नवरा सहजच म्हणून गेला, "उद्या मैत्रीणीसोबत चार दिवस फिरायला चाललोय. नाहीतरी सुट्टीच आहे. जाऊन येतो मस्तपैकी."
बायको हसून सहजच म्हणाली, " जाऊन या, एकतरी मैत्रीण असावी आयुष्यात."
पहाटे लवकर उठून नवरा बँग भरू लागला. बायकोही मदत करत होती आणी आपलेही ड्रेस बाहेर काढत होती. नव-याला समजेना की ही आपलेही ड्रेस कपाटातून का काढत आहे. पण ते न विचारता बँग भरत भरत सहजच म्हणाला , "मुलांकडे लक्ष दे , फार बाहेर राहू देवू नको."
बायको हसतच म्हणाली, " नका हो काळजी करू मुलांची, आई लक्ष देईल व्यवस्थित मुलांकडे. नाहीतरी आईच्या घरातून मुलं बाहेर पडतच नाहीत, अन् आपण दोघेही नाही म्हटल्यावर टिव्ही सोडून हालणारच नाहीत."
नवरा चमकला, म्हणाला , "म्हणजे तुही सोबत येतीयेस की काय आमच्या? "
बायको खळखळून हासली, म्हणाली ," नाही हो, मी कुठे तुमच्यात येवू. तुम्ही मस्त जाऊन या. मीही मुले आईजवळ ठेवून दोन दिवस फिरून येते."
"एकटीच ....?" नव-याने आश्चर्याने विचारले ..
बायको पुन्हा हासली अन् म्हणाली, " काय हो तुम्ही, एकटेच फिरायला जाते का कोणी? आहे एक मित्र. तो सोबत यायला लगेचच तयार होईल. हल्ली तोही मोकळाच घरी बसलाय."
"लोणावळ्याला पाऊस फार छान आसतो म्हणे, तोच पाहून येईन दोन-तीन दिवस. बरं, मला सांगा. तिथले लाँज आँनलाईन बुक करावे लागेल की तिथे जाऊनच केले तर चालेल?"
नव-याने बँग भरणे थांबवले आणि विचारले, " कधी प्लँन ठरला? आणी कोणी सांगितले तु जाऊ शकतेस कोणाबरोबरही?"
बायको लाडाने जवळ आली आणि म्हणाली ,"असे काय करता, तुम्ही चार दिवस चाललात. मलाही कंटाळा आलाय म्हणून मीही दोनच दिवस तर जाऊन येणार. आणी कोणासोबतही नाही हो मी जाणार . माझा चांगला मित्र आहे. त्याच्या सोबत जाणार. तुम्ही यायच्या आधी येईन मी."
पुरुष संस्कृतीत वाढलेलो आम्ही, स्त्रीमुक्तीवर भरभरून व्याख्याने देणारे आम्ही या प्रश्नावर बायकोला काय उत्तर द्यायला हवं ?
😃 मित्र मैत्रीणीनो व्यक्त व्हा. खरंच आपण संस्कृती रक्षक आहोत की स्त्रियांना मुक्त आयुष्य जगू देणारे पुरोगामी आहोत हे समजेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा