मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

2234. मुलांना स्मार्टफोनच्या विश्वातून बाहेर

 एक सुंदर गोष्ट. 
      गोष्ट अमेरिकेतील आहे. बॉबी व्हाईट नावाच्या पोलिसाला मुलं रस्त्यावर दंगामस्ती करून गोंधळ घालत असल्याचा कॉल आला. हा पोलीस घटनास्थळी पोहोचला तर त्याने बघितले काही मुले रस्त्यावर बास्केटबॉल खेळत होती. पोलीस आल्याचे बघून मुलं जरा घाबरली मात्र बॉबी व्हाईट ने त्यांच्या हातातील बास्केटबॉल घेतला आणि स्वतः त्यांच्यामध्ये खेळू लागला. ते बघून त्याच्यासोबत आलेले पोलीस साथीदार सुद्धा मुलांसोबत खेळायला लागले. सुरुवातीला तिथे 4-5 मुले होती मात्र पोलिसांना खेळतांना बघून आजूबाजूच्या घरातील मुले सुद्धा त्यांच्यात सामील झाली. संध्याकाळी पोलीस डिपार्टमेंटच्या पी आर ने त्यांच्या वेबसाईटवर पोलिसांचा मुलांसोबत खेळतानाचा व्हिडिओ अपलोड केला. आणि त्याखाली लिहिले "मुलांनी घरात बसून व्हिडिओ गेम खेळण्यापेक्षा किंवा टीव्ही बघण्यापेक्षा गल्लीत खेळलेले कधीही चांगले". हा व्हिडिओ तब्बल 50 लाख लोकांनी बघितला तसेच दीड लाख लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओची अमेरिकाभरात चर्चा झाली. अमेरिकन मीडियाने सुद्धा हा मुद्दा उचलून धरला आणि आपल्या संध्याकाळच्या प्रोग्राम मध्ये चर्चासत्र आयोजित केली. पुढच्या वेळेला बॉबी व्हाईट आपल्या सोबत एक सरप्राईज घेऊन गेला. मुलं खेळत असताना पोलिसांच्या कारमधून प्रसिद्ध बास्केटबॉल प्लेयर शकील ओनिल उतरला. मुलांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. शकील ओनिल मुलांमध्ये बराच वेळ खेळला. त्यातील एका छोट्या मुलाला त्याने 100 डॉलरही बक्षीस दिले. या घटनेचे पडसाद अमेरिकेत उमटले आणि अमेरिकन जनतेने पोलिसांचे आभार मानले.  बऱ्याच ठिकाणी मुले घराबाहेर पडून गल्लीत खेळायला लागली. आणि लोकांनी सुद्धा त्यांच्याबद्दल तक्रार करणे सोडून दिले. हा अमुलाग्र बदल फक्त एका संवेदनशील पोलिसामुळे घडला.
     आपल्याकडेही भारतात आता मुलांनी गल्लीत खेळणे जवळपास सोडून दिले आहे. पालकांना सुद्धा मुलांचे घरातच राहणे आवडते. अशामध्ये मुलांना स्मार्टफोन किंवा टीव्ही ची सवय लागते आणि त्यांच्यातील शारीरिक ऊर्जा कामात येत नाही. यामुळे मुलांना अनेक मानसिक शारीरिक समस्या निर्माण होतात. लोकांना सुद्धा शांततेची एवढी सवय झाली आहे की गल्लीत मुले खेळली की लगेच त्यांना त्रास होतो. योग्य काय अयोग्य काय हे समजून घेण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही. ज्या गल्लीमध्ये मुलं खेळतात खरंतर त्या गल्लीमध्ये चैतन्य, आनंद नांदतात. मुलांना स्मार्टफोनच्या विश्वातून बाहेर काढण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यांना बाहेर खेळू देणे. अशा वेळेला सर्व पालकांनीच पुढाकार घेऊन मुलांना बाहेर खेळण्यासाठी प्रवृत्त केले तर याहून चांगली गोष्ट कोणती असणार !!

अजय पाटील
चाइल्ड काऊन्सलर, जिंदगी फाउंडेशन.
8308706882

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...