"कामयाब होने के लिए 'Comfort Zone' छोड़ना पड़ता हैं।"
काल VLCC Femina Miss India runners up ( 2020) चा 'Interview' बघत होते. मान्या सिंग तिचे नाव. या आधी तिची ओळख म्हणजे एका ऑटो रिक्षा चालकाची मुलगी, अशी होती. खास ओळख नव्हतीच. आपल्या सारख्या सामान्य 'status' च्या लोकांना काही जणच ओळखतात. त्यांच्या आजूबाजूला राहणारे किंवा त्यांचे नातेवाईक. बाहेरच्या जगात त्यांना मान मिळतोच असं नाही. परंतु टिंगल उडविणारे लोक खूप असतात. आपल्या चौकटीतून बाहेर निघायची जणू काही त्यांना परवानगीच नसते. थोडं काही वेगळं केलं की लगेच बोलणाऱ्यांचे आक्रमण होते. कुठे काही तरी मोठी इच्छा बोलून दाखवायचाच अवकाश, की लगेच पाय ओढणारे एकत्र होतात. बाहेरचे व घरचे पण. बाहेरचे तर जणू काही आपला जन्मसिद्ध हक्कच समजतात.
'असं कसं शक्य आहे ? एवढी मोठी झेप घ्यायची लायकी/ऐपत तरी आहे का??" एखाद्याला आपल्या चौकटीतून बाहेर निघायचा प्रयत्न करताना बघीतले की आजूबाजूच्या माणसांचा 'ego hurt' होतो.
"आपली क्षमता समजावी. चादर बघून पाय पसरावे. स्वप्न बघावे पण काय ?? आणि किती झेपेल ?? तेही बघून घ्यावे. वेड बीड लागलंय की काय ??".....
म्हणजे आपला 'ego' शांत करायला काही ही बोलायला सर्व तयारच असतात.
माझ्या जवळ सर्व असुनही, मी तेथेच उभी आहे. आणि काही ही नसताना ही कशी काय माझ्या पूढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे ?? असा विचार करणारे शोधून तर बघा, एक नाही, शंभर मिळतील. कौतुक, सपोर्ट तर खूप दूरची गोष्ट आहे. साथ, प्रोत्साहन देणे पण जमत नाही.. कौतुक खूप छोटा शब्द असला तरी कौतुक करायला मन खूप मोठं लागत. जे खूप कमी जणांजवळ असतं.
स्वतः आपल्या चौकटीतून बाहेर निघायचे नाही व कोणी प्रयत्न केला तर ते सहन होत नाही. घरचे, आपली सांपत्तिक स्थिती, परिस्थिती बघून आपल्या मुलीला पूढे काय काय अडचणी येऊ शकतात ???ती ते सहन करू शकेल का ? आपल्या गरीबीचा लोक मजाक उडवतील. श्रीमंत लोकांच्यात आपल्याला कोण विचारेल ??? या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या अनुभवांवरून, सावधगिरी बाळगावी असे समजून, घरचे कसं जमेल तुला ?? अशी काळजी व विचार करत असावेत.
मान्या कडे पण हेच झाले. तिची आई म्हणालीच...
"अपनी चद्दर देख के पैर फैलाने चाहिए। नहीं तो पैरोंको ठंड लगेगी।"...
यावर मान्या ने दिलेले उत्तर, "पैरों को ठंड लगेगी तो, चद्दर अपने आप बड़ी हो जाएगी।"
दिवसभर 'audition' द्यायचे. तेथेच इतर मुलींना बघून शिकायचे. रात्री कॉल सेंटर मधे काम करायचे. ते सर्व करत असताना आपले स्वप्न जिवंत ठेवायचे. ते पूर्ण करायला धडपडायचे. मान्याचे कौतुक असे की तिला तिच्यात काय आहे ??? हे माहीत होते. बहुतेक तेवढे पूरे होते, तिला आपले स्वप्न पूर्ण करायला. तिला स्वतः चा मार्ग शोधायचा होता. तिचे ध्येय तिला गाठायचे होते. रस्ता कठीण होता.
म्हणतात ना. "रस्ता कठीण असला, रस्त्यावर काटे, दगड असले, तर आपली पावले भरभर पडतात. काटेरी रस्त्यावर उन्हाचे ही खूप महत्व आहे." ध्येयाकडे वाटचाल करणारे लोक आपल्या मेहनतीचा वेग एवढा वाढवतात की रस्त्यात येणाऱ्या अडचणी केंव्हा येतात ??? आणि जातात???? हे त्यांना लक्षातही येत नाही.
असेच होते मान्याचे. मान्याचे कौतुक याकरिता की तिने तिच्या रेंजच्या बाहेर चे खूप मोठे स्वप्न बघायचे धाडस केले. ते स्वप्न बघण्यात येणाऱ्या अडचणींकडे दुर्लक्ष केले. माझ्या जवळ काय नाही ??, त्यापेक्षा माझ्या जवळ काय आहे??? मी काय करू शकते ??? यावर तिने लक्ष केंद्रित केले. तिचा प्रवास सोपा नक्कीच नसेल. कारण जे क्षेत्र तिने निवडले होते तेथे वेगळ्याच प्रकारचे ट्रेनिंग लागते. एक 'grace' असावी लागते. येथे 'Brain With Beauty' ची परीक्षा असते. 'Stylish English 'बोलणे यावे लागते. उठणे, बसणे, चालणे, सर्वच शिकावे लागते. थोडक्यात हे सर्व मोठ्या श्रीमंत पैसेवाल्या लोकांचे शौक असतात असा सर्वसाधारण माणसांचा समज आहे. एक रूप सोडले तर बाकी सर्व तिला शिकायचे होते. तेही पैसे नसताना....
कितीदा तरी तिचा अपमान झाला असेल. कितीदा तरी तुच्छतेने, उपहासाने तिच्या कडे बघीतले गेले असेल. त्या 'so called high status fashionable', फर्राटेदार इंग्लिश बोलणाऱ्या मुलींमध्ये तिचा जीव घाबरला असेल. असं खूप काही झालं असेल, जे सहन करायला धाडस लागतं. खरं तर अशा लोकांचे आपल्या ध्येयापूढे, या गोष्टींकडे लक्षच जात नाही. ते आपली एनर्जी व वेळ वाया घालवीत नाहीत. हे सर्व ते स्वतःच शिकतात. स्वकर्तृत्वाने प्रत्त्येक गोष्ट मिळवतात. मान्या म्हणजे, "एक बार मैंने ठान ली, तो मैं अपने आप की भी नहीं सुनतीं" असं व्यक्तिमत्व असावं.
साधारण समज, वय व संकल्प एकाच वेळेस हातात हात घालून एकत्र फिरताना दिसत नाही. पण मान्या नशीबवान आहे तिला सर्व गोष्टी एकाच वेळेस मिळाल्या व तिने त्याचे सोने केले. आज मान्या ने मिडिलक्लास मुलांसमोर एक उदाहरण सेट केले. आदर्श ठेवला. प्रोत्साहन दिले. मोठी स्वप्न बघणे फक्त श्रीमंत लोकांचाच अधिकार आहे हा गैरसमज दूर केला. मेहनत, आत्मविश्वासाच्या जोरावर कोणी ही गरूडझेप घेऊ शकतो.
आजकाल अशी बरीच उदाहरणे समाजात दिसतात. भाजी विक्रेत्याचा मुलगा IAS झाला. पोलिस हवालदार ची मुलगी IPS officer झाली. वडिलांच्या जागेवर बस कंडक्टर ची नोकरी करणाऱ्या आईचा मुलगा इंडियन क्रिकेट टीम मधे सिलेक्ट झाला, वगैरे वगैरे. हा बदल कौतुकास्पद आहे. प्रगतीची नवीन चाहूल लागली आहे. सर्व साधारण माणसाचा आत्मविश्वास जागृत झाला आहे. ही एक प्रकारची क्रांति आहे. लोकांमधे इच्छा शक्ती जागृत झाली आहे. आपल्या चौकटीतून बाहेर पडायला तो तयार झाला आहे. हा एक चांगला संकेत आहे.
सर्व सामान्य परिस्थितीतून बाहेर निघून प्रगती करणे कौतुकास्पद आहे. आपला दर्जा वाढविणे आपल्या हातात असतं. त्याकरिता खंबीर मन असावं लागतं. किती ही सर्वगुणसंपन्न असले तरी आत्मविश्वास हा सर्वात मोठा गुण आहे. मी काय आहे ??? आणि मी काय करू शकतो ???? यातील अंतर ज्याला समजलं, गपॅ भरता आली, तो पूढे वाढतो. मान्या म्हणजे 'self made' व्यक्तिमत्त्व. ज्या दिवशी तिला Miss India Runners up चा Crown मिळाला, तो सोहळा तिच्या घरच्यांनी घरी TV नसल्याने मोबाईल वर बघीतला. ही मुलं म्हणजे "Real Life Real Hero' आहेत. यांच्यात काय विशेष आहे ??...
त्यांना कळलंय, "कामयाब होने के लिये अपना 'Comfort Zone' छोडना पडता हैं। आपल्या घरट्यातून बाहेर निघणे गरजेचे आहे"
"I can do it " हा आत्मविश्वास वाढला आहे....
Well done मान्या, धन्यवाद..
You have set an example for others....
म्हणतात ना.... Success is not free, It comes at cost.
© ® संध्या बेडेकर.
वारजे, पुणे, 7507340231

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा