शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1666. शबरी

       दीनानाथ नाट्यगृह, शनिवारी सायंकाळी "शबरी 'नाटकाचा प्रयोग. या नाटकचा हा पाचशेवा प्रयोग. नाटक नेहेमी प्रमाणे फुल्ल. नाटकाच्या मध्यन्तरात शबरी नाटकाने पाचशे प्रयोग केले त्याचा कौतुक सोहळा ठेवला होता. पहिल्या अंकाचा पडदा खाली गेला आणि पाच मिनिटात पुन्हा वर गेला. स्टेजवर मुंबईचें महापौर, नाट्य परिषदचे अध्यक्ष तसेच नाटकाचे लेखक अश्विन, दिग्दर्शक आणि या नाटकात भूमिका करणारा हेमंत आणि शबरीची भूमिका करणारी मेधा होती. प्रास्ताविक नंतर महापौरानी सध्याच्या काळात एका नाटकाचे पाचशे प्रयोग होतात यासाठी नाट्यनिर्माता जाधव, लेखक अश्विन आणि दिग्दर्शक हेमंत यांचे कौतुक केले आणि विशेष करून अपंग शबरी ची भूमिका करणाऱ्या मेधा चें कौतुक केले.
नाट्यनर्माता अध्यक्ष यांनी बोलायला सुरवात केली आणि ते शबरी ची भूमिका करणाऱ्या मेधा चें तोंड भरून कौतुक केले. शबरी ची भूमिका रंगभूमीवर करणे हे खूपच आव्हान होते, आणि एका अपंग मुलीचा अभिनय तिने अचूक केला आहें. तिचे कौतुक करावे तेवढे थोडे, अशी भूमिका आणि असे नाटक लिहिणारा अश्विन याचे पण कौतुक. मग या नाटकाचा दिग्दर्शक आणि भूमिका करणारा हेमंत उभा राहिला "रसिकहो, आमच्या वझे कॉलेज मधून उन्मेष एकांकिका स्पर्धे साठी एकांकिका शोधत होतो, त्यावेळी अश्विन यांची ही एकांकिका वाचनात आली. या एकांकिकेने भारावून गेलो आणि करायला घेतली. शबरी च्या अत्यन्त कठीण भूमिकेसाठी माझ्याच वर्गातील मेधा हिची निवड केली आणिमी जींकलो. कारण एका अपंग मुलीचे बेअरिंग तिने पूर्ण पन्नास मिनिटे उत्तम निभावले. ती एकांकिका अनेक ठिकाणी पहिली आली आणि मेधा प्रत्येक ठिकाणी विजयी ठरली. त्या एकांकिकेचा खूपच बोलबला झाला आणि मग अश्विन ने त्याचे दोन अंकी नाटक केले
हेमंत पुढे म्हणाला "रसिकहो, आजच्या पाचशे प्रयोगादरम्याने एक आनंदाची बातमी जाहीर करतो ती म्हणजे हे नाटक पाचशे एकावन्न प्रयोगानंतर बंद करण्यात येईल '.
अशी घोषणा होताच प्रेक्षक उभे राहिले "नाही नाही,हे नाटक बंद करायचे नाही, आम्ही पुन्हा नाटक पाहायला येणार, याचे हजार प्रयोग करायचे,'
हेमंत त्यांना शांत करत म्हणाला "शांत व्हा, शांत व्हा, प्रयोग बंद करायचे आहेत कारण या नाटकावर सिनेमा करायचा आहें आणि त्याचे दिग्दर्शन पण मीच करणार आहें आणि शबरी कोण करणार सांगा?
प्रेक्षक ओरडत राहिले "मेधा.. मेधा.. मेधा..
हेमंत प्रेक्षकाना समजावत म्हणाला 'होय होय.. मेधा शिवाय कोण? आणि म्हणूनच प्रयोग थांबवावे लागणार. पण शूटिंग संपले की पुन्हा प्रयोग सुरु करू '
अशी घोषणा होताच प्रेक्षक शांत झाले. नाटक पुढे चालू झाले आणि मग संपले. दुसऱ्या अंकात शबरी अपघातात सापडते आणि ती अपंग बनते, ते प्रसंग पहाताना प्रेक्षक नाटकाशी समरस होतात आणि कधी रडू लागतात हे त्यांनाच कळत नाही, अशा वेळी तिच्या शेजारी रहाणारा मनोज तिच्या मदतीला येतो आणि ती त्यातून बाहेर पडते.नाटक संपले, प्रेक्षक भरवलेलंय स्थितीत आत येऊन मेधाला भेटायला येतच असतांत. त्याची तिला सवय झालेली होती.
नाटक संपल्यावर मेधा आणि हेमंत कॅन्टीन मध्ये शिरली. त्याना नेहेमी आवडणारी जागा कोपऱ्यातील. त्या कोपऱ्यातुन तलावाचे पाणी आणि पाण्यातील फिरणाऱ्या नौका दिसत. संध्याकाळी मंद लाईट सोडलेले असत. छोटी छोटी मुले आपल्या आईवडीला सोबत नौकेतून फिरत. मेधाला हे दृश्य फार आवडे.ती एका खुर्चीवार येऊन बसली, तिच्यासमोर हेमंत येऊन बसला.
हेमंत -बोल, काय मागऊ?
मेधा -कॉफी आणि टोस्ट.
हेमंतने वेटरला ऑर्डर दिली.
हेमंत -प्रयोग छान झाला.
मेधा -एवढी तालीम मग एवढे पाचशे प्रयोग. प्रयोग बरा होतोच पण रोज तेंच तेंच करून मेक्यानिकल व्हयाला होत.
हेमंत -आणखी पन्नास प्रयोग. मग शूटिंग सुरु.
मेघा गमतीने म्हणाली, "मला घेणार ना फिल्ममध्ये?
हेमंतने तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला "काय गम्मत करतेस ग, तूझ्याशिवाय शबरी कोण करणारे आहें काय?तलावातील फिरणाऱया होडीकडे पहात मेघा म्हणाली 
मेघा -हेमंत, मग मुलुंडच्या जागेच काय झालं?
हेमंत -अजून थोडे पैसे भरावे लागतील, तू मागे दिलेले तीन लाख आणि माझे दोन मिळून पाच भरलेत.हौसिंग करायला पाहिजे.
मेधा -मी वसंतरवाकडून ऍडव्हान्स मागते. पण फिल्मचे मला किती मिळतील?
हेमंत -आता वसंताकडे पैसे आलेत. आणि सिनेमा करणार म्हणजे तो कर्ज काढणार. बाकी इंडस्ट्रीतं बाकी नट्या अंदाजे दहा लाख घेतात. तू पंधरा माग.
मेधा -एवढे पैसे देतील मला?
हेमंत -दयायलाच लागतील त्यांना.तूझ्या खेरीच शबरी कोणी उत्तम करू शकणार नाही, आणि दुसऱ्या नटीना प्रेक्षक पसंत करणार नाहीत. कारण या नाटकामुळे तुला सोशल मीडिया वर कमालीची पसंती मिळाली आहें.मेधा मग उठली. ती निघताना हळूच हेमंतने तिचा हात हातात घेतला. निघता निघता ती म्हणाली "साईट वर केंव्हा जाऊया?'.
"नुकत प्लॉट सफाई सुरु आहें, जरा बांधकाम वर येउदे, मग जाऊ, तसा तुला प्लॅन पाठवलाय मी व्हाट्सअपवर '.
हो, मी निघते '
म्हणत मेधा बाहेर पडली आणि आपल्या स्कूटरकडे गेली. तिने हेल्मेट डोक्यावर चढवले आणि सफाईदार वळण घेत ती नाट्यगृहाच्या बाहेर पडली.
या नंतर नाटकाचे दौरे नागपूर पासून संभाजीनगर पर्यत आणि पुणे पासून कोल्हापूर, कोकण ते गोवा असे सुरु झाले.
दौऱ्यावर असताना ती दोघ फिरून घायची. विशेष करून कोकण गोव्यातील बीच, देवळ आणि वेगवेगळी हॉटेल्स चवदार जेवणासाठी. आता दोघांना एकमेकांशिवाय चैन पडायची नाही. नाट्य सिनेमा वर्तुळात आणि मासिकत आणि सोशल मीडिया वर त्याच्या प्रेमाची चर्चा आणि खबरबात चर्चेली जात होती.
अशांत प्रयोग सुरु होते. फिल्म करण्याच्या दृष्ठिने पण धावपळ सुरु होती. फिल्म साठी इतर कलाकार निवडले जात होते. कॅमेरामन, संगीतकार, नृत्यदिग्दर्शक, एडिटर असे अनेक माणसे जवळ येत होती.शूटिंग साठी कोल्हापूर सांगली या भागातील लोकेशन्स निवडली गेली होती.
मेधाचें कपडे तयार होत होते. तिच्यासोबत तिच्या आईची भूमिका सुकन्या ही मोठी अभिनेत्री साकारणार होती. वडील मोहनराव, मोठा भाऊ अजिंक्य, हेमंत तिच्या प्रियकराचा रोल करणार होता आणि त्याच्या आई वडिलांसाठी निलीमा आणि जयंत हे मोठे कलाकार करणार होते, सर्वांनी आपल्या डेट्स या फिल्म साठी दिल्या होत्या, आणि...
"शबरी '
प्रयोग क्रमांक 549
आज मुलुंड मधील कालिदास नाट्यगृहात प्रयोग. आता शेवटचे दोन प्रयोग आणि मग पंधरा दिवसांनी शूटिंग साठी कोल्हापूर भागात निघायची सर्वांनी तयारी केलेली. जून महिन्याचा पाऊस सुरु झालेला.
     आज मेधाच्या आईचा वाढदिवस म्हणून प्रयोग संपल्यावर मेधा झटपट बाहेर पडली. बाहेर थोडा थोडा पाऊस होता म्हणून तिने रेनकोट चढवला आणि डोकयावर हेल्मेट चढवून तिने स्कुटर चालू केली, तिची स्कुटर मुलुंड चेकनाक्यावरून पुढे गेली आणि तिथून टर्न घेऊन तिला मुख्य रस्त्याला लागायचं होत म्हणून तिने गाडी वळवली पण काही कळायचंय आत गाडी स्लिप झाली आणि मेधा रस्त्यात पडली, तिच्या अंगावर स्कूटर पडली.
मोठा आवाज झाला,
"गीर गयी.. गीर गयी.., अशी ओरड पडली, मागच्या गाड्या करकंचून ब्रेक दाबत थांबल्या.
कोणी तरी  धावलं, पोलीस धावले आणि तिच्या अंगावरची गाडी ओढून बाजूला घेतली, मेधा जोरात जोरात ओरडत होती, रडत होती. पोलिसांनी ऍम्ब्युलन्स बोलावली आणि तिला उचलून आत ठेवले आणि ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दिशेने पळाली.
तिच्या घरी फोन गेले, आई वडील घाबरत हॉस्पिटल मध्ये आले.
दुसऱ्या दिवशी मेधाला जाग आली तेंव्हा तिचे अंग कमालीची दुखतं होते. पाय तुटून गेला की काय असे तिला वाटले. रात्री डॉ नी गुंगीचे इंजेकशन दिल्याने तिला झोप लागली होती. आजूबाजूला आई बाबा, मावशी सगळे काळजीत उभे होते.
पुन्हा नर्स आली तिने इंजेकशन दिले.
    दोन दिवसांनी तिच्या पायावर प्लास्टर चढवळे होते, एका हातावर प्लास्टर होते. कम्बर कमालीची दुखतं होती.
आणि दोन दिवसांनी ती घरी आली. तिच्या असिसिडेन्ट ची बातमी कळताच हेमंत, लेखक अश्विन, निर्माते वसंतराव आणि नाटकातले तिचे सहकारी सतत येत जात होते.
सुरवातीचे चार दिवस अनेक माणसे, नातेवाईक तिच्या चौकशीला येत होते, जात होते. शेजारी, नातेवाईक, मित्र मैत्रिणी तसेच नाट्य सिनेमा क्षेत्रातील मंडळी.
हेमंत, आशिष येत होते. त्याचे चेहेरे काळजीने भरले होते, मेधाच्या लक्षात येत होते, शूटिंग तारीख जवळ येत होती, इतर कलाकारांच्या डेट्स घेतल्या होत्या, आणि मुख्य अभिनेत्रीचा हात आणि पाय प्लास्टर मध्ये होता.
मग एकदा आशिष, हेमंत आणि वसंतराव तिच्या घरी आले आणि तोपर्यत कोल्हापूर मध्ये जाऊन इतर शॉट्स जे मेधा खेरीच होते, ते पुरे करून मग तिचे शॉट्स घेऊया असे म्हणाले.
मग सर्व युनिट कोल्हापूर मध्ये गेले आणि घरी मेधा आणि तिचे आईवडील एवढेच राहिले. सतत कामात, नाटकाच्या तालमीत, प्रयोगात, मित्र मैत्रिणी मध्ये अडकलेली मेधा एकटी पडली. आई बरोबर गप्पा तरी किती मारणार. हेमंत तिला शूटिंग मधले फोटो पाठवत होता, त्यामुळे तिला शूटिंग ची प्रगती कळत होती.
खुप कंटाळवाणा काळ तिच्या आयुष्यात आला होता. वेळ जाता जाता जात नव्हता,रात्री झोप येत नव्हती, जेवणं जात नव्हते.
दीड महिण्यानंतर तिचे प्लास्टर काढले, मग फिजिओ सुरु झालं.
    मग एकदा अश्विन आणि हेमंत तिच्या घरी आले, आणि जे शॉट्स खुर्चीवर बसून आहेत, ते घेऊया अशी त्यानी विनंती केली आणि मग मेधा तिच्या आईवडीला सामावेत कोल्हापूर मध्ये आली.
पहिल्याच दिवशी तिचे शॉट्स तिची आई झालेली सुकन्या बरोबर होते. नाटकात काम करायची मेधाला सवय. तिला कॅमेरा समोर काम करायची सवय नव्हती पण सुकन्याने तिला कॅमेऱच्या समोर येण्याच्या टिप्स दिल्या आणि मग तिला जमले.
कोल्हापूर मध्ये सकाळी तिथे फिजिओ येऊन तिचे व्यायाम घेत होता, त्यामुळे हळूहळू ती चालू लागली.
आता तिचे भराभर शॉट्स ओके होऊ लागले. या असिडेन्ट च्या गडबडीत तिच्या लक्षात आले, अजून वसंतराव यांनी आपल्याशी करार केलेला नाही किंवा पैसे दिलेले नाहीत.
तिने तसें हेमंत कडे बोलताच दुसऱ्या दिवशी कराराचे कागद तिच्यापुढे आले आणि तिला पंधरा लाख देण्याचा करार झाला आणि पाच लाखाचा चेक तिला मिळाला.
    तिच्या समवेत असलेल्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी चेक बँकेत जमा केला.
मेधाचे बरेच शॉट्स सुकन्या आणि हेमंत बरोबर होते. अपघाता नंतर शबरी पांगळी होते, तेंव्हा नितीन तिला सांभाळतो, तिला मॉरल सपोर्ट करून पुन्हा तिला व्यवस्थित करतो, असा नाटकाचा आणि फिल्मचा विषय होता. हेमंत नितीनची भूमिका करत असल्याने, त्या दोघांची केमिस्ट्री उत्तम असल्याने मेधाचें नितीन म्हणजेच हेमंत बरोबरचे शॉट्स उत्तम व्हायचे.
    म्हणता म्हणता मेधाला कोल्हापूर मध्ये येऊन बावीस तेवीस दिवस झाले, तिची तब्येत पण आता बऱ्यापैकी सुधारली होती, आता ती व्यवस्थित चालत होती, तिला जेवणं जात होते आणि मुख्य म्हणजे अनेकजण आणि मुख्य म्हणजे तिचा प्रियकर हेमंत आजूबाजूला असल्याने तिची मनस्थिती पण उत्तम होती.
  आणि अचानक तिला ती भेटली...
