,माझ्यासाठी धडधडणाऱ्या तुझ्या हृदयावर,
ते जीवास जीव देणार आहे, त्यावर मी प्रेम केले आहे
ते ना काळे ना गोरे, ना सुंदर ना कुरूप, ना विद्रूप, ते माझ्या भावनाना समजून घेणारं आहे
माझ्या प्रेमाला हळूवार जपणारं आहे...
हो मी प्रेम केलंय तुझ्या स्वभावावर
तुझ्या वागण्यावर, तुझ्यात असलेल्या माझ्यावर,
फक्त तुझ्या ह्रदयावर आणि म्हणूनच सौंदर्य संपेल पण माझं प्रेम कधीच संपणार नाही.
माझ्या पतीचे संपूर्ण बोलणे एकल्यावर माझ्या डोळ्यातुन अश्रू वाहात होते. अश्रूंचा ओघ कमी झाल्यावर मी माझ्या पती जवळ गेले आणि त्यांना अतिशय प्रेमाने, जिव्हाळ्याने अंतःकरण पासून म्हणाले.
मी या जगातील सर्वात भाग्यशाली आणि नशिबवान पत्नी आहे, मला तुमच्या सारखा जोडीदार मिळाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा