बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

1550. अखेर वर्तुळ पूर्ण झाले

        सुरेश पुण्यात एका चाळीमध्ये भाड्याने राहत होता. आयटीआय ची परीक्षा दिल्यानंतर त्याला त्याच्या उत्तम स्किलनुसार एका चांगल्या नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. कंपनी मोठी असल्यामुळे चांगला पगार मिळू लागला. त्यामुळे त्याने कर्ज काढून पुण्यातच एक फ्लॅट घेतला. स्वतःचा फ्लॅट व नामांकित कंपनीत नोकरी यामुळे त्याला लग्नासाठी चांगली बायको मिळाली. लग्न थाटामाटात पार पडले. बायको पण जॉब करत होती. दोघेही खूप परिश्रम करून पैसे कमवत होते. त्यांना एक मुलगा झाला. त्या मुलाला त्यांनी खूप उच्च शिक्षण दिले. व त्याला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवले. अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन तेथेच मुलाला नोकरी मिळाली. अमेरिकेतच त्याच्या कंपनीतील एका भारतीय मुलीशी त्याची मैत्री वाढली. व त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या घरची परवानगी मिळाली. पुण्यातच लग्न खूप थाटामाटात पार पडले. सुरेश खूप खुश होता. नंतर सुरेश चा मुलगा हा अमेरिकेतच स्थायिक झाला. सुरेश व त्याची पत्नी अमेरिकेत एक दोन वेळा जाऊन आली. परंतु सुनबाई कडून त्यांना म्हणावी तशी वागणूक मिळाली नाही. त्यामुळे सुरेशला थोडे दुःख झाले होते. 
      अशातच सुरेश च्या पत्नीला कॅन्सर झाला. व त्यात तिचे निधन झाले. दशक्रिया विधीला मुलगा एकटाच आला होता. दोन दिवस थांबून तोही परत अमेरिकेत निघून गेला. सुरेश एकटा पडला. कंपनीत नाश्ता व जेवण मिळत होते. संध्याकाळची त्याने मेस लावली. एकटेपणा त्याला सतावत होता. त्याला नैराश्य येत होते. अशातच तो रिटायर झाला. रिटायरमेंट नंतर मिळालेल्या पैशातून त्याने मुलाच्या शिक्षणासाठी, गाडीसाठी व फ्लॅटसाठी घेतलेले लोन फेडले. व थोडेफार जे पैसे मिळाले होते त्याची गुंतवणूक केली. कंपनीची पेन्शन स्कीम नव्हती. सुनबाईच्या धाकामुळे मुलाने देखील सुरेशला पैसे पाठवणे बंद केले. व हळूहळू कम्युनिकेशन देखील बंद केले. सुरेशला पत्नी व मुलाची व नातवंडाची सारखी आठवण यायची. कधी कधी तो एकटा रडत बसायचा. अशा मानसिक असंतुलनामुळे त्याला ब्रेन ट्युमर झाला व मेडिकल पॉलिसी नसल्यामुळे त्याने जमा केलेली सर्व रक्कम संपली.. औषधाचा व इतर खर्च वाढला. फ्लॅटमध्ये एकट्याला राहणे त्याला मेंटेनन्स, लाईट बिल, टॅक्स परवडत नव्हते. व एवढे मोठे घर त्याला खायला उठत होते.
     अशातच त्याचा अपघात झाला व अपघाताची तीव्रता जास्त असल्याने त्याला वैद्यकीय बिलासाठी फ्लॅट विकायची वेळ आली. कारण आर्थिक नियोजनाकडे देखील त्याने प्रॉपर लक्ष दिले नव्हते. त्याचा मित्र राजेश सर्व गोष्टीत त्याला भरपूर मदत करत होता. परंतु सर्व गोष्टीचे सोंग करता येते परंतु पैशाचे सोंग करता येत नाही. त्यामुळे राजेशच्या मदतीने त्याने फ्लॅट विकून टाकला. व राजेशने सुरेश ला एजंटच्या मदतीने एका चाळीत भाड्याने जुने घर घेऊन दिले. व त्याला मेस लावली. अधून मधून वेळ मिळेल तसा राजेश त्याच्या घरी जात असतो, त्याचं मनोबल वाढवत असतो..
     मित्रांनो सुरेशने आपल्या संपूर्ण जीवनपटाचा अभ्यास केल्यानंतर त्याला लक्षात आलं. एवढा मी आयुष्यभर पळालो. परंतु एका चाळीमधून भाड्याच्या घरातून आयुष्याला सुरुवात केली. मर मर पळालो. स्वतःकडे दुर्लक्ष केले. आज मी एकटा पडलो. ज्या चाळीमधून मी प्रवासाला सुरुवात केली त्याच चाळीत मी शेवटी भाड्याने राहू लागलो. आता येथेच माझा अंत होईल. जीवनसाथी अर्धवट साथ सोडून गेली. जो मुलगा म्हातारपणाचा आधार होईल असे वाटले त्याने कम्युनिकेशन बंद केले. सुरेश आज एकटा पडला आहे व त्याला लक्षात आलं अखेर वर्तुळ पूर्ण झाले. 
      मित्रांनो जीवन प्रवास हा असाच असतो. भगवान बुद्ध म्हणतात सर्व काही बदलत असते. जीवन म्हणजे आपल्या कर्माचा खेळ असतो. त्यामुळे आयुष्य एक वर्तुळ आहे. वर्तुळाच्या परिघावर वर गेल्यानंतर शेवटी ठराविक उंची नंतर परत खाली जावे लागते. व वर्तुळ पूर्ण होते. त्यामुळे आपल्या कर्माने जे आपल्या वाट्याला आलं. कुणालाही दोष न देता ते भोगून मोकळे व्हा. व आहे त्या परिस्थितीत सत्कर्मांची पेरणी करत अंधारातून प्रकाशाकडे जा.. जसे आपले कर्म तसे फळ. रामकृष्ण परमहंस म्हणतात, कुणाच्याही पायातील खडाव तुटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस खाली यावेच लागते.
त्यामुळे सर्वकाही आबादी आबाद असेल तर फार गर्व व हुशारी करू नका. 
तु लाख करे चतुराई ,करम का खेल मिटे ना रे भाई...

डॉ. दत्ता कोहिनकर 
माईंड पॉवर ट्रेनर 
लेखक. 
Mob. ९८२२६३२६३० 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...