कोल्हापूर मधील पर्ल हॉटेलवर मेधा तिच्या आई सह मुक्कामाला होती. तिची आई कधी स्टुडिओ मध्ये येई कधी नाही. त्या दिवशी तिची आई तिच्यासामवेत नव्हती. सायंकाळी सहा वाजता तीची गाडी हॉटेल जवळ आली, तेंव्हा एक अंदाजे साठ वर्षाची बाई तिची वाट पहात वेटिंग रूममध्ये बसून होती.  
काउंटर वरील मुलीने कोणीतरी बाई तुमची वाट पहात आहेत असे संगितल्यावर वेटिंग रूम मध्ये आली, तेंव्हा तिला पाहिल्यावर ती स्त्री उभी राहिली.
स्त्री -नमस्ते.
मेधा -नमस्ते, काय काम होत? कोण तुम्ही?
स्त्री -हो, मी शबरीची आई, खऱ्या शबरीची आई.
मेधा -काय?खरी शबरी?
स्त्री -तू जी नाटकात भूमिका करतेस आणि आता तुमचे शूटिंग सुरु आहें, ती गोष्ट शबरीची म्हणजे माझ्याच मुलीची.
मेधा -काय बोलताय तुम्ही? खरी शबरी आहें?
स्त्री -होय, खरी शबरी आहें, त्या जीवघेण्या वेदना गेली चार वर्षे सहन करतेय. त्या नाटकात तुम्ही दाखवले आहें, अपघातानंतर शबरी बरी होऊन तिला प्रियकर मिळतो म्हणून. पण खरी शबरी डॉक्टरचा खर्च झेपत नाही म्हणून अजून मरनप्राय वेदना सहन करतेय.
मेधा -पण ती आहें कुठे?
स्त्री याच कोल्हापूर मध्ये.तुम्हांला तिला भेटायचे असेल तर माझ्याबरोबर यावे लागेल. तुम्ही प्रत्यक्ष तिची परिस्थिती पहा.
मेधा -मला तिला भेटायचे आहें.
स्त्री -मग चला माझ्याबरोबर, येथून अर्ध्या तासाच्या अंतरावर माझे घर आहें. गाडी आहेना तुमची.
मेधा -हो, आहें ना. पण मी आईला फोन करुंन सांगते, थोडा वेळ होईल म्हणून.
मेधाने आईला फोन करून आपण बाहेर जात असून थोडा वेळ लागेल, ड्रायव्हर सोबत आहें, असे सांगून ती त्या स्त्री बरोबर बाहेर पडली.मेधा त्या बाई बरोबर गाडीत बसली. तिला वाटतं होत, हेमंत जो अजून सेट वर होता, त्याला कळवावे. ती त्या स्त्रीला म्हणाली 
"मला या नाटकाचा आणि फिल्म दिग्दर्शक हेमंत याला कळवावे लागेल.
स्त्री -त्याला माहित आहें सर्व.
मेधा एकदम आश्रयचकित झाली.
मेधा -त्याला माहित आहें? कस? त्याचा काय संबंध? मग मला कस माहित नाही.
ती स्त्री दाखवत होती, त्या रस्त्याने ड्रायव्हर गाडी चालवत होता. शेवटी उचगाव रस्त्यावर गाडी थांबली.
    त्या वसतीत छोटी छोटी घर होती. एका अशाच घरा समोर गाडी थांबली. ती स्त्री बाहेर पडली, तिच्या मागोमाग मेधा बाहेर पडली.त्या स्त्रीने दरवाजा उघडला आणि ती मेघाला म्हणाली 
"या, या आत '.
तिच्या मागोमाग मेधा घरात शिरली, तीन खोल्यांचं घर होतं. छोटा हॉल, लहान किचन आणि बंद असलेले बेडरूम. त्या बाईंनी बेडरूमचा दरवाजा उघडला, बेडवर एक अत्यन्त कृष मुलगी उताणी झोपलेली होती.
त्या बाईंनी तिला थोपटले आणि ती मेधाला म्हणाली 
"ही शबरी, माझी मुलगी '., त्यानी झोपलेल्या शबरीला जागे केले. त्या मुलीने डोळे उघडले. तिच्याकडे पहात त्या बाई म्हणाल्या 
"शबू, ही बघ मेधा, नाटकात आणि सिनेमांत तुझी भूमिका करणारी '
त्या मुलीने अत्यन्त कृश हात वर केले.
तिचा हात हातात घेत मेधा म्हणाली 
"काय झाले हिला?
"हे सर्व तुला सांगावे लागेल. तुमच्या नाटकाचा आणि फिल्मचा लेखक अश्विन हा माझा भाचा.
"काय? परत मेधा किंचाळली.
"होय, माझ्या मुंबईच्या बहिणीचा मुलगा. तो अधूनमधून माझ्याकडे यायचा. त्याचापेक्षा माझी मुलगी शबरी एका वर्षाने लहान. अकरावीत असताना सुट्टीत तो आला, पण येताना या वेळी त्याचा मित्र हेमंतला घेऊन आला '.
"कोण हेमंत? म्हणजे आमचा दिग्दर्शक?
"होय, तोच हेमंत. मी येथील एका हॉस्पिटल मध्ये नर्स होते. माझे यजमान स्कुटर अपघातात शबू लहान असताना वारले, मी तिला वाढवले.
हेमंत आणि शबू हे जवळ येत होते, हे माझ्या लक्षात येत होते. तसे मी अश्विन आणि शबू दोघांनाही बजावले होते. पण अश्विन मला म्हणाला, हेमंत हा एका सज्जन कुटुंबातील मुलगा आहें आणि चांगला कलाकार आहें, तू काळजी करू नकोस.
त्यानंन्तर पुढील वर्षातील सुट्टीत सुद्धा अश्विन आणि हेमंत आले, या वेळी मुंबई हुन मोटर सायकल घेऊन आले. मी कामावर गेले की ही तिघ गाडीवरून फिरायची. स्विमिंगला जायची, सिनेमा पाहायची.
    एक दिवशी हेमंत आणि शबू दोघेच स्विमिंग ला जाताना यांच्या मोटर सायकल ला ट्रकने उडवले. हेमंत रस्त्यावर पडला, त्याला फारसे लागले नाही पण शबरी जोराने फुटपाथ वर पडली, तिची शुद्ध गेली. मला ड्युटीवर असताना फोन आला, मी धावले. तिला सिव्हिल मध्ये आणि मग खाजगी हॉस्पिटल मध्ये ठेवले. तिचे हात पाय मोडले होते, त्यांना प्लास्टर घालून बरे केले पण तिचे मजरज्जू पूर्ण चेचून गेले आहेत. कंबरेची हाडे मोडली आहेत.
ही मोठी महागडी ट्रीटमेंट आहें. अशा प्रकारे ऑपरेशन्स करणारे मोजके डॉक्टर्स आहेत. मुंबई मधील कोकिळाबेन हॉस्पिटल आणि जसलोग मधेच या सोयी आहेत. याचा खर्च चार वर्षा पूर्वी वीस लाख सांगितलं होता, आता अजून वाढला असेल.
मी हात जोडून अनेक नातेवाईक, ओळखीचे यांना विनंती केली, पण सर्वांनी कसेबसे तीन लाख जमवून दिले. ते बँकेत ठेवले आहेत, अजून मोठी रक्कम जमवायची आहें, पण कशी?
गेली चार वर्षे मी नोकरीवर न जाता हिला सांभाळते आहें.
ही सर्व हकीगत ऐकून मेधा आश्रयचकित झाली होती. तिने शबरीचा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला होता. मग मेघा म्हणाली 
"अश्विन आणि हेमंत यांना हे सर्व माहित होतं, मग त्यानी काय केल
"काहीच केल नाही मात्र याच घटने प्रमाणे अश्विन जो लेखन करत होता, त्याने एकांकिका लिहिली, ज्यात तू शबरी चें काम केलंस '.
"कमाल वाटते मला म्हणजे त्यानी एकांकिका सुद्धा "शबरी 'याच नावाने लिहिली, मग नाटक, मग सिनेमा '.
  "हो, पण तू काम केलंस त्या नाटकात शबरी त्या मित्राच्या प्रेमाने आणि डॉक्टर उपयांनी बरी होते, असे दाखवले आणि नाटकाचा शेवट गोड केला पण इथे काय परिस्थिती आहें तू पाहिलीस '.
"पण काकी, अश्विन तुमचा भाचा आणि हेमंत इथे येणारा शिवाय शबरीवर प्रेम केलेला, त्यानी काय केले नंतर?
"दुर्दैव माझे आणि शबरीचे, त्या अपघातनंतर ते मुंबई ला गेले ते गेल्या चार वर्षात पुन्हा इकडे फिरकले नाहीत.,,'
पण तुम्ही फोन नाही करत त्यांना?
  "नेहेमीच करते, मला माहित आहें आता दोघाकडे पैसे आहेत पण ते दाद देत नाहीत, आता तुझ्यासमोर फोन लावू का?
"हो लावा पण स्पीकर मोठा ठेवा म्हणजे मला ऐकता येईल '.
शबरीच्या आईने हेमंतला फोन लावला. बराच वेळ रिंग वाजल्यावर त्याने फोन घेतला, फोन स्पीकर वर असल्याने मेधाला ऐकू येत होते.
"अरे हेमंत, पैशाची व्यवस्था होईल काय रे?
तिकडून हेमंत बोलत होता, त्याचा आवाज तिने ओळखला.
"कुठे काय, नुकतीच शूटिंग सुरु झाली, पैसे नाहीत म्हणून काम बंद आहें. त्यात ती नटी मेघा पैसे मागत असते म्हणून वसंतरावांनी काम बंद ठेवलाय '
अस म्हणून हेमंतने फोन खाली ठेवला. मेधा संतापाने थरथरत होती. तिचा होणारा नवरा आणि प्रियकर तिला खोटं पाडत होता. तिने शबरीचा हात हातात घेतला आणि तिच्या आईला सांगितलं 
"काकी, मी तुम्हांला शब्द देते. या शबरीला मुंबई मध्ये नेऊन तिच्यावर उपचार करण्याची जबाबदारी माझी. तुम्ही काळजी करू नका, या खऱ्या शबरीच्या मागे ही नाटकातील शबरी कशी उभी रहाते बघाच '.
मेधा बाहेर पडली, बाहेर पडता पडता तिने पर्स मधील होत्या तेवढ्या नोटा काढून त्याच्या हातात कोंबलंय आणि ती गाडीत जाऊन बसली.
मेधा हॉटेल वर परातली, तिने आपल्या आईला सर्व वृत्तांत सांगितलं, तिची आई पण अश्विन आणि हेमंत चें रूप पाहून आश्चर्यचकित झाली.
    दुसऱ्या दिवशी मेधा सेटवर गेली. गेल्या गेल्या तिने मेकअप करायला नकार दिला आणि हेमंतला फोन करून बोलावले. हेमंत तिच्या रूममध्ये घुसताना "डार्लिंग 'म्हणणं जवळ येत होता. तिने त्याला झिडकारले आणि प्रश्नांची सरबत्ती चालू केली.
"ही शबरी कथा कुणा वरुन सुचली?खरी शबरी आहें का जिवंत?
हेमंतला ही आज अस काय बोलते, हे कळेना.
"छे, अशी कोण शबरी नाही, अश्विनने काल्पनिक नाटक लिहिले, त्यात खरं काही नाही '.
"मग या गावातील अंबाई टॅंक जाताना कुणाचा असिसिडेन्ट झाला होता?
हेमंत दचकला. हिला ही बातमी कशी हे त्याला कळेना.
तो त त प करू लागला.
"हेमंत, मी काल शबरीला भेटून आले. काल तिच्या आईने तुला शबरीच्या उपचारासाठी फोन केलेला ना, तेंव्हा मी तेथे होते. शबरीची अशी अवस्था कुणामुळे झाली हे मला कळले. मी निर्मात्याकडे एकसारखी पैसे मागत असते, हे तिला सांगताना, मी तेथे होते.'
हेमंत लटपटू लागला. त्या AC मध्ये त्याला घाम फुटला.
"हेमंत, मी शबरीला पुन्हा उभी करणार आहें, तसा तिच्या आईला मी शब्द दिलंय, मला पंचवीस लाख रुपये जमा करायचे आहेत लवकरात लवकर. निर्मत्याने दिलेले पाच लाख रुपये माझ्या बँकेत आहेत. बाकीचे दहा लाख मला दोन दिवसात हवेत तरच मी पुढील शूटिंग करेन. अजून दहा लाख कमी आहेत.
जिच्या कथेवर आणि तेंच नाव वापरून तू आणि अश्विनने एवढा पैसा आणि नाव मिळविलात, ते तुम्ही दोघे आणि तुमचे निर्माते वसंतराव पैसे देता की नाही, ते पण मला आज दुपारपर्यत सांगा, नाहीतर पत्रकार परिषध बोलावून मी त्याना खऱ्या शबरीची भेट घालून देते. तू जा येथून.
दुपारपर्यत मला कळायला हवे '.
   घाम पुसत हेमंत बाहेर पडला आणि अश्विनकडे धावला, ते दोघे मग निर्माते वसंतरावाकडे गेले. दुपारी वसंतरावांनी तिचे राहिलेले दहा आणि हेमंत, अश्विन कडून दहा लाख मिळून वीस लाख जमा केले.
त्याच रात्री मेधाने शबरी वर उपचार केलेल्या कोल्हापूर मधील डॉक्टरना भेटून कोकिळाबेन हॉस्पिटल मध्ये शबरीची अपॉइंटमेंट ठरवली.
    शूटिंग बंद होते, जो पर्यत शबरीवर उपचार सुरु होतं नाही, तोपर्यत मी मेकअप करणार नाही, हे तिने वसंतरावना सांगितले होते.
   तीन दिवसांनी स्पेशल ऍम्ब्युलन्स घेऊन शबरी, शबरीची आई आणि मेधा मुंबई कडे निघाली.
हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून मेधा कोल्हापूर मध्ये आली आणि तिने शूटिंग सुरु केले. ऑपरेशनच्या दिवशी ती पुन्हा संपूर्ण दिवस हॉस्पिटल मध्ये होती,
डॉक्टरनी ऑपरेशन व्यवस्थित झाले असून पंधरा दिवसानंतर तिला डिस्चाज मिळेल मग फिजिओ कडून दोन महिने ट्रीटमेंट घ्या, चार महिन्यात ती हिंडूफिरू लागेल असा विश्वास व्यक्त केला.
"शबरी 'सिनेमा पुरा झाला. मेधा आणि तिची आई मुंबईत आल्या, मेधाने शबरीला आणि तिच्या आईला पण आपल्यासोबत आणले.
शबरी सिनेमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या सिनेमाची हिंदी आणि तामिळ मध्ये आवृत्ती निघण्याच्या तयारी सुरु झाल्या. सर्वाना शबरी साठी मेधा हवी होती. मेधा बरोबर कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट केली गेली. मेधा आंनदात होती.
तिने तिच्या आयुष्यातून हेमंतला हाकलून लावले.
फिल्मफार पुरस्कार साठी "शबरी 'ची निवड झाली. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाताना तिने शबरीच्या हातात हात घेऊन तिच्यासामवेत पुरस्कार स्वीकारला. त्या वेळी ती म्हणाली 
"माझा रस्त्यावर अपघात झाला आणि मी दोन महिने घरात वेदना सहन करत बसले. त्या वेदना आणि तो काल मला  असह्य झाला, पण जिच्या खऱ्या घडलेलंय आयुष्यात जिची काही चूक नसताना चार वर्षे जी वेदना सहन करत राहिली, ती ही शबरी. ही शबरी हीच खरी फिल्मफारे विजेती आहें, मी नाही.'
त्या तुटुंब भरलेलंय हॉल मध्ये त्या टाळ्या वाजत राहिल्या.. वाजत राहिल्या.

 प्रदीप केळुस्कर 9422381299 / 9307521152

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...