मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

2208. आपली परंपंरा आणि त्यामागील कारणे

       सम्पूर्ण जगात आपला भारत म्हणजे इथे पाळल्या जाणाऱ्या परम्परा आणि रितीरिवाजांसाठी  सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो आणि या परम्परा आपल्याकडे पण पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत. पण या मागे शास्त्रीय कारणेही आहेत.  ज्यामुळे या परंपरांचे नियमित पालन केले जाते.
स्त्रियांमध्ये बांगड्या घालण्याची पूर्वापार पद्धत आहे. बांगड्या हा केवळ सौन्दर्य  खुलविणारा अलंकार नसून या मागे विज्ञान आहे. हातामध्ये बांगड्या घातल्या नंतर हाताच्या हालचाली सोबत बांगड्यांची हालचाल होत असते. त्यांच्या हलण्यामुळे झालेल्या घर्षणामुळे रक्ताभिसरण चांगले राहते.  तसेच धातूच्या बांगड्या घातल्याने  शरीरातून बाहेर दिली जाणारी ऊर्जा  या धातू मध्ये सामावून पुन्हा शरीरात पाठविली जाते.
बऱ्याच भारतीय प्रांतांमध्ये सुवासिनी भांगात कुंकू भरतात. हि सौभाग्याची निशाणी आहे हे तर खरंच आहे, परंतु त्या बरोबर कुंकवा मध्ये  अतिशय कमी प्रमाणात  पाऱ्याचा वापर केलेला असतो. त्या पाऱ्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन मेंदू सतर्क राहतो आणि रक्तदाब हि नियंत्रित राहतो.
आपल्या नदी,विहीर  किंवा वाहत्या पाण्यामध्ये रुपया, पैसा टाकण्याची पद्धत आहे.  हा एक प्रार्थनेचा किंवा श्रद्धा भक्तीचा भाव असला तरी त्यामागे शास्त्रीय कारण आहे. पूर्वीच्या काळी पिण्याचे पाणी नदी किंवा विहिरीतून आणले जायचे, त्याकाळी नाणी हि तांब्याची असत. ती नाणी पाण्यात एकूण पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक असलेले  तांबे पाण्या मार्फत पोटात जाऊन विकारांना दूर करण्याचे काम करत.
आपल्याकडे दोन्ही हात जोडून अभिवादन करण्याची पद्दत आहे. नमस्कार मुद्रेत आपले दोन्ही हात जुळलेले असतात.  या दोन्ही हातावर असलेले डोळे, कान, मेंदूचे प्रेशर पॉइंट  हात जोडल्याने दाबले जातात. तेव्हा डोळे, कान, मेंदूच्या कार्याला अधिक चालना मिळते. पूर्वीच्या काळी सकाळी सूर्योदयाचे वेळी स्नान झाल्या नंतर ओलेपणाने  तुळशीची पूजा करीत असत.  किंवा सूर्याला अर्ध्य देत असत. काही ठिकाणी अजूनही हि प्रथा सुरु आहेच. याचा फायदा असा  कि  सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ‘ड’ जीवन सत्वाचे प्रमाण भरपूर असते. ते आपल्या शरीराला आवश्यक असलेले जीवन सत्व आपोआपच मुबलक मिळत असे. 
लग्नानंतर बायकांनी जोडवी वापरण्याची पद्धत  भारतात जवळजवळ सर्वच प्रांतात आहे.  जोडवी पायाच्या दुसऱ्या बोटात म्हणजे अंगठ्याच्या शेजारच्या बोटात घातली जातात. वैज्ञानिकांच्या मते या बोटाची नस स्त्रियांच्या  गर्भाशयाशी जोडलेली असते.पायांच्या दुसऱ्या बोटात जोडवी घातल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होऊन गर्भाशय निरोगी राहते. तसेच जोडवी धातूंची बनलेली असल्याने जमिनीतील ऊर्जा शोषून शरीरात पाठविण्याचे कार्य जोडवी द्वारे केली जाते.
आपल्याकडे बऱ्याच तिथीला उपवास करण्याची पद्धत आहे.  एरव्ही आपण सर्व प्रकारची पदार्थ खात असतो  परंतु उपवासाच्या  निमित्ताने केलेल्या लंधानामुळे  शरीरातील पचनशक्ती सुधारून  शरीरातील घातक द्रवे बाहेर टाकली जात असत. इत्यादी बरीच परंपरा आहेत त्या सर्व आपल्याला फायदेशीरच आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...