नेहा ला संपूर्ण रात्र झोप आली नाही. तिने बाजूला गाढ झोपेत असलेल्या अनिल कडे कितीतरी वेळा बघितले. ती मुलांच्या खोलीकडे दोन तीनदा चक्कर ही मारून आली होती. संपूर्ण रात्र तिची बेचैन अवस्थेत गेली होती की माहीत नाही उद्या पासून तिच्या मनाची काय अवस्था होणार आहे. सकाळच्या विमानाने तीची जेठानी मीना ची छोटी बहीण अंजली येणार होती. नेहाच्या लग्नाला सात वर्षं झाली होती. अजून तिने अंजली ला बघितले नव्हते, फक्त तिच्या विषयी ऐकले होते.
नेहाचे लग्न होऊन पंधरा दिवस झाले होते तेव्हा एके दिवशी मीना ने सहज हसतहसत नेहाला सांगितले होते, ‘‘अनिल ला तर अंजली खूपच आवडत होती. जर अंजली ने आपल्या करियर ला इतके महत्त्व दिले नसते, तर आज तुझ्या जागी अंजलीच माझी दिरानी राहिली असती. तिला दिल्लीला एका कंपनीत मोठ्या पदावर नौकरी मिळाली म्हणून ती प्रेम वगैरे सर्वावर पाणी सोडून दिल्लीला निघून गेली. तिने लखनऊ येथे आपल्या या घरी राहूनच तर एमबीए चं शिक्षण पूर्ण केलं होतं. अंजली ला लवकर लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं. तेव्हा आई व बाबांनी अनिल साठी तुला पसंत केले…अनिल तर लग्नाला तयारच होत नव्हता.’’
‘‘मग हे कसे तयार झाले ?’’ नेहा ने विचारले होते.
‘‘जेव्हा अंजली ने त्यावेळी लग्न करायला नकार दिला… तेव्हा आईंनी समजावल्यावर मोठ्या मुश्किलीने तयार झाला होता.’’
नेहा चुपचाप अनिल ची निष्फळ प्रेमकथा ऐकत राहिली. रात्रीच अंजली चा फोन आला होता. तिची लखनऊ ला बदली झाली होती. ती सरळ येथे त्यांचेकडेच येणार होती. नेहाला माहित होते की अंजली ने अजून लग्न नाही केलं आहे.
मीना तर रात्रीपासूनच आनंदाने बडबडत होती, ‘‘अंजली आता येथेच राहील, मग किती मजा येईल नेहा, तु तर पहिल्यांदा भेटशील तीला… बघशील, किती सुंदर आहे माझी बहिण.’’
नेहा वरवर दाखवण्यापूरतं हसत राहिली. तिचं सारं ध्यान अनिल वर केंद्रीत होतं, पण तीला अंदाज येत नव्हता की अनिल अंजलीच्या येण्याने खुश आहे की नाही.
नेहा व अनिल आणि त्यांची दोन मुलं यश आणि समृद्धि, जेठ सुनील, जेठानी मीना व त्यांची मुले सार्थक आणि वीर, सासू सुभद्रादेवी आणि सासरे केशवचंद, सर्व लखनऊ येथे एकाच घरात खेळीमेळीने रहात होते. त्यांचे आपसात खूपच सामंजस्य होते. सर्व अगदी आनंदात होते, परंतु अंजलीच्या येण्याच्या बातमीने नेहा काहीशी बेचैन झाली होती.
सकाळी नेहा नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागली. मीना तर खूपच आनंदात होती. म्हणाली, ‘‘नेहा, आज अंजलीच्या आवडीचा नाश्ता व जेवण बनवू या.’’
नेहा ने होकार दिला. मग दोघी स्वयंपाकघरात व्यस्त झाल्या. टॅक्सी गेट वर थांबली, तर मीना तिचे पती सुनील यांना म्हणाली, ‘‘बहुतेक अंजली आली वाटतं, आज तुम्ही थोडं उशीरा ऑफिस ला जा.’’
‘‘मला आज काही घाई नाही… अगं, एकुलती एक साली येत आहे ना,’’ सुनील हसला.
अंजली ने घरात येताच सर्वांना नमस्कार केला. मीना ने तीला मिठीत घेतले. मग तिची नेहाशी ओळख करून दिली. अंजलीने जशा नजरेने तिला खालून वर पर्यंत न्याहाळले ते नेहा ला आवडले नाही. तरीही तीने चेहऱ्यावर हास्य ठेवत तीला भेटली. जेव्हा अंजली सर्वांशी बोलत होती तेव्हा नेहा तीला न्याहाळत होती. दिसायला सुंदर, स्मार्ट, केसांचा पोनीटेल घातला होता, छोटा सा टाॅप आणि जीनपॅंट घातलेली नाजूकशी अंजली खूपच आकर्षक होती.
जेव्हा अनिल तयार होऊन आला, अंजली ने लगेच आपला हात पुढे करत म्हणाली, ‘‘हाय, कसा आहेस?’’
अनिल हात मिळवत म्हणाला, ‘‘मी ठीक आहे, तु कशी आहेस?’’
‘कशी दिसते?’’
‘‘अगदी पहिल्या सारखीच.’’
नेहाच्या मनात चलबिचल झाली, पण प्रत्यक्षात तीने मनावर ताबा ठेवत चेहरा सामान्य ठेवला. सुभद्रादेवी आणि केशवचंद अंजलीशी दिल्लीच्या वासृतव्याविषयी चौकशी करत होते. मीना व अंजली चे आईवडील मेरठ येथे रहात होते. नेहा ला आईवडील नव्हते. एक भाऊ आहे जो परदेशात रहात होता. खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांचा नाश्ता झाला. सर्व अंजलीशी बोलण्यात मग्न होते. मुलं पण तिच्या अवतीभवती रेंगाळत होती. यश आणि समृद्धि थोडे संकोचत होते, पण नंतर तिच्याशी चांगलेच मिसळले. नेहा ची बेचैनी वाढतच होती. तेव्हढ्यात अंजली मीना ला म्हणाली, ‘‘दीदी, आता माझ्यासाठी एखादा फ्लॅट शोधून द्या.’’
मीना म्हणाली, ‘‘गप्प बस, आता आमच्या सोबतच रहाशील तू.’’
सुनील पण म्हणाला, ‘‘एकटीने दूसरीकडे रहाण्याची काही गरज नाही. येथेच रहा.’’
सुनील आणि अनिल आपापल्या ऑफिस ला निघून गेले. केशवचंद पेपर वाचायला वागले. सुभद्रादेवी तिघींशी बोलत बाकी कामात मीना आणि नेहा ला मदत करू लागल्या.
नेहा ला थोड़े शांत शांत असलेले बघून अंजली हसत म्हणाली, ‘‘नेहा, तू कायमच अशी गंभीर असतेस का ?’’
मीना म्हणाली, ‘‘अगं नाही, ती तुला पहिल्यांदा भेटत आहे ना… मिसळायला थोड़ासा वेळ लागतोच ना…’’
अंजली म्हणाली, ‘‘मग ठीक आहे, नाहीतर मला वाटले की अशीच गंभीर रहात असेल तर बिचारा अनिल तर कंटाळून जात असेल. तो तर खूपच हसतमुख आहे… दीदी, अनिल अजून तसाच खोडकर, मस्तीखोर आहे की काही बदलला आहे ? आज तर आमचं फारसं बोलणंही झालं नाही.’’
ना हसली, ‘‘सायंकाळी तूच बघून घे.’’
नेहा मनातल्या मनात हिरमुसली होत होती. जेवणानंतर आपल्या खोलीत थोडा आराम करण्यासाठी लवंडली तर तिला लग्नाचे सुरुवातीचे दिवस आठवले. अनिल खूपच गंभीर रहात असे, कधी जास्त हसत बोलत नसे. शांतपणे आपली जबाबदारी पार पाडत होता. नवीनच लग्न झाले आहे असे नेहाला जाणवतही नव्हते. जेव्हा मीना ने अनिल आणि अंजली विषयी तिला सांगितले तेव्हा तीने आपल्या मनावर ताबा ठेवत सर्वांशी प्रेमाने वागत, मान मर्यादा सांभाळत सर्वांच्या मनात घर केले. आता कुठे तिच्या संसाराची गाडी रुळावर आली होती तर आता अंजली येऊन धडकली.
नेहा यश आणि समृद्धि चा होमवर्क करुन घेत होती तेवढ्यात अंजली तिच्या खोलीत आली. नेहाने चेहऱ्यावर जबरदस्ती हसू आणत तिला बसायला सांगितले तर ती सरळ पलंगावर लवंडली. म्हणाली, ‘‘नेहा, अनिल केव्हा पर्यंत येईल?’’
‘‘सात वाजेपर्यंत,’’ नेहा शा़ंत स्वरात बोलली.
‘‘ओह, अजून तर एक तास बाकी आहे… मला तर खूपच कंटाळा आला आहे.’’
‘‘चहा पिणार का?’’ नेहा ने विचारले.
‘‘नाही, अनिल ला येऊ दे, त्याच्या सोबतच घेईन.’’
नेहा ला अंजली चा अनिल विषयी बोलण्याचा ढब काही आवडला नव्हता पण करणार तरी काय.. काही बोलू शकत नव्हती. अनिल आला, त्याला बघून अंजली खूश झाली. मग ड्राइंगरूम मध्ये सोफ्यावर अनिल घ्या शेजारी बसून तिने चहा घेतला. घरातील सर्व जण तेथेच बसलेले होते. अंजली ने माहित नाही किती जुन्या गोष्टी उकरून काढल्या होत्या.
नेहाचा उतरलेला चेहरा पाहून अनिल ने विचारले, ‘‘नेहा, तुझी तबीयत तर ठीक आहे ना? खूपच अस्वस्थ दिसत आहेस?’’
‘‘नाही, ठीक आहे.’’
हे ऐकून अंजलि मोठ्याने हसायला लागली. म्हणाली, ‘‘अरे व्वा अनिल, तु तर अगदीच कर्तव्यनिष्ठ पती झाला आहेस… बायकोची इतकी काळजी घेतोस? ते दिवस विसरलास का जेव्हा मी जायला निघाले तेव्हा मला जातांना पाहून तू किती रडकुंडीला आला होतास ?’’
हे ऐकताच घरातले सर्वच अचंबित होऊन एकदूसऱ्याकडे बघू लागले.
तेव्हा मीना ने तीची बाजू सांभाळून घेत, ‘‘हे काय बोलतेस अंजली… कधी तरी विचार करुन बोलत जा.’’ म्हटलं.
‘‘अगं दीदी, खरं तेच तर बोलते ना.’’
नेहा ने मोठ्या मुश्किलीने स्वतःवर ताबा ठेवला. मनावर दगड ठेवत हसत चहा, नाश्त्याची भांडी उचलू लागली.
सर्वजण थोडावेळ गप्पा मारून आपापल्या कामाला लागले. रात्रीच्या जेवणाच्या वेळीही अंजली अनिल घ्या नावाचा जप करीत राहीली आणि तो ही तिच्या बोलण्याला हसून प्रतिसाद देत होता. दूसऱ्या दिवशी अंजली पण ऑफिस ला गेली. सर्वजण कामावर गेल्यावर नेहा च्या जीवात जीव आला की कमीतकमी सायंकाळपर्यंत तरी तीचं मन शांत राहील.
असेच दिवस जात राहिले. सकाळी सर्वजण ऑफिस ला निघून जात. सायंकाळी घरी परतल्यावर रात्री झोपेपर्यंत अंजली अनिल च्या आसपास घुटमळत रहायची. दिवसेंदिवस नेहाचा मानसिक ताण वाढत चालला होता. आपली मानसिक दशा कुणाला बोलूनही दाखवू शकत नव्हती. काही बोलून स्वतःचा संशयी स्वभाव असल्याचं ही तीला इतरांना दिसू द्यायचं नव्हतं. तीला हे पक्कं माहीत होतं की तीने महत्प्रयासाने अनिल च्या मनात स्वतःची जागा निर्माण केली होती. परंतु आता अंजलीचं उथळपणाचं वागणं वाढतच चाललं होतं. ती कधी अनिलच्या खांद्यावर हात ठेवायची तर कधी त्याचा हात पकडून बाहेर कुठेतरी जाण्यासाठी गळ घालायची. पण अनिल सतत टाळत होता, हे पण नेहा च्या लक्षात आले होते. पण अंजलीच्या वागण्याने तीला आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडत चालल्याचंही दिसत होतं. तिचा संसार मोडणार तर नाही ना अशी तीला सतत भीती वाटत होती. असं जर झालं तर मग काय करेल ती? कुठं जाईल? पुढे कसं होईल? घरातील सर्व जण अंजली च्या वागण्याला अल्लडपणा समजून दुर्लक्ष करीत होते. नेहा आतून हिरमुसली होत होती व मनातल्या मनात घुसमटत चालली होती.
एका रात्री अनिल ने तिला विचारले ‘‘नेहा, काय झालं, आजकाल फार तणावात दिसतेस?’’
नेहा काहीच बोलली नाही. अनिल ने ही मग पुढे काही विचारलं नाही. यावर नेहा चे डोळे भरून आले. तीला वाटले, अनिल ला माझ्या या मानसिक परिस्थितीच्या कारणाचा अंदाज येत नसेल का? इतका कठोर का आहे अनिल? लहान तर नाही, की माझ्या मनाची दशा त्यांच्या लक्षात येत नसेल. मुद्दाम समजत नाही असं दाखवत असतील का? नेहा रात्रभर मनातल्या मनात घुसमटत राहीली. बाजूला अनिल मात्र गाढ झोपेत होता.
एका रविवारी सर्वजण एकत्र बसून जेवण करून थोडावेळ गप्पागोष्टी करून आपापल्या खोलीत आराम करायला निघाले तर स्वयंपाकघरातून निघतांना नेहा ची पावलं अडखळली. अंजली अगदी हळू आवाजात अनिल ला म्हणत होती, ‘‘सायंकाळी सात वाजता छतावर येऊन भेट.’’
अनिल काय म्हणाला ते काही ऐकू आलं नाही. थोड्या वेळाने नेहा आपल्या खोलीत आली. अनिल आराम करायला पलंगावर लवंडला होता. तो नेहा ला म्हणाला, "ये, थोडावेळ तू पण पडून घे.’’
नेहा मनातल्या मनात रागाने धुमसत होती. म्हणून जाणूनबुजून म्हणाली, ‘‘मुलांच्या काही वस्तू आणायच्या आहेत. सायंकाळी बाजारात जाऊ या?’’
‘‘आज नाहीं, उद्या,’’ अनिल म्हणाला.
नेहा ने रागात विचिरले, ‘‘आज का नाही?’’
‘‘माझं बाजारात जाण्याचं मन नाही… आज काही जरूरी काम आहे.’’
‘‘काय जरूरी काम आहे?’’
‘‘अगं, तू तर हात धुवून मागेच लागलीस, आता मला जरा आराम करू दे, आणि तू पण आराम कर.’’
नेहा रागाने फणफणली. विचार केला, सांगावं की काय जरुरी काम आहे ते तीला माहीत आहे. पण गप्प बसली. आता काय आराम करायचा होता. बस थोडं इकडून तिकडे कूस बदलून उठली आणि तेथेच खोलीत खूर्चीवर बसून काहीबाही विचार करत बसली. सात वाजता काय घडणार आहे याविषयी नकोनको ते विचार करून करून तिचं डोकं शिणलं होतं.. काय करावं, याविषयी आई बाबांशी बोलावं का?, नाही नाही, त्यांना कशाला त्रास द्यायचा. काय बोलायचं असेल अंजली ला अनिल शी, अनिल काय म्हणतील… तिच्याशी बोलतांना तर खूप खुश दिसतात.
सात वाजेच्या आसपास नेहा मुद्दाम मुलांचा अभ्यास घ्यायला बसली होती. आईबाबा बागेत फिरायला गेले होते. मीना आणि सुनील त्यांच्या खोलीत होते. त्यांची मुलं खेळायला गेली होती. मानसिक तणावामुळे नेहा ने यश आणि समृद्धिला खेळायला जाऊ दिले नव्हते. मुलांमध्ये मन रमवण्याचा असफल प्रयत्न करतांना तीने बघितले कीअनिल गुणगुणत केस विंचरत होता. तीने विचारले, ‘‘कुठे निघालात का?’’
"का?’’
‘‘केस विंचरत आहात.’’
अनिल ने तिला चिडवण्याच्या स्वरात म्हटले, ‘‘का, कुठे जायचं असलं तरच भांग पाडतात का ?’’
‘‘तुम्ही प्रत्येक गोष्टीचं तिरसट उत्तर का देता ?’’
‘‘मी आहेच तिरसट… बस्स? जाऊ आता?’’
नेहा चे डोळे भरून आले, पण काही बोलली नाही. यश ची वही बघू लागली. अनिल शिळ वाजवत खोलीतून बाहेर पडला. पाच मिनीटांनंतर नेहा मुलांना म्हणाली, ‘'मी लगेच आली, तुम्ही येथेच थांबा,’’ आणि खोलीतून निघून गेली.
अनिल छतावर पोहोचला होता. नेहा पण पायऱ्या चढून छताच्या दाराच्या आडोशाला उभी राहून आवाज न करता श्वास रोखून उभी राहिली व कान देऊन ऐकू लागली.
तेवढ्यात अंजली चा आवाज आला, ‘‘बराच वेळ लागला यायला?’’
‘‘बोल अंजली, तुला काय बोलायचं आहे ?’’
‘‘अरे हो हो, इतकी पण काय घाई आहे ?’’
नेहा ला त्यांच्या बोलण्यातील शब्द न शब्द स्पष्ट ऐकू येत होता. इतक्यात अनिल चा गंभीर आवाज आला, ‘‘बोलणं सुरू कर अंजली.’’
‘‘अनिल, येथे येण्यासाठी सर्वात जास्त उत्सुक मी यासाठी होते की आपली पुन्हा भेट होईल, पण तुला पाहून तर वाटतं की तु मला पुर्णपणे विसरला आहेस. मला तर वाटलं होतं की माझं करियर स्थिरस्थावर होईपर्यंत तू माझी प्रतिक्षा करशील, पण तू तर लग्न लावून बायको मुलांच्या गोतावळ्यात गुंग झालास. बघ, मी अजून लग्न नाही केलं, तुझ्याशिवाय मला दूसरा कुणी आवडलाच नाही. असं नाही होऊ शकत का की काही तरी करून आपण पुन्हा एकत्र येऊ ?’’
‘‘अंजली, तू आज ही पहिल्या सारखीच स्वार्थी आहेस. मी मानतो की नेहा शी लग्न करणे हा माझ्यासाठी एक समझोता होता, आपल्या साऱ्या भावना तर मी तुला सोपवून बसलो होतो. वाटत होतं नेहा ला कधी ते प्रेम नाही देऊ शकणार, ज्याची ती हक्कदार आहे, पण हळूहळू हा विश्वास एक भ्रम असल्याचं सिद्ध झालं. तिच्या प्रेम आणि समर्पणाने माझं मन जिंकून घेतलं. आमच्या घराचा कोपरा न कोपरा तिने सुख शांति आणि आनंदाने भारुन टाकला. आता नेहा शिवाय जगण्याचा मी विचार ही करू शकत नाही. जसजशी ती माझ्या जवळ येत गेली, तुझ्या विरहामुळे असलेल्या माझ्या तक्रारी, राग, दुखणे जे माझ्या हृदयात होते, ते सर्व लोप पावलं. आता माझ्या मनात तुझ्याविषयी तशा काहीच भावना नाहीत. मी नेहा बरोबर खूप आनंदात आहे.’’
दाराजवळ कान देऊन ऐकणाऱ्या नेहा ला अनिल च्या आवाजात सुख आणि संतुष्टी अगदीच स्पष्टपणे जाणवली.
अनिल पुढे म्हणत होता, ‘‘तू वहिनींची बहिण या नात्याने येथे आरामात राहू शकतेस परंतु माझ्याशी कुठलाही नात्याविषयीचे गैरसमज डोक्यात ठेवून येथे राहू नकोस. माझ्या मते, तुझं येथे रहाणं ठिक होणार नाही. तुझ्या कुठल्याही वागण्याने नेहा चं मन दूखावलं गेलं तर ते मी सहन करणार नाही. जर येथे रहायचं असेल तर आपल्या मर्यादेत रहा.’’
यापुढे काही ऐकण्याची नेहाला गरज उरली नाही. तीला आपलं मन मोरपिसासारखं हलकं झालेलं जाणवलं. तिचे डोळे भरून आले. ती वेगाने पायऱ्या उतरत मनातल्या मनात हा विचार करत हसू लागली की 'तिरसट आहे, पण माझा आहे...'. 'टेढा है, पर मेरा है'.
मुळ हिंदी कथा लेखक - अनामिक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा