मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

1510. प्रॉमीस

 गाडी जशी प्लॅटफॉर्मला लागली तशी सॅक पाठीला लावून  ती उतरली,  गाडी अंमळ जरा जास्तच लेट झाली होती, तिनी आजूबाजूला नजर फिरवली दोन, तीन लोक सोडले तर प्लॅटफॉर्म रिकामाच होता, स्टेशन पासून जवळ जवळ एक तासाच्या अंतरावर तीच गांव. स्टेशन तस छोटच होत लांबपल्ल्याच्या चार पाच गाड्या थांबायच्या इतकच, पण त्यामुळे गावातील लोकांची तेवढी तरी सोय  होत होती अस म्हणायला हरकत नाही. रात्रीचे साडेबारा वाजत आले होते, आठ वाजता पोचणारी गाडी चार तास लेट पोचली होती, पण आज काही करून तिला गावी येण भागच होत, तिच्या बाबांची तब्येत जास्तच खालावली होती स्टेशनाच्या बाहेर येऊन तिनी पाहिल पण कोणीच नव्हतं, एखादी रिक्षा, किंवा सायकल रिक्षा दिसतेय का ते पहात होती पण नाही कोणीच नाही, काय करावं, वेळेत घरी पोचण गरजेचं होत, ती आत जाऊन स्टेशन मास्तरशी पण बोलून आली, अर्थात तो तरी काय मदत करणार. तरी तो म्हणाला तुम्हाला रात्रभर इथे बसायचं तर बसा, आताची या स्टेशनवर थांबणारी ही शेवटची गाडी आता सकाळी सात वाजता येणारी गाडी थांबेल. गावातून सकाळची गाडी पकडायला लोक येतात त्यामुळे सकाळी रिक्षा किंवा सायकल रिक्षा मिळेल, तिला हे माहीत होत, पण तिच्याकडे इतका वेळ नव्हता थांबायला काय करावं सुचत नव्हते..बाबांची खूप आठवण येत होती डोळ्यात आलेले पाणी रोखण्याचा प्रयत्न करत होती, शेवटी तिनी ठरवल चालायला सुरुवात  तर करू, खर तर तशी ती आतून घाबरली होती, पण अत्ता  या क्षणी तरी तिच्याकडे दुसरा मार्ग नव्हता रस्त्याला लागलो की एखाद दुसरी गाडी दिसली तर थांबते का पाहू, अस म्हणत, तिनी चालायला सुरवात केली.  सॅक मध्ये छोटी बॅटरी होती  ती तिनी काढली, तिच्या गावात दिवे जायच प्रमाण खूप होत त्यामूळे तिला बॅटरी जवळ ठेवायची सवय होती, तीच आता उपयोगाला आली, तिनी आता झपाझप पावलं टाकायला सुरवात केली, वाटेत तिला एक छोटी झाडाची फांदी दिसली ती पण तिनी घेतली, असलेली बरी असा विचार करत ती  राम राम म्हणत चालत होती.  आजूबाजूला मिट्ट काळोख, फक्त बॅटरी चा उजेड आणि तिच्या पावलांचा आवाज इतकंच, जेमतेम पंधरा मिनिटे झाली असतिल चालून इतक्यात मागून गाडीचा आवाज आला, आणि हेडलाईटचा प्रकाश, मागे वळून ती बॅटरी दाखवत थांबा थांबा म्हणून ओरडायला लागली ,तशी गाडी अगदी  तिच्या जवळ येऊन थांबली तिनी बॅटरीच्या प्रकाशात चेहरा पाहिला आणि ओरडलीच अरे रघू तू इतक्या रात्री,  अगदी देवा सारखा भेटलास बघ, माझ सोड आग पण तू इतक्या रात्री, अशी चालत,  बर चल बस पटकन आधी, वाटेत बोलूयात , तिच्या जिवात जीव आला, तिला इतक हायस वाटल, ती पटकन  त्याच्या मागे बसली, बसलीस का? हे घे आधी पाणी पिऊन घे, अस म्हणत त्याने पाण्याची बाटली तिला दिली, पाणी प्यायलावर  तिच्या लक्षात आलं किती कोरड पडली होती घशाला पाणी प्यायला वर तिला जरा बर वाटलं, चल निघूया. 
      रघू तिचा शाळेपासूनचा  सच्चा दोस्त, तिच्यावर जिवापाड एकतर्फी प्रेम करणारा. पण नेहाच्या मनात फक्त त्याच्या बद्दल मैत्रीची भावना होती. कॉलेज मधे गेल्यावर तीच सिद्धार्थवर प्रेम आहे हे कळल्यावर खर तर रघू आतून पूर्ण संपला होता. त्याने कधीही नेहाला त्याच्या तिच्यावरच्या प्रेमा बद्दल सांगितल नाही.  तीच आणि सिद्धार्थच प्रेम आहे हे कळल्यावर खूप दिवस तो तिला भेटला नाही. तिला प्रयत्न पूर्वक भेटायच टाळायचा. न जाणो तिला जर कळल तर आपल्याला तिच्याशी खोट बोलता येणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत त्याला त्यांच्या मैत्रीवर परिणाम होऊन द्यायचा नव्हता. 
       एक दिवस  अचानक रडत रडत नेहा त्याच्याकडे आली, तिच्या घरी तिच्या आणि सिद्धार्थच्या प्रेमप्रकरणा बद्दल कळल होत, आणि बाबांनी स्पष्ट नकार दिला होता. या वयातल्या प्रेमाला काही अर्थ नसतो नुसत आकर्षण असत ते..अस बरच बोलले ते. त्यात त्याच्या घरची परिस्थिती पण बेताची त्यामुळे नेहाला कीतपत झेपेल अस त्यांना वाटायचं. कारण नेहाच्या घरची परिस्थिती खूपच चांगली होती त्यात नेहा एकुलती एक त्यामुळे तिला लहानपणापासून काही कमी पडल नव्हत. थोडक्यात काय आपली मुलगी सुखात आनंदात राहावी अशी जी सगळ्या आई वडिलांची इच्छा असते तशीच त्यांची होती. रघूने नेहाची समजूत घातली, चल मी बोलतो बाबांशी म्हणत तो नेहाच्या घरी गेला, तो आणि रघू चांगले मित्र आहेत हे सगळ्या गावाला माहीत होत. 
      हे बघ रघुनंदन नेहाची बाजू मांडायला आला असशील तर त्यावर बोलण नको. नेहाला रघुने डोळ्यानेच खुणवत आत जायला सांगितल आणि पुढच्या अर्धा तासात त्याने बाबांची समजूत घातली. कसबसं बाबा त्यांच लग्न लावून द्यायला तयार झाले पण अगदी ना खुशीने नेहा सगळ दरवाजाच्या आडून ऐकत होती, तिला रघू मित्र म्हणून आवडायचाच पण आज तो तिला एका मैत्रीणीच्या प्रेमासाठी तिला तीच प्रेम मिळाव म्हणून तिच्या बाबांशी बोलणारा रघू अगदी सख्या नात्यापेक्षाही खूप जवळचा वाटला आणि तिचे डोळे भरून आले. तीने पाठीमागच्या दरवाज्याने पळत जाऊन  रघूला त्यांच्या गेट पाशी गाठले त्याचा हात हातात घेत म्हणाली मी तुला Thank you म्हणून परक नाही करणार. तुला कल्पना नाही तू आज मला माझ प्रेम मिळवून दिल आहेस. तू नसतास तर हे शक्य नव्हतं. रघूने तिला प्रेमाने जवळ घेतल, आग वेडे अस काय बोलतेस आपण खूप चांगले मित्र आहोत ना, मग मी तुझ्या करता एवढ सुद्धा करू शकत नाही का अस म्हणत त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि मनात म्हणाला खर आहे तुझ तुला खरच कल्पना नाही मी काय केल आहे त्याची. माझ प्रेम मी कायमस्वरूपी दुसर्‍याच्या हातात दिल आहे. चल निघतो आता पण एक लक्षात ठेव तुला कधीही माझी गरज लागली तरी अगदी काळ्या रात्री सुद्धा तर तुझा  हा मित्र तुझ्यासाठी तुझ्या पाठीशी उभा राहील. तुझी साथ मी कधीच सोडणार नाही प्रॉमीस. अस म्हणून तो क्षणात तिथून निघून गेला. 
 रघू अरे इतक्या रात्री तू कसा काय, माझ सोड तू इतक्या रात्री कशी काय? दिवसा ऊजेडी येता नाही आलं. अरे अस काय करतोस, बाबा आजारी आहेत ना, माहीत नाही का तुला, त्यामूळे मिळेल ती गाडी पकडून निघाले तर ती नेमकी लेट झाली, मला माहीत आहे ग बाबा आजारी आहेत ते, पण मी  गेले आठ दिवस  कामा करता बाहेरच होतो. तसा म्हणजे येऊन जाऊन होतो, पण तुझ्या घरी काही वळता आल नाही, कामा मुळे, नाहीतर मीच तुला कळवलं असत.  पण तुला कोणी सांगितल? आईची तार आली त्यामुळे लगेच निघाले, सिद्धार्थ नेमका बडोद्याला ऑफिसच्या कामासाठी गेला आहे. नाहीतर तो पण आला असता माझ्या बरोबर थोडावेळात ते तिच्या घरापाशी पोचले, चल उतर आल घर, ती उतरली चल येतोस ना तुला पाहिल्यावर बाबांना बर वाटेल हो तू हो पुढे मी आलोच गाडी लावून. ये मी होते पुढे अस म्हणत ती पुढे झाली कधी एकदा बाबांना भेटतेय अस झालं होत तिला. दार उघडताच आग नेहा इतक्या रात्री एकटीच कशी आलीस, मला आत तर येऊ दे, एकटी नाही वाटेत रघू भेटला त्याच्या बरोबर आले,दार लावू नकोस तो गाडी लावून येतोय.. 
   आई एकदम ओरडली कोण रघू ? नेहानी प्रश्नार्थक चेहरा कडून आई कडे बघितल का काय झालं, काही नाही तू आधी हातपाय धुवून घे बाबांना भेट. हो हो अस म्हणत तिने पटकन बॅग सोफ्यावर टाकली हात पाय धुवून बाबांच्या खोलीत शिरली तिनी बाबांना मिठीच मारली, गळ्यात पडून लहान मुलासारखी रडली, बाबा मी आले ना आता तुम्ही लवकर बरे होणार बघाच, बाबांना आपल्या लेकीला पाहून फारच आनंद झाला खूप दिवसांनी त्यांचा चेहरा आनंदलेला दिसत होता,  ती बाबांशी बोलत होती इतक्यात आई चहा घेऊन आली नेहा  आधी चहा घे म्हणजे फ्रेश वाटेल दहा मिनिटांनी जेवायला वाढते. आग माझ्या एकटी करता काय चहा घेऊन आलीस रघू करता नाही आणलास, अरे इतका वेळ हा काय करतोय थांब आलेच, अस म्हणतच ती हॉल मधे आली नेहा थांब आग काय बोलतेयस रघू कसा येईल तुला सोडायला, का काय झाल आई, मगाचपासून बघतेय रघूच नाव काढलं की तुझा चेहरा बदलतोय. कारण रघू आपल्यात नाही चारच दिवसांपूर्वी तो अ‍ॅक्सीडेंट मध्ये गेला.
काय नेहा जवळ जवळ किंचाळली हो नेहा तू बाबांना भेटायला आल्यावर मी तुला सांगणार होते. आग काय बोलतेयस तू आई, कस शक्य आहे आता इथे बाहेर मला रघूने सोडल. मी खर सांगतेय आई थांब तू मी आलेच त्याला घेऊन अस म्हणत नेहा बाहेर गेली. आग नेहा ऐक माझ, पण  ते ऐकायला नेहा तिथे नव्हतीच, ती पळत पळत बाहेर आली पण तिथे कोणीच नव्हतं ना रघू ना त्याची गाडी. नेहा पुरती हादरली, ती मटकन घराच्या अंगणात बसली आणि इतक्यात तिला रघूचे शब्द आठवले 
'मी कधीही तुझी साथ सोडणार नाही प्रॉमीस' 
रघूने त्याच प्रॉमीस पाळलं होत.

©®शिल्पा केतकर 🌹 🌹.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...