सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

1610. होय आमचा बापूस काल "आयर्नमॅन "झाला

 काल बहारीन ( मध्यपूर्व ) येथे पार पडलेल्या आयर्नमॅन 70.3 या स्पर्धेत आमचा बापूस ऑफिशिअली "आयर्न मॅन " जाहला. अजून एक कौतुकाची गोस्ट या विजयामुळं 69 वर्षीय नवनाथ रघुनाथ झांजुर्णे आता सर्वात जेष्ठ भारतीय आयर्नमॅन झाले .
( 70.3 आयर्नमॅन म्हणजे :  एका दमात केलेलं 1.9 किलोमीटर समुद्रातील स्विमिंग + 89 किलोमीटर सायकलिंग + 21 किलोमीटर रनींग ) 
मागच्या वर्षी तुर्कस्तान ला झालेल्या याच स्पर्धेतून काही कारणामुळे बापूस ला आयर्नमॅन हा 'किताब मिळाला न्हवता .तुर्कस्तान मध्ये स्पर्धेतून बाहेर पडल्यावर पप्पाना रडताना मी पहिल्यांदाच पाहिलं होत कारण त्याआधीचे   2-3 वर्ष त्यांनी मैदानात काबाड कस्ट केले होते. पण तुर्कस्तानातून परत आल्यानंतर पप्पानी माग वळून पाहील नाही .चैतन्य वेल्हाळ सरांच्या मार्गदर्शनाखाली जिथं ते कमी पडले होते त्या कच्च्या गोष्टी सुधरायाला सुरुवात केली. जस कि वयामुळं  त्यांचे स्नायू बारीक आणि अशक्त झाले होते ते स्नायू त्यांनी रोज जिम मध्ये हेमंत या पर्सनल ट्रेनर कडून तयार  केले. स्वीम्मीम्ग कच्च होत त्यासाठी हिंजवडी येथील कसारसाई या धरणात जाऊन रेगुलर ओपन वॉटर स्विमिंग ची प्रॅक्टिस केली. दर रविवारी सोलापूर रोडला लॉन्ग डिस्टन्स सायकलिंग साठी जाऊन लगेच आल्या आल्या सायकल पार्किंग ला लावून लगेचच अदिती गार्डन ला पळायला सुरुवात केली. श्वसनावर कंट्रोल हवा म्हणून नियमित प्राणायाम केला आणि रेस चा तणाव कमी करण्यासाठी पहाटे मेडिटेशन सुरु केले. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट सुरु केला .डाएट करताना त्यांना एकटे वाटू नये म्हणून 64 वर्षीय आमच्या माउलीने त्यांच्या बरोबर डाएट करून स्वतःचे पण 25 किलो वजन कमी केले.
आता हा ब्लॉग वाचणाऱ्या अनेकांना असे वाटेल कि तुमचे वडील सुरुवाती पासून फिट असतील तर नाही 
   कोरोनापूर्वी पप्पांचे वजन 90 होते. त्यानंतर त्यांनीही ते 25 किलो कमी केले. कोणाच्याही शारिरीक कमतरतेविषयी सांगू नये पण मी पप्पांच्या शारीरिक अवस्थेविषयी नक्कीच सांगेन कारण हा ब्लॉग वाचणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही शारिरीक न्यूनगंड असतोच कि माझं वय जास्त आहे. गुढघे दुखतात, चष्मा आहे वैगेरे. आता मी पप्पांविषयी थोडं सांगेन. पप्पांना ट्रायकंपार्टमेंटल ऑस्टिओआर्थायटिस म्हणजे पूर्णपणे झिजलेले दोन्ही गुडघे गेले 10 वर्ष त्रास देत आहेत.
     सायकलचा हॅन्डल पकडायला अंगठ्याची फार गरज असते पण पप्पांचा उजव्या हाताचा अंगठा लहानपणीच तुटला. त्यामुळं हॅण्डल ला ग्रीप पकडता येत नाहि. त्यांच्या लहानपणी कोपराचे हाड मोडल्यामुळे आणि ते नीट न बसवल्यामुळे त्यांना वाकडा कोपर ( gun stock deformity due to mal united supracondylar humerus ) आहे . या खूप जास्त वाकड्या कोपरामुळे स्विमिंग ला फार अडचणी येतात. वयाप्रमाणे त्यांना लांबचे दिसायला अंधुक दिसते. 2 वर्षांपूर्वी खांद्याचे रोटेटर कफ हे स्नायू पूर्णपणे तुटल्यामुळे एक मोठी सर्जरी करून ते जोडले गेले. तरीही त्यांनी या अडचणींवर मात करून त्यांनी हे मेडल मिळवले याचा आम्हा कुटुंबियांना फार अभिमान वाटतो. बहारीन मधल्या दुपारच्या उन्हात बारा वाजता पप्पा जेंव्हा रस्त्यावर पळत होते तेंव्हा त्यांची दोन्ही नातवंड सईबाई आणि शिवबा हातात मोटिवेश्नल घोषणा लिहिलेल्या पाट्या घेऊन फुटपाथ वरून पळत होते. बहारीन मध्ये डॉ स्मिता राहुल झांजुर्णे यांनी सुद्धा त्यांच्या सासऱ्यांबरोबर स्वतः च 6 व आयर्नमॅन मेडल मिळवलं. अजून एक संस्मरणीय गोस्ट या स्पर्धेत घडली .ती म्हणजे साडे आठ तासात पप्पा ज्या वेळी रेस संपवत फिनिश लाइन कडे येऊ लागले तेंव्हा निवेदकाने उद्घोषणा केली कि 69 वर्षीय एक भारतीय फिनिश लाइनकडे येत आहे.आणि पप्पा ज्यावेळी फिनिश लाइन जवळ आले तेंव्हा पप्पाना चीअर अप करण्यासाठी आणि एक सन्मानपूर्वक कृती म्हणून  त्या वेळी तिथं उपस्थित असलेले सगळे स्पर्धेचे स्वयंसेवक, ऑफिशिअल्स शेवटचे 200 मीटर अंतर पप्पांसोबत पळाले. त्यावेळी खरंच अंगावर काटा आला. अशाप्रकारे पप्पानी तिरंगा हातात घेऊन फिनिश लाइन क्रॉस करून, आयर्नमॅन हा किताब मिळवला. पप्पा आम्हाला तुमचा फार अभिमान वाटतो.
( हा ब्लॉग वाचणाऱ्या बऱ्याच लोकांना फिटनेस हवा असतो पण मनात बरेच न्यूनगंड असतात. मला हे जमेल का?तर माझ्या सत्तरीतल्या पप्पानी एवढ्या शारीरिक अडचणींवर मात करून हे यश मिळवलंय तर तुम्ही किमान 10 किलोमीटर ची मॅरेथॉन तर नक्कीच पळू शकता )
आणि इतरांना मोटिवेट करण्यासाठी हा ब्लॉग फॉरवर्ड करू शकता .

डॉ राहुल झांजुर्णे 
अस्थिरोगतज्ञ हडपसर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...