बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

2261. कोल्ह्याचं शिंग

 "घरात पैशे लयी येतात पण टिकतच नाही" हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न.आणि अशा प्रश्नंची चर्चा एकमेकांसोबत  नव्हे तर अगदी भोंदु बाब सुद्धा आपल्याला करतात "माई तुझ्या हातात लक्ष्मी येते पण ती रहात नाही." 😀 
आपल्यालाही त्या बाबाच खरं वाटतं लगेच. आम्ही जेव्हा बारामती रुईपाटी बडेचाळ मधे रहात होतो  तेव्हा अशाच एका बाईला सगळे बळी पडले. 
चाळीत राहायला होतो त्यावेळी आमच्याकडे मेस होती दिवसभर कामात व्यस्त होते अशाच एका दुपारी बाहेर बायकांची बडबड ऐकायला आली म्हणून बाहेर डोकावले तर एक म्हातारी बायकांना "घरात पैसा येतो पण टिकत नाही" अमुक अमुक बोलत होती हे ऐकुण मी सुद्धा गेले 
   ती बायकांना म्हणाली "भांड्यात ,सुपात पसाभर तांदुळ आणा "
 सगळ्या बायकांनी मोठ्या भांड्यात तांदुळ आणले मग तीनं तीच्याकडे असलेल्या गाठोड्यातुन एक छोट गाठोडे बाहेर काढले आणि"यांच्यामधे कोल्हयाचं शिंगं आहे " म्हणाली..
     त्या छोट्या गाठोड्यातुन तीनं एक प्राण्याचं मुंडकं बाहेर काढलं (कुठल्यातरी प्राण्यांच्या मुंडक्याचा सापळा होता तो)
बायकांनी तीच्या समोर ठेवलेल्या भांड्यातल्या तांदळावर तीनं  एक कपडा ठेवला त्या कापडावर ते मुंडकं ठेवलं आणि ओठात काहितरी पुटपुटली आणि म्हणाली "ईथुन पुढे तुझ्या घरात लक्ष्मी वास करणार.तुझी सगळी साडेसाती निघुन जाईल.आता हे तांदुळ कोणाला तरी दान कर."
बायकांनी बघितलं होतं कशाच तरी"ते " मुंडकं" तांदळावर ठेवलं म्हणून "नको आज्जी तांदुळ तुम्हालाच राहु द्या" म्हणाल्या.
सात आठ किलो तांदुळ त्या म्हातारीने तीच्या गाठोड्यात भरले...
तीची नजर माझ्यावर गेली "पोरी तु पण भांड्यात तांदुळ आण तुझं नशिब जोरावर आहे* म्हणाली 
   असं ऐकुन माझं मन पाकळलं गेले घरात पातेलभर तांदुळ आणले आणि तीच्या पुढ्यात ठेवले.
तीन तांदळावर कपडा ठेऊन ते मुंडकं ठेवलं आणि ओठातल्या ओठात पुटपुटली आणि "हे बघ पोरी...तु लयं कष्ट करती तुझा नवरा खरा माणुस आहे त्याला खोटं आवडत नाही.तुझ्या पायी लक्ष्मी आहे.दोघबी कष्ट करता पण पैसा टिकत नाही " असं म्हणल्या बरोबर मी मान डोलावली....
मग म्हणाली"हे तांदुळ कोणाला तरी देऊन टाक कोल्ह्याचं शिंग ठेवलं आहे तु हे तांदुळ माघारी घेणार का?"
     माझी ट्युब लाईट पेटली आणि तीची चालाखी लक्षात आली मी लगेच तील"हो आज्जी मी हे तांदुळ माघारी घेणार" तर ती "याच्यावर मी कोल्ह्याचं शिंग ठेवलं आहे तुला चालन का हे तांदुळ " "हे तांदुळ कोणाला तरी देऊन टाक " "तुला चालण का हे तांदुळ "
मी"हो नाही चालायला काय झालं मी चार पाण्याने धुऊन खाईन "
म्हातारी सारखा जोर लावत होती "कोल्ह्याचं शिंग" कोल्ह्याचं मुंडकं ठेवलं आहे तु खाऊ नको हे तांदुळ कोणाला तरी देऊन टाक "
 पण मी माझ्या शब्दावर ठाम राहिले....
म्हातारी चवताळली"ऊचल तुझं भगुलं " मी पातेलं ऊचलुन घरात आणलं .. आणि म्हातारी निघुन गेली...
चाळीतल्या बायकांची कुजबुज सुरु झाली "अशाला घरात नेले तांदुळ.देऊन टाकायचे म्हातारीला"
मी त्यांना उत्तर दिलं "तुमचं बघुन मी पण तांदुळ आणले पण माझ्या लक्षात तीची चालाखि आली जेव्हा ती म्हणाली"कोल्ह्याचं शिंग " कोल्ह्याला शिंगं आसतात का?"
हे ऐकुण बायकांचा हशा पिकला आणि म्हणाल्या"काकडे ताई तु लयी हुशार ठरली आमचे तांदुळ वाया गेले घाबरुन"
माझ्याकडचे तांदुळ मी पिशवीत भरून ठेवले आणि दिवाळीत गावी माहेरी येताना घेऊन आले आणि कोंबड्यांना खाऊ घातले...मी खाल्ले असते पण माझ्याकडे मेस होती ..ऊगाच मनात शंका नको म्हणून 
कोल्ह्याला शिंगं असण्याची कथा ही पुर्वी लोककथा होती.मुखत: आफ्रिका,अशिया मधील काही जमातीच्या लोककथांमधे त्याचा उल्लेख आढळतो हे माझ्या वाचनात आलेले होते त्याआधी...
हि घटना घडुन आज जवळपास १९वर्ष लोटली ...
पैसा टिकत नाही" तर तो "योग्य नियोजन करून टिकवावा लागतो"
भोंदुबाबा देवॠषी यांच्या नादाला लागण्यापेक्षा कष्टावर विश्वास जास्त ठेवा....
भावनिक प्रवाहात वाहत जाताना स्वतःला सावरता आलं पाहिजे.... म्हणजे फसवणूक होत नाही.

सौ.संध्यारजनी आबासाहेब काकडे 
मु.पो.राहुरी.जि.अहिल्यानगर
पोस्ट काॅपी करण्यापेक्षा शेअर करा सुज्ञानांनी आणि काॅपी केलीच तर नावासहित पोस्ट करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...