प्राचीन काळी एका व्यावसायिकाने श्रीमंत सावकाराकडून व्याजावर पैसे घेतले होते. मात्र व्यवसायात तोटा झाल्यामुळे त्याला पैसे परत करता आले नाहीत. त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती. सावकार कुटिल होता आणि त्याने व्यावसायिकाला असा प्रस्ताव दिला की जर त्याने आपल्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत लावून दिले, तर तो त्याचे सर्व कर्ज माफ करेल.
गरीब व्यावसायिकाने आपल्या मुलीला हा प्रस्ताव सांगितला. परिस्थिती बिकट होती. मुलीकडे दोनच पर्याय होते - एकतर सावकाराशी लग्न करून वडिलांना कर्जमुक्त करणे किंवा नकार देऊन त्यांना कायमचं अडचणीत ठेवणे.
मुलीने शांतपणे विचार केला आणि सावकारासमोर अट ठेवली. सावकाराने एक पिशवी आणून त्यात एक काळी आणि एक पांढरी गोळी ठेवायची अशी अट ठरली. त्यानुसार ती पिशवीतून गोळी काढेल. गोळी काळी असेल तर मुलगी सावकाराशी लग्न करेल. पांढरी असेल तर नाही, पण वडिलांचे कर्ज माफ होईल.
सावकाराने दोन्ही काळ्या गोळ्या पिशवीत टाकल्या. हे मुलीच्या लक्षात आले. तरीही ती गोंधळली नाही. पिशवीतून गोळी काढताच तिने ती हातातून खाली पडू दिली. ती म्हणाली, "गोळी चुकून खाली पडली, पण आता पिशवीतील गोळी तपासूया. उरलेली गोळी पाहून कळेल मी कोणती गोळी काढली होती."
सावकारला हा युक्तीने गप्प बसावे लागले. पिशवीतील गोळी काळी होती याचा अर्थ मुलीने पांढरी गोळी काढली होती. अशा प्रकारे तिने आपल्या वडिलांचे कर्ज माफ करवले आणि सावकाराशी लग्न करण्याचे संकट टाळले.
बोध:
कधीही समस्या सोडवताना घाई करू नका. शांतपणे विचार करून चातुर्याने मार्ग काढल्यास प्रत्येक समस्येवर उपाय सापडतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा