मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

2231. बाळाचे पाय पाळण्यात

      नुकत्याच झालेल्या श्री कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्याने आणि येऊ घातलेल्या श्री गणेश उत्सवाच्या निमित्याने  श्री सद्गुरूंच्या कृपेने आज बाळाचे पाय पाळण्यात हा अतिशय वेगळा, मानसशास्त्रीय दृष्ट्या थोडा विनोदी व थोडा मार्मिक लेख लिहिण्याचा योग आला. लेख संपूर्ण वाचा, माला खात्री आहे आपल्याला लेख नक्कीच आवडेल. नुसता आवडणार नाही तर आपल्या मनाला, बुद्धीला पटेल.आणि असा ' हा ' लेख शेअर करायला विसरू नका.
       आपल्या पुराणांमध्ये गणपती बाप्पाची लहानपणीची एक कथा सांगितली जाते. आपला बाप्पा लहान असतांना बाप्पाची आई, पार्वती माता अंघोळीला जाते आणि बाळ श्री गणेश बाप्पाला राखणं करायला बसविते. 'मी स्नान करीत आहे, कोणालाही येऊ देऊ नकोस.' असे सांगते. आणि श्री भगवान शंकर जे बाप्पाचे पिता असतात ते येतात. आणि आठवा पुढे काय घडते ते ? आठवले का ? 
या संपूर्ण कथेवरून बाप्पा मातृ पितृ भक्त असतात, असे समजले जाते. 
या पौराणिक कथेवरून बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. असे आपण म्हणू शकतो. 
अर्थत बाळाचे पाय पाळण्यात? म्हणजे बाळाचे गुण आणि अवगुण लहानपणीच कळतात का ? ओळखता येतात  का?  हे पाहुयात एका विनोद बुद्धीने. एक उदाहरण घेऊन.
उदाहणादाखल :
जेव्हा आई आपल्या मुलाला / मुलीला दुकानात जाऊन बटाटे आणायला सांगते, तेव्हा काय काय गंमत गंमत    घडते ! ते पाहूयात आणि बाळाचे पाय पाळण्यातच कसे ! तेही पाहूयात.
यासाठी उदा. बटाटे 20 रुपये किलो आहेत असे समजूयात.
आणि आपल्या बाळांचे म्हणजेच आपल्या मुला मुलींचे विविध नमुने पाहूयात.
नमुना नं.1)  मुल सरळ दुकानात जाते 20 रुपये दुकानदाराला देते 1 किलो बटाटे घेऊन. सरळ घरी येते. बटाटे आईला देते. 
मोठेपणीचां साधा सरळ माणूस
नमुना नं. 2) बटाटे आणायला मुल रमतगमत दुकानात जाते व रमतगमत घरी येते.
मोठेपणी पर्यटक, फिरण्याची आवड असणारे
नमुना  3) मुल पटापट दुकानात जाते व पटापट येते.
मोठेपणी कामाची घाई असलेला, उतावीळ
नमुना  4) रस्त्यातील दुकाने बघत बघत जाते दुकाने बघत बघत येते.
मोठेपणी खरेदीची आवड, शॉपिंग वाला
5) रस्त्यात कुठे डोंबाऱ्याचा खेळ, जादूचा खेळ किंवा भिकारी वैगरे गाणे म्हणत असतील तर तेथे रेंगाळणारा.
मोठेपणी संगीत, नाटक, सिनेमाची, कलेची आवड असणारा
6) मी आत्ताच जायला पाहिजे का? नंतर नाही का चालणार? असे प्रश्न विचारणारा.
मोठेपणी आळशी
7) आईने सागितले तरी ऐकत नाही. आईने वडिलांची भीती दाखविली. तर म्हणतो मी कुणाच्या बापाल भीत नाही.
मोठेपणी गुंड 
8) मित्राला बरोबर घेऊन गप्पा मारत जाणारा.
मोठेपणी मित्रपरिवारात रमणारा
9)  स्वतः न जाता मित्राला बटाटे आणायला सांगणारा.
मोठेपणी लीडर, ऍडमिनिस्ट्रेशन
10) दुकानात जाऊन पैसे नीट मोजून देऊन, नीट बघून बटाटे आणणारा.
मोठेपणी व्यवहार कुशल
11) बटाटे आई कडे देऊन तिथेच रेगळणारा, काहीतरी खाऊ द्यावा म्हणून.
मोठेपणी लोभी
12) दुकान दाराला बटाटे स्वस्त दे म्हणून 20 रुपये कीलोचे बटाटे 18 रुपये किलोने आणून 2 रुपया घरी परत देणारा.
मोठेपणी काटकसरी, व कुटुंबावर प्रेम करणारा
13) 20 रुपयाचे बटाटे 18 रुपयात घेऊन 2 रुपयाचे चॉकलेट खाणारा.
मोठेपणी फाळके बाज, कमिशन एजेंट
14) 20 रुपयाचे बटाटे 18 रुपयात घेऊन दुकान दाराला सांगणार की 1 किलो बटाटे न देता 900 ग्रॅम दे आणि 100 ग्रॅम बटाट्यांचे 2 रुपया असे एकूण 4  रुपये घेऊन त्या 4  रुपयाचा खावू खाणारा.
मोठेपणी खोटी दलाली करणारा
15) दुकानदाराचे लक्ष नाही असे पाहून हळूच एक दोन बटाटे पिशवीत टाकणारा.
मोठेपणी चोर
16) सकाळी बटाटे आण म्हणून सागितले असताना अग मी विसरलो, पैसे पडले, पैसे चालत नाहीत, बटाटे नव्हते,  दुकान बंद होत. अशी खूप कारणे देणारा व इलाजच नाही  म्हणून ज्याला बटाटे आणायला आई सांगते तो.
सरकारी नोकर
17) नीट जाऊन नीट पिशवीत पॅकिंग करून काळजीपूर्वक  सांभाळून बटाटे घरी घेऊन येणार 
प्रायव्हेट नोकरी
18) आई कडे एक  बटाटा मागुन घेऊन तो मातीत लावण्याचा प्रयत्न करणारा किंवा कापून निरीक्षण करणारा.
मोठेपणी शास्त्रज्ञ
19) बटाटे आणून दिल्यावर आई ने दिलेला खाऊ इतरांना वाटून टाकणारा
समाज सेवक
20) बटाटे घेतल्यावर त्यातील काही बटाटे रस्त्यात वाटून टाकणारा.
थोर समाजसेवक
21) बटाटे आणायला चाललो आहे  हे गावभर ओरडून ओरडून तेच तेच दिवसभर वेगवेगळ्या पद्धतीत सांगणारा.
रिपोर्टर, पत्रकार
22) एकदा सकाळी 20 रुपये घेऊन "हा लगेच आलो" म्हणून, आश्वासन देऊन गेलेला व रात्री उशिरा हसत हसत घरी येऊन आईला जो सांगतो 20 रुपये पडले, खरतर ज्याने 20 रुपये खाल्ले व आई ला म्हणतो उद्या परत 20 रुपये दे मी नक्की बटाटे आणतो.
तो राजकारणी
23) एकदा सकाळी 20 रुपये घेऊन "हा लगेच आलो" म्हणून आश्वासन देऊन गेलेला, दुकानदारांकडून उसने बटाटे घेऊन परस्पर मित्राच्या घरी देऊन, मित्राच्या आईला सांगणार, ' आईने सागितले बटाटे वडे करून द्या.' म्हणून  बटाटेवडे खाणारा व रात्री उशिरा हसत हसत घरी येऊन आईला जो सांगतो 20 रुपये पडले. ज्याने 20 रुपये पण  खाल्ले आणि बटाटे वडे पण फस्त केले. परत दुसऱ्या दिवशी बोलीबच्चन करून आई कडून बटाट्यांसाठी 20 रुपये वसूल करणारा. आणि आई ज्याला ' माझे बाळ किती महान आहे.' अशी स्तुती सुमने करणार. 
तो कसा राजकारणी होणार
हे मी काय आपल्या सांगायला पाहिजे.
शक्यतो हे असेच असते आपला मूळ स्वभाव बदलत नसतो. जसे आपण मोठे होतो तसे आपल्यावर विविध प्रकारचे शेंदूर लेपन मात्र होते.
बघा एक गंमत म्हणून विचार करुयात आणि आठवूयात आपले लहानपण ! तसेच गंमतीने 
शोधुयात बाळाचे पाय किती पाळण्यात दिसतात ते ?
किंवा आता जे कोणी लहान आहेत त्यांचे पाळण्यातील पाय ओळखण्याचा प्रयत्न करूयात. 
पण एक निख्खळ गंमत म्हणूनच  हं !
कॉमेंट नक्की करा. अशी काही उदाहरणे सुचली तर नक्की कळवा. 
आणि हो लेख फॉरवर्ड करायला विसरू नका, बाळाचे पाय पाळण्यात. हे ओळखण्यासाठी.
धन्यवाद !

लेखक:
© शैलेश विजया सोमनाथ महाजन, रा. बदलापूर.
9322755462

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...