सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

1611. जिंदगी ना मिलेगी दोबारा

 ●एकदा का चाळिशी पार केली की "जास्त शिकलेला" आणि "कमी शिकलेला" दोघेही सारखेच.
(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)

● पन्नाशी नंतर तर "सुंदर" आणि "कुरूप" हा भेदभावच नष्ट होतो... दोन्ही सारखेच 
(कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )

● साठी नंतर तर "मोठी पोस्ट" आणि "लहान पोस्ट" असेही काही उरत नाही... दोन्ही सारखेच
(निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)

● सत्तरी पार केल्यानंतर "मोठे घर" आणि "लहान घर" असा विचार सुद्धा मनात येत नाही... दोन्ही सारखेच
(सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.)

● ऐंशी नंतर गाठीशी "भरपूर पैसा" असला काय अन् नसला काय... दोन्ही सारखेच
(जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न ऊरतोच )

●नशीबाने नव्वदी पार केली (अभिनंदन) तर "झोपणे" आणि "उठणे" यांत सुद्धा फरक राहत नाही.. दोन्ही सारखेच
(कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच)

अजुन शंभरी पार करायची ईच्छा आहे का ?
जीवन साधे-सरळ-सोपे आहे.आनंदाने जगा. एक लक्षात ठेवा. लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा. स्वतःसाठी काही वेळ तरी जगायला शिका, कारण.
जिंदगी ना मिलेगी दोबारा..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...