शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

2274. पुरुष

     पुरुष एकापेक्षा अधिक स्त्रीयांवर प्रेम करतो, करु शकतो कारण, त्याच्या प्रेमाचा क्रायटेरिया हा बेसिकली शरीरापासून सुरु होऊन टप्प्याटप्प्याने मनाकडे जातो. हा प्रवास मोठा आहे. या प्रवासात अधेमधे त्या स्त्रीपेक्षा अधिक आकर्षक असं शरीर असणारी स्त्री त्याला पुन्हा Back to square one आणू शकते. मग पुन्हा नवं शरीर, त्या नव्या शरीराचे नवे गंध, नवे डावपेच, समागमाचे नवे आडाखे यात तो परत अडकतो आणि अलगदपणे प्रेमापासून लैंगिकतेकडे ओढला जातो. तो नैसर्गिकरीत्या स्खलनशील असल्याने नेहमीच अनैतिक, अश्लील आणि नितीभ्रष्ट म्हणून ओळखला जातो.
     स्त्रीचं सॉफ्टवेअर नेमकं उलट आहे. तिचा प्रवास हा मनाकडून सुरु होतो आणि शरीराकडे जातो. जो लहानसा आहे. त्यातच तिला सिक्स्थ सेन्स असल्याने स्त्री अगदीच बिनडोक असेल तरच पुरुषी ढोंगीपणाला बळी पडते. तिला देखण्या शरीरयष्टीचा मोह क्षणिक होतो जे नैसर्गिक आहे. पण मैत्री आणि वैवाहिक जोडीदार निवडण्याचे तिचे निकष हे अगम्य आणि Unpredictable असतात. काळानुसार बदलतातही. म्हणून तिच्या आयुष्यात खंडीभर पुरुष कधीच नसतात. फारफारतर दोन किंवा अगदीच तीन म्हणजे डोक्यावरुन पाणी. तिचे निर्णय चुकल्यावर ती नवा पुरुष शोधायच्या भानगडीतच पडत नाही हा तिचा अफाट USP आहे. ती झटक्यात Move On होऊन स्वतःची एनर्जी वाचवते. दुसरा पुरुष आयुष्यात येताना त्याची असंख्य अग्निदिव्ये ती घेते. तिला जिंकणं म्हणजे तिचं मन जिंकून घेणं सोपं नसतं..
    लक्षात घ्या, एखादी स्त्री जर तुमच्यावर प्रेम करत असेल तर तिच्या प्रेमाचा आदर करा. पुरुषी अहंकार चुलीत घाला. तिची मते विचारात घ्या. आणि तिला धोका देऊ नका. जेनेटिकली तुम्ही नैसर्गिकरीत्या खुले सांड असाल तरीही नाजूक पारिजातकाच्या झाडाला बांधलेले आहात हे विसरु नका. एका झटक्यात दावण तोडून निघू शकता. पण आयुष्यभर उन्हात वणवण फिरण्याची तयारी असू द्या म्हणजे झालं.
आहे हे असंय....!!!

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...