मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

1517. एक राजहंस

 रास्ता पेठ ऑफिसला जेवताना पेपरमध्ये एक जाहिरात वाचली, व्यवसाय या सदराखाली, 
  येथे विनामूल्य योग्य सल्ला मिळेल. कसलीही गुंतवणूक नाही , झिरो डाऊन पेमेंट , नो इएम आय...
 म्हंटल बघावं नक्की काय प्रकार आहे ..
 म्हणून पत्ता विचारत मी तिथे पोचलो , बघतो तर काय ! माझ्याआधी दोघं जण तिथे हजर ...
 अतिशय शांतचित्तानं एक गृहस्थ त्या वैतागलेल्या इसमाचं गाऱ्हाणं ऐकत होता.. मी बाहेरच बाकावर बसलो.
 ईसम - काय सांगू तुम्हाला ? काडीची किंमत नाही राहिली राव मला घरात. घरी गेलो की बायकोची किरकिर. पोरं पण उलटी बोलायला लागलीत. अगदी संताप आलाय मला. फकत पैसे कमवतोय म्हणून घरात ठेवलंय.  तो ईसम अर्था तास सतत बोलत होता आणि गृहस्थ सगळं शांतपणे ऐकत होता. त्याला प्रतिसाद देत होता. ईसम हळूहळू शांत झाला. मग तो ग्रहस्थ म्हणाला "सुटीच्या दिवशी मस्त नाटक , पिक्चर बघत जा. किंमत आणि आदर मिळवावा लागतो. बायकोला घरी जाताना फुलं , गजरा द्या. पोरांसाहित फिरुन या कोकणात . फक्त थोडं शांत रहा , सगळं आपोआप होतं .एवढा सल्ला पाळा "  त्या ईसमाच्या डोळयात पाणी आलं. निरोप घेऊन तो निघून गेला . 
 दुसरा आत गेला , तो बोलू लागला .." जेवढं कमावलं सगळ गेल. पॅकिंगचा व्यवसाय ऐन भरात असताना माझ्या वर्कशॉपमध्ये लागलेल्या आगीत सगळी राख झाली. कर्ज फेडायचय. सगळ्या मित्रांनी तोंड फिरवलं . आई बाबांना , बायकापोरांना काय उत्तर देऊ? जीव द्यायची ईच्छा होतीय " बोलता बोलता त्याच्या डोळयात टचकन पाणी आलं . तो रडू लागला. गृहस्थ ऐकत होता. रडताना त्यानं त्या ईसमाला अडवलं नाही आजिबात. हुंदके देत तो जरा स्थिरावला . गृहस्थ बोलू लागला " मित्रा, तो तूच आहेस ना ज्यानं व्यवसाय टॉपला नेला. पाण्यासारखा घाम गाळला. जेवढं उंच यश तेवढंच खोल अपयश. हा या जगाचा नियमच आहे. पण यश टिकवण आणि अपयश पचवणं हे ज्याला जमत तो कायम यशस्वी होतो. स्वतःला सिध्द करण्याची संधी करण्याची संधी आहे ही. घरी जाऊन आईबाबांना, बायकापोरांना एकत्र घेऊन मनमोकळेपणाने बोल. ते तुझे साथीदार आहेत. पुन्हा एका गरुडभरारीची नविन सुरुवात कर मित्रा ...."
तो ईसम एकदम त्राण आल्यासारखा उठला आणि त्या गृहस्थाच्या पाया पडून निघून गेला . 
माझी पाळी आली. मी आत गेलो. मला राहवल नाही म्हणून विचारलं " लोक वेगवेगळे व्यवसाय करतात. तुमचा हा कसला सल्ले देण्याचा व्यवसाय तोही फुकट? "
तो मनसोक्त हसला . मग बोलू लागला " माझं नाव राजहंस देवकाते. मी पी. एच. डी. सायकॉलॉजी केलय. तीस वर्ष प्रॅक्टिस केली मुंबईत. मागील वर्षी माझी अर्धागिनी मला सोडून गेली. मुलगा यू एस मध्ये सेटल झाला. एकटा पडलो. म्हणून मी हा व्यवसाय सुरू केला. तुम्हाला सल्ल्याचा वाटणारा पण मुळात आशेचा. तुला काय वाटतं मी त्या दोघांना जे सांगितल ते त्यांना माहित नव्हतं का ? पण ते एका गर्तेत अडकले. स्वतःच्याच वर्तुळात सापडले. मी फक्त त्यांना त्यातून बाहेर काढलं. आपली दुःखं ऐकणार कोणी असेल तर विश्वास निर्माण होतो आणि मग त्यानंतरचा त्याचा सल्ला जगण्याची आशा आणि प्रेरणा होते. मित्रा, ही आशा व प्रेरणाच माणसाला जगणं शिकवतात. मी ती आशा व प्रेरणा विकतो. " निरोप घेऊन बाहेर पडलो . 
आयुष्याच्या भावनारुपी सागरात सुख वेगळ काढून लोकांमध्ये वाटणाऱ्या त्या राजहंसाची मनात कायमची आठवण कोरली गेली.

💥 निरर्थक शब्दांपेक्षा अर्थपूर्ण शांतता केव्हाही चांगलीच.
अश्रु नसते डोळ्यामध्ये तर डोळे इतके सुंदर असले नसते..!
दुःख नसते ह्रदयात तर धडकत्या ह्रदयाला काही किंमत उरली नसती..!
जर पुर्ण झाल्या असत्या मनातील सर्व इच्छा तर....
भगवंताची काहीच गरज उरली नसती.
कोणाच्या तरी जीवनात राजहंस बना जीवन खूप सुंदर आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...