एक दिवस गोपाल कृष्ण आपल्या सर्व सवंगड्यांसोबत यमुनेच्या काठी खेळत होते. दुपारची वेळ होती. खेळून खेळून दमल्यावरती.. कडकडून भूक लागल्यावरती.. सगळी मुल एका झाडाखाली जमली. तिथे सगळ्यांनी आप आपल्या घरची शिदोरी उघडली कुणाकडचा खाऊ अगदी साधा होता. तर कुणाकडचा चमचमीत होता.पण आपल्या कडाच खाऊ खावा ही सर्व सवंगड्यांची ईच्छा अतृप्त राहू नये म्हणून.. कृष्णाने एक युक्ती केली. काड्या काड्या जोडून पान जोडली आणि त्याची एक फार मोठी पत्रावळी तयार केली आणि त्या पत्रावळी वरती सगळ्यांचे खाऊ एकत्र करून मिसळले,मिसळल्याने सर्व पदार्थ एकजीव होवून मस्त खमंग वास सुटला आणि आपसुकच त्यामुळे सर्वांची भूक चावळली. सगळी मुलं गोलाकार बसली आणि कृष्ण स्वतः मध्ये.. ती पत्रावळ हातात घेऊन उभा राहिला. कृष्णाने प्रत्येकाला तो खावू रुपी प्रसाद भरवला.. स्वतः ही खाल्ला आणि त्याला काला असं नाव दिलं. कारण यात सगळ्या गोष्टी, सगळे जिन्नस एकत्र झालेले होते. सगळी मुलं बसलेली आणि कृष्ण स्वतः भरवतोय.. हे देवतांनी आकाशातून पाहिलं आणि त्यांना असूया वाटली. कृष्णाच्या हातून आपल्यालाही.. प्रसाद मिळावा अस त्यांना वाटल.. पण हा भाव.. हे सौभाग्य. हे मात्र कृष्णाच्या मित्रांनाच मिळणार होत. म्हणून देवांनी किड्या मुंग्यांच रूप धारण केल आणि ते तिथे जमले. पण तो प्रसाद इतका रुचकर झाला होता की मुलांनी त्या अन्नाचा एक सुद्धा कण वाया घालवला नाही.. जमिनीवर सांडू दिला नाही. त्यामुळे किडे मुंग्या झालेले देव प्रसादा पासून उपेक्षितच राहीले.मग काही देवांनी माशाच रूप घेऊन यमुनेमध्ये प्रवेश केला. त्यांना वाटल मुल हात धुवायच्या निमित्ताने का होईना. नदी काठी येतील आणि त्याच्या हाताला लागलेले अन्नाचे कण आपल्याला भेटतील आणि ते प्रसादरूपी आपल्या अंगी उतरेल. मात्र झालं अस कृष्णाला देवांचा हा मनसुबा कळला आणि म्हणून कृष्णाने काय केल..आपल्या सवंगड्यांना सांगितल..
काल्याचिये आसे । देव जळीं जाले मासे l
कळले घन निळा l सांगतसे गोपाळा l
गोपाळाने सगळ्यांना सांगितलं की, मित्रांनो आज आपल्याला या काल्याचा प्रसाद खाल्यानंतर हात धुवायचे नाही आहेत. तर हात कपड्यांनाच पूसून टाकायचे आहेत आणि असं म्हणून कृष्णाने देवांच्या तोंडालाच पाने पूसली. का बरं केल असेल कृष्णानं असं..तर त्याच कारण असं.. काला हा प्रसाद साधा सुधा नाही. काला हा प्रसाद मिळण्यासाठी फार भाग्य लागत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना एकत्र यावं लागत. आनंदाने नांदावं लागतं. गुण्यागोविंदाने एकत्र येऊन आपल्यातले मतभेद विसरावे लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृष्णाशी सख्य जोडव लागत. तेव्हा हा काला रूपी प्रसाद. आपल्याला मिळतो. त्याच प्रमाणे काला या शब्दाचा दुसरा अर्थ का..आला म्हणजे जन्माला का..आला हे तु ओळखलं आहेस का? नुसत प्रसाद भक्षण करून उपयोगाचं नाही.. तर जन्माला आल्यानंतर आपण फक्त स्वतःसाठी जगतोय का? की आपला उपयोग समाजासाठी, या राष्ट्रासाठी, होतोय का? याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा सांगतात की देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि त्या देशाच आपण देणं लागतो. म्हणून फक्त स्वतः पुरत न जगता आपला उपयोग आपल्या समाजासाठी,राष्ट्रासाठी कसा करायच.. कसा होईल.. यासाठी प्रयत्न करायचा आणि काला म्हणजे का..आला या प्रश्नाचं उत्तरही शोधण्याचा आपण प्रयत्न करायचा हीच, आहे या गोपाल काल्याची.. दही काल्याची खरी शिकवणं..
🚩 जय श्रीकृष्ण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा