झोपेतच दामोदररावांच्या अंगावरून पुन्हा लघवी झाली होती. ते घाईघाईनं उठून चादर काढू लागले. कारण कुठं सुन-बाप किंवा मुलगा पाहतील की काय ही भीती होती. कालच सुन काजलनं नवी बेडशीट अंथरली होती आणि रविला सुनावलंही होतं.
“पुन्हा पप्पांनी बिछाना खराब केला तर मी धुणार नाही, घर सोडून जाईन पण ही चादर धुणार नाही.”
म्हणूनच कालपासून दामोदररावांना जास्त पाणीही द्यायचं नाही असं ठरवलं होतं मुलगा-सुनेनं.
पंच्याऐंशी वर्षांचे दामोदरराव... किडनीच्या आजारामुळे असं क्वचित घडायचं. बिचारे लाजिरवाणे होत.
घाईघाईनं भिजलेली चादर त्यांनी बाथरूममध्ये नेली आणि पाण्यानं धुवायला लागले. हात थरथरत होते, श्वास फुलत होता, पण मनात एकच घाई — “सुनबाई आली तर पुन्हा ओरडतील.”
इतक्यात त्यांनी पाहिलं, दाराशी मुलगा-सुन उभे होते.
कांपणाऱ्या आवाजात ते म्हणाले,
“सुनबाई, आता नाही होणार… बघ मी स्वतः धुतली आहे.”
सुन काजल तावातावानं म्हणाली,
“पाहा, पुन्हा बिछाना खराब! किती वास येतोय. हॉस्पिटल मध्ये दाखल करा त्यांना.”
पण मुलगा रविनं तिचा हात धरत थांबवलं,
“काजल, तुला हवं असेल तर माहेरी जा. पण मी बाबांना कधीच सोडणार नाही.
माझ्या वडिलांनी माझे बालपण काढले शी सू सगळ आईच्या मागे त्यांनीच केले आहे .
तोच बाबा ज्यांच्या गणवेशावर मी टॉयलेट करून टाकलं होतं त्यांच्या सन्मान सोहळ्याच्या दिवशी, आणि तरीसुद्धा त्यांनी एक शब्दही न बोलता हसत-हसत मला तयार करून नेलं होतं — त्या बापाला मी आज कसं काय टाकून देऊ?”
रवीनं वडिलांना कुशीत घेतलं, खुर्चीवर बसवलं, नवीन चादर अंथरली, कपडे बदलून दिले आणि म्हणाला,
"बसा बाबा, थंडी लागू नये म्हणून तुमच्यासाठी चहा करून आणतो.”
दामोदररावांचे थरथरणारे हात मुलाच्या डोक्यावर आशीर्वाद द्यायला उचलले.
डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, जे त्यांनी धोतराच्या कडेनं पुसले. समोरच्या भिंतीवर लावलेल्या पत्नी विमलाच्या फोटोला पाहून मनाशीच म्हणाले.
“बघ गं विमला, तू म्हणायचीस, ‘मी गेल्यावर तुझी काळजी कोण घेईल?’
पाहिलंस का, आपला रवि कसा काळजी घेतोय आपल्या म्हाताऱ्या बापाची.”
रवीने काजल ला ही सांगितले "तूझ्या मागे खूप काम असतात तुझा त्रागा बरोबर आहे चूक तर माझी आहे मी माझ्या वडिलांचं काहीच करत नाही . तूझ्या बद्दल माझी काही तक्रार नाही ग तू तरी एकटी कशी करणार "
दरवाज्यात उभी असलेली सुन काजलही शांतपणे डोळे पुसत होती. तिने रवीचा हात हातात घेतला आणि त्याला म्हणाली "मी कुठे ही माहेरी जाणार नाही . जो नवरा वडिलांवर एव्हढे प्रेम करतो तो माझी ही खूप काळजी घेईल.फक्त आपण दोघे मिळून करू"
दामोदर रावांच्या चेहर्या वर हलके हसू होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा