मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

2214. विनय व सुलुचे लग्न

      आज लेलेच्या सूलुला पाहण्यासाठी गावातील प्रख्यात वकील गोडसे त्यांच्या मुला सह येणार होते. त्यामुळे लेले घराची स्वच्छता करण्यात गुंग होते. पडदे, बेडशीत बदलणे हे सारे चालू होते. समोर परांजपे कुटुंबिय रहात होते. त्यांना विनय नावाचा एक मुलगा होता. परांजपे रिटायर्ड पेंशन धारक होते. त्यांना विनय हा एक मुलगा होता. तो एका कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता. तो आज अस्वस्थ्य होता कारण त्याचे सुलु वर अव्यक्त प्रेम होते. दररोज ठराविक वेळेला दोघेही वरील खोलीत येत व खिडकीतून एकमेकाना खाणाखुणा करत एवढे ते मर्यादित होते. लेले आणि परांजपे ह्यांचा एका वाद विवाद स्पर्धेत 8 वर्षा पुर्वी जोरात वाद होऊन अहंभाव दुखावाल्याने विकोपाचे वितुष्ट आले होते. 
     4 वाजता प्रोग्राम निमित्त गोडसे त्यांच्या कुटुंबासह लेले ह्यांच्या कडे पोहोचतात. प्रोग्राम सुरू होतो. तेवढ्यात विनय तेथे जातो व तो लेले काका ना सांगतो की माझे सुलू वर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. ते सारे ऐकुन गोडसे कुटुंबिय निघून जातात. विनय घरी येतो. लेले कुटुंबीय व परांजपे कुटुंबात जोरात भांडण होते. विनय व सुलभा ह्याना नजर कैदेत ठेवले जाते. सुलभाचा कार्यक्रम रद्द होतो.  7/8 दिवस होतात. एका दुपारी लेले काकांच्या गुडघ्याला काकू तिळ तेलाने मसाज करताना म्हणाल्या की, 
" अहो तुम्ही सारे सोडून द्या ना, परांजपे भाऊजीशी का एवढे वैर? त्यांनी का तुमची इस्टेट लुबाडली का? लेले काका काकू वर ओरडले. गप्प राहण्यास सांगितले. 
संध्याकाळी लेले आजोबा अचानक परांजपे ह्यांच्या कडे गेले. परांजपे रागात होते. ते काहीही बोलले नाही. लेले काका तेथे बसले आणि जोरात ओरडले "वामन सुलुचे व विनय चे लग्न मी लावुन देणार आहे. हिम्मत असेल तर मला आडवे ये." उत्तरा दाखल परांजपे लेले ह्याना कडाडून मिठी मारतात. उभयतांच्या मना तील अह जळून जातो.  सुलभा व विनय ह्यांचा संसार सुखाचा चालू आहे. सुलभा परांजपेची खूप काळजी घेते. विनय लेलेची आस्थेने चौकशी करत असतो. 
      दोन नातवंडे लेल्याकडे जाऊन आजी आजोबांना खूप त्रास देतात. परांजपे लेल्याना मजेत म्हणतात "काही वर्षा पुर्वी तू माझा मुलगा पळविला आणि आता नातवंडे पण पळवतो का? लेले नुसतेच हसतात. अहंकार जपला म्हणुन 8 वर्ष वाया गेले हे उभयतांना पटते व जाणवते!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...