"काय मग निधी मॅडम आता तुमच्या दादुचं लग्न झालं आता पुढचा नंबर तुमचाच. कधी देताय लग्नाचे लाडु?" रितीका गच्चीवर पाऊल ठेवतच आपल्या मैत्रीणीला निधीला चिडवत म्हणाली.
"रितु प्लिज यार. आधीच सगळ्यांनी बोलुन बोलुन इरीटेट केलंय तु नको ना अजुन त्रास देवु. समोर एवढा छान सुर्यास्त आहे तो बघ ना." निधी काहीशी वैतागून म्हणाली.
"बरं बाई साॅरी...पण सुर्यास्त खरंच भारीच दिसतो गं इथनं."
रितीका तिने दाखवलेल्या बोटाच्या दिशेने पाहत म्हणाली.
"हो सुर्यास्त आणि सूर्योदय पण आणि तुला माहीतीये रात्रीही ताऱ्यांची आरास काय सुंदर दिसते माहितीये इथनं. मला तर वाटतं गच्चीवरच राहावं. मुक्त आकाशाखाली." निधी अगदी लहान मुलीगत आनंदून बोलली.
"रितीकाला हसायलाच आलं तिचं ते बोलणं ऐकून. पण तिने हसु दाबत सहज स्वरात निधीला प्रश्न केला.
"निधी तुला लग्नाबद्दल काय वाटतं गं? म्हणजे तुझा लग्नाबद्दल विव्ह जाणुन घ्यायचाय मला. आपण याआधी कधी काही बोललोच नाही ना यावर. माझ्या घरीही लग्नाबद्दल विषय सुरू आहे. म्हणुन म्हंटलं तुला विचारावं. म्हणजे बघ ना तुझी फेवरेट गच्ची. समोर हा एवढा छान सुर्यास्त. तुझ्या लग्नाबद्दल विव्ह ऐकणं. म्हणजे कसलं भारी काॅंबिनेशन होईल नाही का..? रितीका हसत म्हणाली...
रितु ss केवढी ती प्रस्तावना पुरे. मी तुला आणि तुझ्या या ओव्हर एक्टिंगला आज नाही ओळखत गं. सरळ सांगितलं असतं माझ्या आईने तुला सांगितलंय माझं लग्नाबद्दल मत जाणुन घे म्हणुन तु विचारतेय तरी मी सांगितलं असतं. निधी रितीका कडे एकवार पाहत तिचा छुपा हेतु बरोबर ओळखुन काहीसं हसत म्हणाली तशी तिची एक्सप्रेस थांबली आणि ती निधीचं बोलणं काळजीपूर्वक ऐकू लागली.
"रितु मला ना एकच गोष्ट हवीये. Assurance... आश्वासकता. तो माझ्यावर भरभरून प्रेम करु शकेल. माझी जन्मभर साथ देवू शकेल. मला समजुन घेवु शकेल. माझं चुकलं तर मला समजुन सांगु शकेल. तो चुकला तर चुक कबुल करुन सुधारण्याची त्याची कुवत असेल. माझी चुक नसेल तर तिथे तो खंबीरपणे माझ्यासाठी उभा राहु शकेल मग समोर अगदी त्याच्या घरचे असु देत किंवा मग अख्ख जग. अगदी काहीही झालं तरी त्याची पहिली प्रायोरिटी आमचं नात टिकवणं ही असायला हवी. यासगळ्याची assurance माझ्या मनाला देवू शकेल अशी ज्याची सोबत असेल ना त्याच्याशीच मी लग्न करणार. निधी धीरगंभीर स्वरात सांगत होती.
"मला कळतंय म्हणजे थोडं थोडंच कळतंय. पण याचा अर्थ तुला लव्ह मॅरेज करायचंय हो ना? म्हणजे आधी प्रेमात पडून मगच लग्न. असंच ना. रितीका स्वतः शीच तर्क लावत म्हणाली.
हाहा. हीच तर गफलत होते सगळ्यांची अगं असं काही ठरवून थोडीच होतं. आपल्या हातात नसतंच मुळी. प्रेमात पडायचं ठरवुन कुणी प्रेमात थोडीच पडु शकतं. तशी व्यक्ती मिळेलच असं नाही ना आणि अरेंजच करायचं असं कितीही ठरवलेलं असलं तरी प्रेमात पडण्यापासून रोखता थोडीच येतं मनाला? म्हणुन मुळात हे ठरवणं ना बेसलेस असतं असं मला वाटतं बरं का. अगं आपल्या आयुष्यातला जोडीदार आपल्या आयुष्यात अगदी अनपेक्षितपणे येत असतो. पण त्याचं येणं अनपेक्षित असलं तरी त्यालाच आयुष्यात कायम करण्याआधी त्याला नीट पारखून घेणं तर आपल्या हातात असतंं ना गं? आणि ते आपल्या हातातच आहे याची जाणीव असावीच प्रत्येकीला. लग्न लव्ह करतोय किंवा अरेंज याहुन जास्त दोघांमध्ये एकमेकांप्रती,नात्याप्रती नितांत ओढ आणि आदर असणं आवश्यक आहे. प्रेम असणं आवश्यक आहे. या भावनांची बिजं नंतर रुजतील या आशेवर लग्न मुळीच नको करायला असं माझं तरी ठाम मत आहे. भलेही मग नात्याचा वटवृक्ष होण्यासाठी वाट बघायला लागु देत किंवा तो वेळ द्यावा लागतोच हे acceptable आहे. पण एकमेकांप्रती प्रेमाच्या भावनांचा, आदराचा अंकुर तरी उगवलेला असावाच गं दोघांच्याही मनात सुरुवातीला. समोर तसं काहीच दिसत नसतांना आपलं अख्ख कुटुंब सोडुन, जिथे आयुष्यातला एवढा मोठा कालावधी घालवला ते घर सोडून, जिवाभावाची माणसं सोडून जाणं मला तरी नाही गं जमणार. इतर मुली, स्त्रिया काय माहित कसं जात असतील? मला तर विचार करुनच नको वाटतं. निधी सांगत होती आणि रितीका तिचं बोलणं मन लावून ऐकत होती.
म्हणजे बघ ना गं आपण साधं गुलाबाचं किंवा कुठल्या फुलाचं रोप लावायचं असेल तर बियांऐवजी उगवलेल्या रोपाला प्राधान्य देतो ज्याला कळ्या आलेल्या असतात. कारण बियांमधुन अंकुर नक्की उगवतील की नाही याबाबत साशंकता असते ना. तसंच बाजारातून काही आणायचं असेल फळ वगैरे तरी ते आतुन कसं निघेल याची गॅरंटी आपल्याला हवी असते पण लग्नाच्या बाबतीत मात्र आपण केवढी मोठी रिस्क घेतो ना? कुणीतरी सांगतय मुलगा चांगला आहे आणि वेल सेटल्ड आहे म्हणजे आपण आणि आपले आईवडील धन्यता मानुन मोकळे होतो. पण नवरा म्हणून तो कसा आहे, कसा वागेल, आपल्यावर भरभरुन प्रेम करेल का, आपली साथ देवु शकेल का? बायकोचा आदर करु शकेल का? मुळात बायको म्हणून त्याच्या आयुष्यात येणाऱ्या त्या मुलीने त्याच्यासाठी घरदार सोडावं या लायकीचा तरी तो आहे का? हे सगळं पाहणं मात्र दुय्यम ठरवल्या जातं. या बाबतीत सगळंच तर अंधातरी असतं. मग ते अरेंज मॅरेज असो की काही इमॅट्युअरली घेतलेल्या निर्णयातुन एकमेकांंना नीट जाणुन न घेता केलेले लव्ह मॅरेज असोत. मुळात ह्या इन्स्टंट केलेल्या गोष्टी धोकादायकच असतात म्हणजे काही अपवाद असतील अगदीच बोटावर मोजण्या इतके पण बघ ना गं आयुष्यच तर पणाला लागतं. मुलगा असो की मुलगी. फसगत झाली तर पोळलेली ही मनं किती हळवी होतात आणि फक्त त्या एका व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण कुटुंबालाच मानसिक त्रास सहन करावा लागतो. हे दुष्टचक्र कुणाच्याच वाट्याला नको यायला असं मनापासून वाटतं. पण इतरांच आपल्या हातात जरी नसलं तरी आपलं भविष्य तर आपल्या हातात असतं ना?? मला माझ्या बाबतीत तरी हे अंधातरीपण नकोय. आय वाॅन्ट अॅशुअरन्स. निधी ठामपणे निर्धाराच्या स्वरुपात म्हणाली.
रितीकाही तिचा विव्ह ऐकून अंतर्मुख झाली होती. निधीचं मुद्देसूद बोलणं ऐकून तिलाही एक नवा दृष्टीकोन मिळाला. आता तिलाही महत्त्वाची वाटु लागली होती. Assurance ✨
- मनस्वी समीक्षा✍️©®
समीक्षा केनोडकर ©®
sam202628@gmail.com
तुम्हाला कथा कशी वाटली हे कंमेंट करुन नक्की कळवा व आवडल्यास शेअर करा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा