सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

1629. बाबा नेहमीच मागे का असतात ?

 || आई नऊ महिने ओझं वाहते, वडील २५ वर्षे ओझं वाहतात. 
|| दोघेही बरोबरीचे आहेत, तरीही
|| बाबा मागे का आहेत? हे माहित नाही.

|| आई कुटुंबासाठी मोबदला न घेता काम करते, 
|| बाबा कुटुंबासाठी सर्व पगारच खर्च करतात. 
|| दोघांचे प्रयत्न समान आहेत. तरीही.
|| बाबा मागे का पडतात ? हे माहित नाही.

|| आई आपल्याला पाहिजे ते शिजवते. बाबा आपल्याला 
|| पाहिजे ते खरेदी करतात. दोघांचे प्रेम समान आहे, 
|| परंतु आईचे प्रेम वरिष्ठ म्हणून दर्शवले जाते.
|| बाबा मागे का पडतात ? हे माहित नाही.

|| जेव्हा आपण फोन करतो तेव्हा आपल्याला आधी आईशीच 
|| बोलावेसे वाटते. दुखापत झाल्यास आपण ‘आई गं’ असेच 
|| ओरडतो.
|| जेव्हा आपल्याला वडिलांची गरज असते तेव्हाच आपल्याला 
|| त्यांची आठवण होते. परंतु वडिलांना कधीच वाईट वाटले 
|| नाही, की इतर वेळी मुलांना आपण आठवत नाही. 
|| पिढ्यानपिढ्या मुलांचे प्रेम मिळवतांना आपण पाहतो, की.
|| बाबा नेहमीच मागे पडतात का ?. हे माहित नाही.

|| कपाटांमध्ये रंगीबेरंगी साड्या आणि मुलांसाठी पुष्कळ 
|| कपडे भरलेले असतात, परंतु वडिलांकडे फारच कमी कपडे 
|| असतात. कुटुंबियांच्या गरजेपुढे त्यांना स्वतःच्या गरजेची 
|| काळजी नसते. तरी.
|| बाबा अजूनही मागे का आहेत ? हे माहित नाही.

|| आईकडे सोन्याचे अनेक दागिने असतात, पण वडिलांकडे 
|| एकच रिंग असते, कदाचित ती ही नसते. तरीही आई कमी 
|| दागिन्यांची तक्रार करते आणि बाबा कधीच करत नाहीत. 
|| तरी अजूनही.
|| बाबा मागे का आहेत ? हे माहित नाही. 

|| आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी बाबा आयुष्यभर 
|| खूप कष्ट करतात. पण घरातच जेव्हा जेव्हा ओळख मिळते, 
|| तेव्हा.
|| बाबा नेहमीच का मागे पडतात ? हे माहित नाही.

|| आई म्हणते, ह्या महिन्यात  मुलांची शिकवणी फी देण्याची 
|| गरज आहे. सणानिमित्त मला साडी घेऊ नका, परंतु वडिल 
|| स्वतःसाठी नव्या कपड्यांचा साधा विचारही करत नाही. 
|| तरीही
|| बाबा का मागे पडतात? हे माहित नाही.

|| आई-वडील म्हातारे झाल्यावर मुले म्हणतात, आई कमीत 
|| कमी घरातील कामात मदत करते, पण ते म्हणतात, बाबा 
|| निरुपयोगी आहेत.
|| बाबा मागे का पडतात? हे माहित नाही.

|| वडील मागे, ‘मागच्या बाजूला’ आहेत. कारण ते कुटुंबाचा 
|| कणा आहेत. त्यांच्यामुळेच आपण सगळे उभे आहोत.
|| म्हणून तर ते. 'मागे' आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...