(साधारण पणे अस निदर्शनास येते की जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा आई तिची मैत्रीण बनते आणि तिला योग्य मार्गदर्शन करते पण जेव्हा मुलगा वयात येतो तेव्हा वडील मात्र तितक्याच मोकळेपणाने मुलाशी नाही बोलत.
म्हणून ...... एका वडिलांनी मुलाला लिहिलेलं एक पत्र.....
कदाचित पालकांना त्याचा फायदा होईल )
प्रिय बाळा
सर्वप्रथम 12 वीत चांगले मार्क्स मिळवल्याबद्दल तुझे परत अभिनंदन 💐 आता तू दुसऱ्या मोठ्या शहरात शिकायला गेला आहे आणि बऱ्यापैकी तू स्थिरस्थावर झाला असशीलच या नवीन जगात वावरतांना तुला खूप गोष्टी शिकायला मिळतील आणि खूप गोष्टी टाळाव्या ही लागतील. तुमची पिढी आमच्या पिढीपेक्षा हुशार आहे यात दुमत नाहीच पण तरी काही गोष्टीया अनुभवाच्या शाळेतच शिकायला मिळतात त्या अनुषंगाने हे उपदेश कमी पण मार्गदर्शन असेच समजून वाच ..... एव्हाना तुला लक्षात आलं असेलच घरात शेर असणारा तू आणि आम्हाला बऱ्याच गोष्टी कळत नाही म्हणणारा तू ....बाहेरच्या जगात कुठ आहे 😄 तुझ्या पेक्षा सर्वच बाबतीत वरचढ मुले तुला भेटले ही असतील ...असो आज मी तुला काही महत्वाचे सल्ले देणार आहे जे तुला आयुष्यभर उपयोगी पडतील
1) नवीन कॉलेजमध्ये मध्ये मित्र निवडतांना शक्यतोवर आपल्या पेक्षा सरस किंवा बरोबरीचे मित्र निवड (वैचारिक आणि शैक्षणिक पातळी बद्दल बोलतो)
2. वाईट मार्गावर जायला तुला इथं बरीच प्रलोभने ही दाखवली जातील. या तरुण वयात सिगरेट, घुटका, दारू हे करणं म्हणजे thrilling वाटत पण हे तू कटाक्षाने टाळायलाच हवं. फक्त एक वेळा घेऊन बघ म्हणत सुरू झालेला हा प्रवास न संपणारा असतो हे कायम लक्षात ठेव. यात कोणतही thrilling नसतंच कधी
3. दुसरा महत्वाचा मुद्दा - या वयात तूला मुलींबद्दल आकर्षक वाटणे स्वाभाविक आहे. पण त्याला काही मर्यादा नक्कीच असाव्यात. मैत्रीण असणं काहीच गैर नाही आणि प्रत्येक मैत्रिणीला बहीण मानन ही जरुरी नाही. पण मैत्रीत समोरचा दुखावला जाणार नाही ही काळजी घेणं जरुरी आहे आणि मुलींचा आदर करणं ही तितकंच महत्वाचे आहे हे लक्षात असू दे. प्रेमात पडण्याच तुझं हे वय नाही त्यामुळे त्या भानगडीत आता न पडलेलंच बर. जेव्हा तुमच्यात स्वतः च्या हिमतीवर तिला पोसायची तयारी असते किंवा स्वतःचे विश्व निर्माण करायची तयारी असते तेव्हाच याचा विचार करावा.
4.आता तुझ्या कडे मोबाईल असल्याने दुनियेत मेरी मुठ्ठी मे अस तुमचं झालं आहे पण त्यातून ही काय निवडायचं हे लक्षात घेणे गरजेचे आहे पॉर्न site आणि gaming पाहून कधीच समाधान मिळत नसत पण व्यसन मात्र लागू शकत त्यामुळे त्या पासून दूर राहिलेलं कधी ही चांगलं.
5. ही चार वर्षे तुला तुझ्या आयुष्याची दिशा देतील त्यामुळे तूझ्या मनात भावी आयुष्याच्या ज्या कल्पना असतील त्या सत्यात उतरवाच्या असतील तर आता त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे.
6. मित्र परिवारात वावरताना चांगल्या गोष्टी साठी कायम एकमेकांना मदत कर. आनंदात सगळेच मित्र सोबत असतात पण दुःखात कायम असतो तो खरा मित्र ...असा मित्र व्हायचा प्रयत्न कर.
7 मौज मजा मस्ती साठी एखादी पिकनिक ,सहल नक्कीच असावी पण त्यात वरील अयोग्य गोष्टी नसाव्या.
8. कुठलिही चुकीची गोष्ट तुझ्या हातून घडली तर लगेच मोकळेपणाने आमच्याशी बोल आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत पण लपवून ठेवलीस तर मात्र निराशा पदरी पडेल.
हे तुला उपदेशाचे डोस वाटतील पण ते गरजेचं आहे. आम्ही तुझ्या आयुष्यात GPS ची भूमिका निभावू. तुला इच्छित स्थळी जायला योग्य ते वेगवेगळे मार्ग सुचवू . योग्य मार्ग तुला निवडायचा आहे. मार्ग चुकला तरी पर्यायी मार्ग ही दाखवू पण जर दुसरा मार्ग निवडला तर मात्र कोणत्या स्थळी पोहचशील हे सांगता येणार नाही आणि कदाचित परतीचे मार्ग ही सापडणार नाहीत याची जाणीव ठेव. आम्हाला तुझ्यासाठी CCTV ची भूमिका नाही निभावयची ज्यात तुझ्या स्वातंत्र्यावर बाधा येईल. बाकी तू सुज्ञ आहेच आणि आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे कायम लक्षात ठेव.
तुझ्या भावीवाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
तुझाच
बाबा
© हेमंत तळेले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा