बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

2264. मखर रिकाम झालं

 आता कुठं आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागला होता...🙏🏾
आता कुठं ओवाळू आरत्या नंतर चंद्रभागे मधे सोडोनीया देती जमायला लागलं होतं..🙏🏾
आता कुठं आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागत होती..🙏🏾
एरव्ही स्वयंपाकघर न सोडणाऱ्या घरच्या बायका आरतीच्या निमित्तानं लवकर आवरून बाहेर यायला लागल्या होत्या...🙏🏾
रिमोट साठी भांडणाऱ्या आमचं टिव्ही बंद करून तुझ्या समोर बसण्यावर एकमत व्हायला लागलं होतं...🙏🏾
भाजीच्या पेंढीला न लागणारे हात दूर्वा निवडायला शिकत होते...🙏🏾
साधं दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला लागले होते.. आणि एवढ्यात ?🙏🏾
एवढ्यात हा दिवस आणलास पण? 🙏🏾
काल तर आलास आणि आज निघालास पण?😢  
कठोर पणाने सृष्टीचे नियम शिकवणारा तू आदिगुरू 🙏🏾
जिथं सृजन आहे तिथं विसर्जन अपरिहार्य🙏🏾
 असते असं म्हणत निघालास देखिल,,,,,😢
पण गजानना जाताना एवढं कर 🙏🏾
फक्त तुझ्या च नाही तर कुणाही अतिथीच्या येण्यानं सुखावणारं आणि विरहानं कातर होणारं  साधं सरळ मन दे‌.🙏🏾
भाजी भाकरी असो वा पुरणपोळी सारख्याच आनंदाने खाण्याची स्थीर बुद्धी दे 🙏🏾
प्रत्येकाच घर आणि ताट भरलेलं असू दे.🙏🏾
आणि त्या भरल्या ताटातलं पोटात जाण्याची सहजता दे.🙏🏾
लोकांचं दुःख कळण्याची संवेदना दे 🙏🏾
अडचणीला धावून जाणारे तुझे पाय दे 🙏🏾
अपराध क्षमा करून पोटात घेणारे तुझे लंबोदर दे🙏🏾
सूक्ष्मदृष्टीने पाहणारे बारीक डोळे दे🙏🏾
सार स्विकारून फोल नाकारणारे सुपासारखे कान दे 🙏🏾
भलंबुरं लांबूनच ओळखणारी सोंड दे 🙏🏾
शत्रूला न मारता त्याला आपला दास करणारा पराक्रम दे 🙏🏾
सगळ्यात महत्त्वाचं सर्वांचं मंगल करणारी बुद्धी दे🙏🏾
बहुत काय मागू गणेशा?🌺🙏🙏

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...