वयाच्या चाळीशी मधे एक स्किल प्रत्येकाने आत्मसात करायला शिकले पाहिजे ते म्हणजे. emotional independance. म्हणजेच भावनिक दृष्ट्या समोरच्यावर अवलंबून राहणं हळूहळू सोडलं पाहिजे.
प्रेम द्यावं, काळजी घ्यावी पण मला कुणी प्रेम दिले तर मी खुश, मला कुणी काही बोललं तर मी कुढणार, मला कुणी अपमानास्पद बोललं तर मी ताबा सोडून रागात बोलणार, मला कुणी टाळलं की मी एकटेपण feel करणार, कुणी नीट बोललं नाही की माझं मन वरखाली होणार आणि मी विचार करत बसणार, "काय झालं असेल?" हे सगळं म्हणजे भावनिक दृष्ट्या आपण इतरांच्या प्रतिक्रियेवर आपलं मन अवलंबून ठेवणं आहे. हे थांबवायला हवं. आपल्या खुश राहण्याचा आणि इतरांनी काही वागण्याचा अर्थाअर्थी संबंध नसतो. तो आपण लावतो. basically जग इकडचं तिकडं होवो, मी मेंटली स्टेबल राहणार, आनंदी राहणार, स्वतःला manange करत राहणार. हा एक निश्चय असतो, तो करायला शिकलं पाहिजे. याने काय होईल?
1)लोकांमध्ये लक्ष लावून बसणं कमी होतं.
2) गॉसिप पासून आपण लांब राहतो.
3) आपल्याला खुश करण्यासाठी wrong कंपनी निवडण्यापासून आपण वाचतो.
4) कुणी कसही वागलं तरी आपली मानसिक स्थिती ठीक राहते.
5) मन ठीक आणि शांत राहिल्याने तब्बेत पण ठीक राहते.
6) आपण स्वच्छ चष्म्याने सगळ्यांकडे पाहू शकतो कारण मला कुणाकडून काही नकोय हे आपण मनातून ठरवतो.
7) यामुळे लबाड नाती आपोआप दूर राहतात, स्वार्थ नसताना जुळलेली नातीच. खरी टिकतात.
8) कुणी कसंही वागो ती जबाबदारी त्यांची असते त्यापायी. आपण स्वतःला त्रास करून घेणं थांबवतो.
9)मनाची स्थिरता वाढल्याने आपण जास्त active आणि creative होतो, आनंदी राहतो.
10)एकटे आलो, एकटेच जाणार आहोत या अंतिम सत्याला आपलंसं करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जातो.😊
कुठेतरी आपण आणि दुसरे यात जी सीमा असते ती जाणून घ्यावीच लागते, या वयात ही detachment जमू शकते करण संसार जवळपास झालेला असतो, (mostly) मुलं मोठी असतात, त्यांना आपापलं एक आयुष्य असतं त्या पण दृष्टीने आपण त्यांच्यात डोकावणं चबढब कमी करावं. सगळ्यात महत्त्वाचं या वयाला आपली सेकंड इनिंग समजून काही चांगलं करण्यात मन रमवावं. यासाठी emotionally independent असणं हे फायद्याचं ठरतं. देवाघरी जाण्या आधी मन साफ करत जावं. ती process या वयात सुरू करावी. आपण स्वतःला माफ करावं, इतरांना करावं आणि स्वतःला उत्तम कामामध्ये गुंतवून घ्यावं. मदतीला तयार राहावं, मात्र आपल्याला शक्यतो मदत घ्यायची नाही असं समजून स्वतःला सदृढ बनवावं. मन आणि शरीराने.
याचा फायदा हा की साठीपर्यंत भावनांमुळे आपल्याकडून झालेल्या चुका किमान त्या आता तरी आपण करणार नाही. आणि एक stable शांत आणि समाधानी आयुष्य जगण्यात एक पाऊल पुढे जाईल👍 😊
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा