रेवार्ध पाटील यांचे आणि मनाली गोडसे यांचे लग्न होऊन आज 6 महिने पूर्ण झाली आहेत तरी अजून यांच्या नात्याची सुरुवातच नाही झाली. का ते जाणून घेण्यासाठी वाचूया ही कथा रेवार्ध च्याच भाषेतून तर चला पाटील house कडे.
पाटील House. मी रेवार्ध. आज आमच्या लग्नाची 6 month anniversary आहे तरी आम्ही अजून एकमेकांशी कामा व्यतिरिक्त काहीच बोललेलो नाहीये त्याला कारण पण तशीच आहेत म्हना ती सुंदर शिकलेली well educated आणि मी एक अपंग व्यक्ती. हो मी अपंग आहे माझा एक पाय निकामी आहे मी प्रत्येक गोष्टी साठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा काही करू शकत नाही मी नेहमी व्हीलचेअर वरच असतो. ऑफिस मध्ये अस काही नाही वाटत पण घरी आल्यावर ती समोर असून पण तिच्या नसण्या सारखं राहण मला खूप त्रास देत. मी खूप प्रयत्न केले तिच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा पण सगळ व्यर्थ ती ने कधीच काही सांगितलच नाही पण मला अजून पण असच वाटत तिच्या मनात माझ्यविषयी काही तरी नक्कीच आहे नाही तर मी divorce बद्दल बोललो तेव्हां तीच ते ओरडणं मला 2 दिवस टिफीन नं बनऊन देणं काही तरी वेगळाच अनुभव होता पण अजून हि ती माझ्यासोबत मोजकच बोलते. आज तिला wish करायची खूप इच्छा आहे पण भीती वाटतेय काय करेल ती कशी रिॲक्ट होईल.
रेवार्ध ची रूम
रेवार्ध:- मनाली थोड बोलायचं होतं तुझ्या सोबत फ्री आहेस का?
मनाली:- हा बोलाना. मेन म्हणजे मलापण तुमच्या सोबत बोलायचय थोड तुम्हाला आठवत का आज काय आहे?
रेवार्ध :- आज तर आपल्या लग्नाची...नाही काही नाही मला नाही माहित आज काय आहे...तूच सांग काय आहे ते.
मनाली:- अहो असे कसे विसरलात तुम्ही आज तर आपल्या लग्नाची 6month anniversary आहे. मला वाटले ल तुम्ही मला wish करण्यासाठी बोलावले होते 😔 पण राहूदे तुम्हाला तर हेच माहित नाही तर wish kay करणार🙄.बर हे जाऊदे तुम्ही बोला काय बोलायचं आहे तुम्हाला. मला झोपायच आहे वेळ होतोय. 😒
मनाली बोलणं ऐकून रेवार्ध पूर्ण पणे ब्लँक झाला होता त्याला विश्र्वासच बसत न्हवता की मनाली खरंच अस बोलली की त्यालाच भास होत आहेत.
रेवार्ध:- मनाली तू आता खरंच आपल्या Anniversary बद्दल बोललीस की माझे कान वाजत आहेत 🤔
मनाली :- तुम्हाला एकायला येतं की मी खरंच आपल्या Anniversary बद्दल च बोलले. actually मला तुमच्याशी थोड महत्वाचं बोलायचं आहे. i am really sorry 😔😔.
रेवार्ध :- काय झालं अशी का बोलत आहेस. मला काहीच समजत नाहीये. तू सगळ स्पष्ट बोल तुला काय बोलायचं आहे ते
मनाली:- खरचं मला माफ करा की मी आज पर्यंत तुमच्यासोबत तुटक वागले. तूम्ही किती चांगले आहात हे माहीत असून तुमच्या सोबत विचित्र व्यवहार केला. पण तुम्हाला दुखवताना मला पण तितकाच त्रास झाला होता मी काहीच मुद्दामहून नाही केलं. मी खर सांगतेय. 🥺
रेवार्ध:- मनाली तू आज अचानक या गोष्टीनं बद्दल का बोलतियेस मला जरा नीट सांगशील काय झालंय? आईं बाबा काही बोललेत का तुला मी विचारू का त्यांना.
रेवार्ध च्या या बोलण्यावर मनाली डायरेक्ट उठून रेवार्ध च्या मांडीवर जाऊन बसते आणि त्याला घट्ट मिठी मारते. रेवार्ध ल 440चा करंट लागतो तो तिला काही बोलणार तो पर्यंत मनालीच बोलायला सुरुवात करते.
मनाली:- आज पण तुम्ही माझाच विचार करताय ना. इतकं चांगल वागणं तुम्हाला जमत कस. माझ्या इतक्या वाईट वागण्याने देखील तुम्ही अजुन माझाच विचार करताय. खरंच मी खूप लकी आहे कारण तुम्ही माझ्या लाईफ मधे आहात. मी आज तुम्हाला सगळ सांगणार आहे मी का तुमच्या पासून लांब राहिले. मी का तुमच्या सोबत तुटक वागले. सगळ काही.
आपल्या लग्नाच्या अगोदर कॉलेज मध्ये असताना माझं धीरज देशमुख नावाच्या मुलावर खूप प्रेम होते मी त्याच्यासाठी काही पण करायला तयार होते पण कदाचित मी माझ्यासाठी चुकीच्या व्यक्ती ची निवड केली होती कारण त्याच तर कधी माझ्यावर प्रेमच न्हवत😔. होती ती फक्त हवस. माझ्या शरीराची. त्याच्यासाठी माझ्या मनातल्या भावना काहीच उपयोगाच्या न्हवत्या त्याला तर फक्त माझा शरीर हवं होतं पण मी या गोष्टींचा विरोध केला मला हे सगळ मान्य न्हवत जरी मी गरीब घरातली असली तरी मला या सगळ्या गोष्टी चुकीच्या वाटल्या आणि त्यामुळेच मी त्याला लग्नासाठी विचारल तर, त्याने मला साफ नाकारलं मला म्हणाला तुझ्या सारख्या 56 पोरी माझ्या मागे पुढे करतात आणि मी तुझ्या सोबत लग्न करू. या गोष्टीचा मला खूप त्रास झालं तेव्हां पण काही दिवसांनी बाबांची तबियत खूपच बिघडली hospital मध्ये सांगितल लवकरात लवकर ऑपरेशन करायला हवं नाहीतर 🥺मी खूप खचले होते त्यातच आत्तू ने तुमच्या स्थळा बद्दल सांगितल बाबांचं ऑपरेशन देखील तुम्ही करून द्याल म्हणाली म्हणून मी लग्नाला तयार झाले पण मला हे माहीत न्हवत की तुम्ही अपंग आहात मला तर ते लग्नात समजल. रेवार्ध मनाली च बोलणं ऐकून शॉक झाला होता कारण त्याने त्याच्या आई बाबांना आधीच सांगितल होत की मनालीला सांगा की तो अपंग आहे त्याला खूप वाईट वाटत होतं की तिने इतक्या सगळ्या गोष्टी सहन केल्या आहेत फक्त आपल्या बाबांचं ऑपरेशन व्हावं यासाठी एका अपाहिज व्यक्ती सोबत लग्न करायचे सोपं नसतं. तो तिला तसेच बसउन तिचे डोळे पुसत होता आता पर्यंत तिने रोखलेले सगळ्या अश्रूंना ती मोकळीक देत होती आणि ते पण त्यांचे बंध तुटल्या सारखे वाहत होते. पण तिचे अश्रू पाहून रेवार्ध ला मात्र खुप त्रास होत होता. तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली.
मनाली:- मला आधीच प्रेमात धोका मिळाला होता आणि त्यात तुमचं ही हे सत्य मला लग्नात समजल त्यामुळे मला ,
तुम्ही पण तसेच वाटलेला म्हणून मी तुमच्या सोबत अशी वागत होती पण तुमच्या सोबत तुटक वागत वागत मी कधी तुमच्या प्रेमात पडले मला खरतर समजलच नाही आणि त्या दिवशी तुम्ही मला divorce बद्दल विचारल मला वाटलं मी tumhla आवडत नाही म्हणून तुम्ही मला divorce देताय. तुम्ही मला सोडून जाल म्हणून त्या दिवशी मी हक्काने भांडत होते. तुमचा राग करत होते. मला वाटलं तुम्ही मला एकदा तरी सांगाल की तुमच्या मनात माझ्यविषयी काय आहे पण तुम्ही मला अजुणपन नाही सांगितल मग आज ठरवलंच की स्वतःच तुम्हाला सगळ सांगायचं. सकाळी बाबा आणि आई बोलले मला की तुम्ही तुमचे हे सत्य मला आधीच सांगणार होता तुम्ही आईनं सांगितल होता सांगायला पण माझ्या आत्तु ने नाही सांगितल मला. खरंच मला माफ करा मी खरंच खूप प्रेम करते तुमच्या वर प्लिज मला तुमच्या पासून वेगळं नका करू. I love you so much. I can't loose you. please forgive my every single mistek. I love you bottom of my heart ❤️❤️
मनाली च बोलणं पूर्ण झाल्यावर रेवार्ध ने मनाली ला कडकडून मिठी मारली 6 महिने त्याने वाट पहिली होती तिची. तिच्या प्रेमाची आणी आज त्याला त्याच प्रेम त्याची मनाली मिळाली होती.
रेवार्ध:- किती वेळ लावलास. 6 महिने वाट बघावी लागली तुझी. खरंच माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला first time जेव्हां photo मध्ये बघितलं होत तेंव्हां पासून प्रेम करतो तुझ्यावर आणि आज मला माझं प्रेम मिळालं खर तर मला कधी तुझ्या तुटक वागण्याचा राग आलाच नाही तर माफ करायचं प्रश्नच येत नाही आणि जरी तुला माफी हवी असेल तर तुला शिक्षा मिळेल ती पूर्ण करावी लागेल बोल आहे मंजूर😉
मनाली:- शिक्षा कोणती शिक्षा 🤔तुम्ही मला उठाबशा काढायला सांगणार आहात 😔
रेवार्ध:-ohh ...my sweet wife... मी तुला उठाबशा काढायला नाही सांगणार तर तू अशीच नेहमी माझ्या सोबत ,
रहा हीच तुझी शिक्षा असेल for end of life...love u so much my dear wife....❤️❤️....Happy 6 month Marriage anniversary my love...💕💕
मनाली:- same to you my sweet hubby...😘❤️
... समाप्त
प्रेरणा सुतार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा