👉🏽 जीवनातील दहा सर्वसामान्य किंबहुना कठीण सत्य जी प्रत्येकालाच ( साहजिकच हुशार, सुशिक्षित, सुसंस्कृत व्यक्तींनाच) मोठ्या मनाने मान्य करावीच लागतीलच, तरच आपले हे सुंदर आयुष्य तुम्ही आनंदमय, सुखमय वातावरणात जगु शकता आणि आनंदी राहु शकतात, जीवनातील खरी श्रीमंती अगदी सहजपणे अनभवु शकता.✌🏼"
👉🏽 काही गोष्टी ऐकायला खूप खूप कठीण वाटतात किंबहुना फारचं सोप्या वाटतात. पण एकदा का त्या सकारात्मक पणे, मोठ्या मनाने स्वीकारल्या, तर त्या आपल्या आनंदाचं, वाढीचं, प्रगतीचं, ऐश्वर्याचे खरं कारण नक्कीच ठरतात, आणि आपले जीवन खरर्या अर्थाने आनंदमय नक्कीच होते.👍🏼
1️⃣ सगळ्यांना खूष ठेवणं कधीही शक्य नाही. 😴, एक निर्विवाद सत्य.
तुम्ही कुठेही कितीही चांगलं काम केलं तरी, मोठ्या मनाने वागलात तरी किंबहुना सर्वांनाच प्रेमाने, आपुलकीने वागवलात तरी....😷, परंतु कुणीतरी टीका - टिपण्णी करणारच, चुका काढणारच, हे चालायचंच नाही का. नैसर्गिक आहे हे, माणसाचा स्वभाव आहे हा..., अज्ञानामुळेच....😷, त्यात विशेष असे काहीच नाही, सर्वदूर आहे हे.. हे चालायचंच....😎 म्हणूनच, सर्वच लोकांना खूष करण्यापेक्षा स्वतःशी खुप खुप प्रामाणिक राहा, स्वतः वर भरभरून प्रेम करा, स्वतःला फारच महत्व द्यावे आणि आपल्या आवडत्या, जवळच्या ( हक्काच्या ) व्यक्तींना जपा, बाकी सर्वांनाच सकारात्मक पणे....🙏🏻
2️⃣ अपयश हीच खरी शिकवण आहे.. अपयश जे शिकवते, ते कुठलाही गुरू प्रभावी पणे शिकवू शकत नाही, फक्त तुम्ही सकारात्मक आणि अभ्यासू, मेहनती पाहिजे....👍🏼
कधी कधी अपयश टाळलं जातं नाही, त्यावेळी त्यातूनच हमखास पणे अभ्यासु पणे, मेहनतीने शिकलेच पाहिजे.
यशापेक्षा अपयश आपल्याला जास्त शिकवते, परीपुर्ण पणे घडवते....👍🏼
3️⃣ वेळ कोणासाठी थांबत नाही. स्वतःच्या, दुसऱ्यांच्या वेळेला ही प्रचंड महत्त्व द्यायला शिका....😴, वेळेचं योग्य नियोजन करा.
तुम्ही तयार असाल किंवा नसाल, वेळ आपला वेग घेऊन पुढेच जात राहते. म्हणून “योग्य क्षण” ची वाट पाहणं सोडा जे करायचं आहे ते आज, आता पासूनच सुरू करा. स्वतःहा वर सकारात्मक पणे लक्ष केंद्रित करा, स्वतःला सर्वोत्तम घडविण्यासाठी / व्यक्तिमत्त्व बनविण्यासाठी प्रयत्न करा....👍🏼, जो वेळेला प्रचंड महत्त्व देतो, तो जीवनात यशस्वी होतो असे इतिहास सांगतो....👍🏼
4️⃣ बदल अपरिहार्य आहे...., त्यामुळेच काळाप्रमाणे सकारात्मक पणे बदलतं रहा, हिचं खरंतर काळाची गरज आहे....✌🏼, चुकीच्या विचारांपासून, व्यक्तीं पासून लांब रहा, व्यवस्थितपणे अंतर ठेवा, कारण कर्माचा हिशोब तर होणारच आहे, त्यामुळेच, नेहमीच योग्य ती काळजी घ्या....👍🏼
तुम्हाला आवडो वा न आवडो, परिस्थिती सातत्याने बदलणारच आहे. कारण सध्याचं जग हे मायावी जग आहे ते कोणाचेही कोणीही नाही परंतु प्रत्येक जण आपलाच आहे. प्रत्येकजण आपापल्या इच्छा आकांक्षा साठी जगत आहेत. त्यामुळेच नेहमीच सशक्त, सतर्क आणि जागरूक रहा.. काळजी घ्या. बदलाशी लढण्या पेक्षा त्याला सकारात्मक पणे स्वीकारा, त्यातुनच सकारात्मक सर्वोत्तम विश्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा....👍🏼
5️⃣ कधीही, कुठेही सर्वकाही ( बरेचसे ) तुमच्या नियंत्रणात नसतं....😎
जगातील बरेचशे विषय, तुमच्या हातात नसतात, तुम्ही फक्त आपल्या कृतींवर नियंत्रण ठेवू शकता. एक महत्त्वाचा विषय नेहमीच लक्षात ठेवा - आपण ह्या जगातील पाहुणे आहोत, त्यामुळेच, नेहमीच नियोजन बद्ध, मर्यादित रहा. आहे त्या वातावरणात, परिस्थितीत, आहे तो पर्यंत खुपचं सकारात्मकपणे, मनमोकळेपणाने जगाचा आनंद घ्यायचा, आनंदात सन्मानपूर्वक जगायचे, नेहमीच सकारात्मक, आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करायचा आणि चुकीच्या विचारांकडे, भिकारी व्यक्ती ( वैचारिक दृष्टिकोनातून ), दुःखी, मुर्ख, लाचार व्यक्ती कडे जास्तीत जास्त दुर्लक्ष करा. त्यांना सरळसरळ टाळावे आणि आपल्या सर्वोत्तम ध्येया साठी सकारात्मक पणे पुढे चालत रहा. फक्त आणि फक्त यशस्वी, तेजस्वी होण्यासाठीच....👍🏼
6️⃣ लोकांचे जास्तच मनावर घ्यायचे नाही. कारण हल्लीच्या काळात, व्यव्हारीक जगात तुमच्याबद्दल ( कोणीही, कोणा बद्दल ) सहसा कोणीही सकारात्मक पणे विचार करत नाहीत....😎, त्यामुळेच चांगल्या समाजात स्वतःची उंची, ज्ञान, आत्मसन्मान कसे वाढेल ह्यासाठी सातत्याने प्रयत्न करा ( certificate, हे कागद म्हणजे उंची नसते, हे नेहमीच लक्षात ठेवा. तुमचं ज्ञान, संस्कार, सुसंस्कृत पणा हा तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून, संभाषणातून लिहीण्यातून जाणवलाच पाहिजे, तरच तो खरर्या अर्थाने सुशिक्षित, सुसंस्कृत.... )
लोक काय म्हणतील, नावे ठेवतील का. या विचारात आपण ( काही व्यक्ती ) बराच काळ घालवतात, पण खरं म्हणजे, हल्लीच्या काळात प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त असतात. आपण समस्त समाजात वावरताना पाहतोय की कोणालाही कोणासाठी तसा वेळ नसतो, प्रत्त्येक जण आपलं पोट भरण्यासाठी उठसूठ पळत असतो. त्यामुळेच सर्वप्रथम आपल्या वर लक्ष केंद्रित करा. दुनियादारी पासून नेहमीच दूर रहा. आपलं सुंदर जग निर्माण करा. आपल्या जगाची काळजी नित्यनेमाने, काटेकोर पणे घ्या कारण....✌🏼
7️⃣ वाढीसाठी, प्रगती साठी जोखीम स्वीकारायची तयारी ठेवावीच लागते...✌🏼
साध्या सोप्या वातावरणात राहुन, सोयीच्या चौकटीत राहून बहुतांश वेळा प्रगती होत नाही. जोखीम घेणं आणि भीतीला सकारात्मक पणे सामोरं जाणं गरजेचं आहे. समस्त समाजात, व्यव्हारीक जगात वावरताना चांगले-वाईट अनुभव येतात किंबहुना आलेही पाहिजेत. त्यामुळेच व्यक्ती घडतात हे माझं ठाम मत आहे. अनुभवातूनच व्यक्ती घडते, शिकते आणि एक कर्तुत्ववान नेतृत्व ही निर्माण होते....✌🏼
8️⃣ कष्टाला, दुरदृष्टीला कधीही, कुठेही पर्याय नाही....😴
हल्लीच्या काळात शॉर्टकट आकर्षक वाटतात, पण टिकणारे यश अभ्यासु पणे परंतु नेहमीच कष्टातूनच मिळतं.👍🏼, ह्या धावत्या जगात दुरदृष्टी असणे आवश्यक आहे, कारण आपलेच भविष्य आणि भवितव्य....👍🏼
9️⃣ कुणीतरी नेहमीच तुमच्यापेक्षा चांगला असेलच, म्हणूनच तुम्ही सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न करा....😴
तुम्ही खरंच हुशार असाल तर तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर कालच्या स्वतःशी करा, इतरांशी स्पर्धा तर बिलकुल करायची नाही, कारण....😴, स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवा, स्वतः वर खुप खुप प्रेम करा, कारण नेहमीच यशस्वी, तेजस्वी होण्यासाठी प्रयत्न करायचाच, विजयी होण्यासाठीच जगायचं....👍🏼
🔟 आनंद हा आतून ( मनापासून, मनातून ) निर्माण होतो....💕
पैसा, वस्तू, माणसं — हे सगळं महत्त्वाचं आहे, परंतु काहीही कामाचं नाही. ते म्हणजे शाश्वत सुख न्हवे....👎🏿
खरंतर समाधानाची भावना आपल्या मनातून निर्माण होते, मनातून येते. त्यामुळेच नेहमीच मायावी जगात न जगता शाश्वत जगात जगा. खुपचं सर्वसामान्य माणूस म्हणूनच जगा. खुपचं नैसर्गिक पणे विचार करा. सदैव माणुसकी जपा आणि आपल्या सुंदर जीवनात अगदी सहजपणे, सदैव अनुभवा आनंद, सुख काय आहे ते.💕
एक महत्वपूर्ण विषय. - आपण व्यव्हारीक जगात, समस्त समाजात शांतपणाने, जबाबदारीने, सकारात्मक पणे वागत असताना, वावरताना आपली तब्येत ही चांगलीच ( उत्कृष्ट, सडसडीत - hit and fit, very flexible ) ठेवली पाहिजे. तरच आपणं आपली स्वप्ने, उदिष्ट सहजपणे, लवकरात लवकर पुर्ण करु शकतो आणि ती पुर्ण झाल्यावर त्यांचा मनापासून उपभोग घेऊ शकतो, त्यांचा आनंद घेऊ शकतो.
🩷 एक नेहमीच लक्षात ठेवा - आजच्या काळात, ह्या जगातील सर्वात अमूल्य, सर्वोत्तम संपत्ती हे तुमचे शरीर आहे, तुमची तब्येत आहे, त्याची मनापासून काळजी घ्या, कारण तुमचेच शरीर, तब्येततच तुम्हाला भरभरून ( अर्धवट प्रमाणात नाही....👎🏿 ) सुख, शांती, आनंद आणि समाधान देते, बाकी सर्व पानी कम चाय आहे, हे तुम्हाला तुमच्या अनुभवानेच सहजपणे समजेल. मी वेगळं सांगण्याची तशी गरज नाही....👍🏼
👉🏽👉🏽 तुम्ही आणि तुमचे अती सुंदर भविष्य, भवितव्य....😴, हे सर्व फक्त आणि फक्त " श्री....🙏🏻 " च्यांच हातात आहे. त्यामुळेच आपल्या देवासाठी नेहमीच सच्या मनाने, मनापासून समर्पण योगदान द्यावे. नेहमीच तुमच्या कर्तुत्वा मधून, कर्मातुन देवपण दिसलं पाहिजे ह्याची काळजी घ्यावी, तरच....🙏🏻, एक नेहमीच लक्षात ठेवा - देवाल नमस्कार करणं म्हणजे देवाची सेवा, प्रार्थना करणे नाही. त्यासाठी तुम्हाला समर्पित होऊन योगदान द्यावेच लागेल. तुम्हाला आपापल्या देवांवर मनापासून प्रेम करावेच लागेल. मनापासून निस्वार्थी पणाणे निष्ठा ठेवावीच लागेल, तरच....🙏🏻
👉🏽👉🏽👉🏽 नेहमीच लक्षात ठेवा, ह्या सर्वसामान्य परंतु असामान्य विषय साध्य करण्यासाठी, अनुभवण्यासाठी तुम्हाला " श्री...🙏🏻 " साथ हवीच, आशिर्वाद पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला काही विषयापासून, काही व्यक्तीं पासून, चुकीच्या विचारांपासून, चुकीच्या सवयींपासून, मोहमाया पासून अंतर हे ठेवावेच लागेल, तरच....🙏🏻
धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा