शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

1467. मोबाईल

  चार वर्षाची पल्लवी, माझी नात, आज आदळ आपट  करतच शाळेतून  घरी आली आणि गाल फुगाटून कोपऱ्यात जाऊन बसली. हु...नाही... का... चु... नाही. 
  खूप लाडीगोडी लावली. बाईसाहेब ढंम्म. पुन्हा तिच्या जवळ जाऊन विचारले. "काय झालं माझ्या बबडीला?"
"मस्ती केली म्हणून टीचर रागावली का?"
"का नीताने कट्टी घेतली"?
 "कुणी काही बोलले का माझ्या पल्लूला"?
  म्हणते कशी, माझी सगळ्यांशी कट्टी. आजी, "मला तुझ्याशी पण नाही बोलायचे". मी म्हणाले नकोच बोलू. "खरंच नको बोलू." पण बाळा मला ह्या सगळ्यांचे कारण कळेल का? मग आपण कट्टी करू. मग हळूहळू सावरत म्हणाली, खरं तर आजी मला तुझ्याशीच कट्टी घ्यायची आहे. मी म्हणले फक्त माझ्याशी  ?
 हो... हो...! 
फक्त तुझ्याशीच !  
ते का बुवा ! 
मग म्हणाली , आजी त्यादिवशी तुला बाबा म्हणाले, आई तुला चांगला मोबाइल घेऊन देतो तर तू नको म्हणाली. तू बोलली बाबांना तेव्हा मी ऐकत होती. तू म्हणाली,  "नको रे तो मोबाइल मला!" 
  "मला काय तुझे ते वायफाय वापरून हायफाय व्हायचे नाही!" मला नुसता फोन करायचा आणि आलेला उचलायचा ! 
 काय करायच त्याच ? 
  बाकी सगळा वेळ ती छोटी मुलं नुसता तो मोबाइल घेऊन बसतात , गेम खेळत . घराघरात तेच रूप दिसतं रे ! 
  नकोच तो डोक्याला ताप ! 
पल्लू त्यापासून दूर आहे तेच बरं ! आजी तुला  माहित आहे. आज आमच्या वर्गातली मुलगी, समीक्षा नाव तिचे , तिला किती गेम खेळता येते मोबाइल वर ! 
 बापरे..! "आजी ती जॅम हुशार आहे."  इतकच नाही आजी तिला सगळे कार्टून शो माहित आहे. खूप हुशार आहे ती  ! 
मग माझ्या लक्षात आले ही का रागावून बसली ते ! 
  मग मी तिला कडेवर उचलून घेतले. बाहेर बागेतल्या चिमण्या दाखवल्या, हरखून गेली.  खूप छान फुलांवर फुलपाखरे बसली होती.  त्याच्या मागे पळाली. फुलपाखरा मागे पळण्याचा तिला छंदच होता. दमून पुन्हा घरात आली. डोक्यातून मात्र मोबाईलचे भूत जातच नव्हते
   पुन्हा म्हणाली आजी तू मोबाइल घेऊन माग बाबांना . मी पुंन्हा तुझ्याशी बट्टी करते. असं होय ! ठीक आहे पल्लू  ! 
  मी बाबांशी उद्या रात्री बोलते. ती हट्टालाच पेटली, म्हणाली नाही आजी ,आजच बोल. मग आजी तिला म्हणाली , पल्लू मी बाबांशी आजच बोलते पण तू  उद्या तुझ्या त्या समीक्षाला मी सांगते ते विचार. काय विचारू आजी...? 
  तिला विचार, "तुझे आजी आजोबा कुठे आहे"?
  "तुला चिऊ काऊ च्या गोष्टी माहित आहे का "?
   "तू रोज देवाजवळ शुभंम्  करोती म्हणते का"? 
  "तुझे आई...बाबा..तुला रोज झोपतांना छानछान गोष्टी सांगते का"?
  "आजी कुशीत घेऊन अंगाई गीत गाऊन झोपवते का" ? 
  "रोज बागेत खेळायला जाते का "? 
"रोज संध्याकाळी जेवतांना तुला आईबाबा दिवसभर काय काय केलं हे विचारते तसं विचारतात का "? 
"जेवायचं कंटाळा करतेस तर मायेने भरवतात का" ? 
  यातले तुला जितके आठवतील तितके प्रश्न विचारून ये. आजी मग तू नक्की मोबाईल घेऊन मागशील बाबांना ? 
  अग पल्लू मला बाबांना मोबाईल घेऊन नाही मागायचा बाळा त्याला फक्त सांगायचे आहे ,लगेच आणून देईल. 
 खरंच आजी तू घेशील मोबाईल ? हो राजा नक्की घेणार. 
  आता बट्टी का ? 
 का आत्ता पण कट्टी ? 
  आजी आता बट्टी ? 
बर जेवली नाहीस ,जेवायचे न आता. हो आजी, जोरात भूक लागली. आजी तूच भरवं ग आज आणि मग मी तिला चिऊकाऊ च्या गोष्टी सांगत एकेक घास भरवला. 
I LOVE YOU आजी म्हणून दुपारी बिलगून झोपी गेली. माझी झोप मात्र पळाली . सायंकाळी दूध पिऊन जवळच्या बागेत खेळायला गेलो. दिवसागणिक खरंच खेळणाऱ्या मुलांची संख्या कमी कमी दिसू लागली . डोक्यात लगेच पल्लवीचे विचार. किती आहारी गेलेत न ही छोटी मुलं त्या मोबाईल च्या ? मैदानी खेळच विसरून गेले . "बिच्चारी ती पोरं!"
 ₹अन बिच्चारे ते आईबाप!" 
दोघांची पण किवच आली...
घरी आले, हातपाय धुऊन शुभंम् करोती म्हणून ती अभ्यास करायला बसली. हल्ली नर्सरी मध्ये पण अभ्यास   असतो ? 
तेवढ्यात दीपिका आली. मग मायलेकी स्वैपाकघरात  गप्पा मारत बसल्या. मी भाजी चिरून वरच्या कामाला मदत केली. एवढ्यात सुहास पण आला. तो फ्रेश होऊन मग जेवायलाच बसलो. पल्लूच्या डोक्यातून मोबाईलचे खूळ गेलेच नव्हते. सुहासला म्हणाली बाबा  ! उद्या आजीला मोबाईल घेऊन द्या ! मी सुहासकडे पाहून डोळे मिचकावले .
 हो रे सुहास ! 
मला खरंच तो स्मार्ट फोन घेऊन दे ! पल्लूची आजी पण स्मार्ट व्हायला पाहिजे ! 
 गप्पा गोष्टी करत जेवण आटोपले . आईबाबांकडून गोष्ट ऐकून, माझ्याकडून अंगाई ऐकुन झोपी गेली. सकाळी जातांना म्हणाली, बाबा आजीला फोन?
   मला म्हणाली आजी मी नक्की विचारते बर का समीक्षाला ?
 टाटा करून रिक्षात जाऊन बसली. समीक्षा कडून सगळ्या प्रश्नाचे उत्तर घेऊन आली. आल्याआल्या म्हणाली, आजी !  आजी !  वृद्धाश्रम म्हणजे काय ग ? 
  पल्लू आता हे काय नविन ? 
अग आजी नविन नाही . 
तूच बोलली न समीक्षाला विचार,  तिचे आजीआजोबा कुठे आहेत ते ? 
 हो मग ! 
तर ती म्हणाली वृद्धाश्रमात ! 
 आजी सांग न काय असते वृद्धाश्रम ? 
ती काय बोलली तुला पल्लू  ? 
 ती म्हणाली, माझ्या आईचे आणि आजीचे सारखे भांडण व्हायचे , मग आई बाबांना बोलली या घरात या तर तुमची आई राहील , या तर मी. थोडेच दिवस झाले. आजी आजोबा तिकडे गेले. अजून काय सांगितले तिने. ?
  ती म्हणाली , आजी आजोबा माझे खूप लाड करायचे. गोष्टी सांगायचे ,फिरायला घेऊन जायचे. मला खूप आवडायचे. पण आईला का आवडत नव्हते मला नाही माहित ग ? 
 आजी...! मग मी तिला विचारले ...आता तू कोणाजवळ असतेस  दिवसभर ? तर म्हणाली...बाई जवळ ! 
मग म्हणाली, आजी होती न तर खूप लाड करायची माझे . माझ्या आवडीचे छान छान पदार्थ करून भरवायची. आता मी जेवले नाही तर ती बाई भरवत पण नाही. कधी कधी तशीच झोपते मी. ती मला खेळायला पण घेऊन जात नाही. मग मला कार्टून लावून देते. मी गुपचूप बघत बसते. मी खूपच हट्ट केला तर ती तिचा मोबाईल देते game खेळायला. खेळत बसते मग.
 आईबाबा घरी येतात. मग त्याचे भांडण सुरु असते. आजीआजोबा गेले तर बाबा खूप दुःखी झाले माझे. मला पण त्यांची खूप आठवण येते. मी आजी गेली तेव्हा आईला बोलले. आई ! आजी आजोबांना आण ना घरी ! तर मला म्हणाली ,तुलाच आता पाळणा घरात ठेवते. मोठा पुळका आजी आजोबांचा. 
  आजी मग मला तर तूच दिसली ग. 
किती काळजी घेते माझी ? 
आई पण तुझ्याशी कधीच भांडत नाही. खूप चांगली आहेस तू आणि आई पण. पण पल्लू उद्या मी पण जाते त्या वृद्धाश्रमात. 
का ग आजी...? 
अग तुला game खेळायला मिळेल न मग ! 
लाड करायला, गोष्टी सांगायला, बागेत फिरायला, शुभम् करोती म्हणायला , अंगाई गाऊन झोपवायला कोणीच नाही. मग मस्त कार्टून आणि गेम खेळायचे त्या समीक्षा सारखे. 
 आजी खरंच मला वाटलं समीक्षा खूप हुशार आहे. पण आजी आज ती खूप रडली. मला म्हणाली किती छान न ! तुला आजीजवळ राहायला मिळते .मला त्या बाईच्या सोबत राहावे लागते .अजिबात आवडत नाही ग ! 
पण या आईला कोण समजावून सांगणार ! 
मला काय हवे ते ! 
म्हणून मग असा time pass... कधी गेम खेळून...तर कधी कार्टून बघून....
       आजी नकोच घेऊ तू तो मोबाईल .मला माझी आजीचं पाहिजे आणि तू संगीतलेल्या गोष्टी. आईबाबा आल्यावर त्याच्या सोबत धमाल मस्ती. अरे माझं शहाण  पिल्लू  . 
  मग मला सांग कोण हुशार आहे ? आजी ! मीच हुशार आहे ! 
हो... नं... ग..! 
हो... रे ...माझ्या राज्या... माझी पल्लू खूप खूप हुशार आहे...आणि पल्लू  आजी आजी करत माझ्या कुशीत शिरून निजून गेली...
      समाप्त.....

 ©️®️   सौ प्रभा कृष्णा निपाणे  कल्याण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...