तीच होती ती...
इतक्या वर्षांनंतरही सहज ओळखणेबल.
फार नाही बदलली...
0%.
तशीच काॅन्फीडन्ट, ग्रेसफुल, डिसेन्ट.
स्लीम ट्रीम.
आता अजूनच मॅच्युअर्ड वाटत होती.
केसांचा बाॅबकट.
त्यातून डोकावणारी एखादी रूपेरी बट.
जीन्स, फ्लोरल टाॅप.
सगळं तिला शोभून दिसणारं…
सोबत एक काॅलेजियन मुलगी.
तिचीच वाटत होती.
एअरपोर्टवर दोघी एकदम पुढ्यातच आल्या.
तिच्या डोळ्यांनी सहज ओळख दाखवली.
तिनं अगदी हात हातात घेऊन चौकशी केली.
काॅलेजचे दिवस रिवाईंड करून झाले.
हसून टाळ्यांचे झेंडे फडकावून झाले.
मुलं किती?
बायको, नवरा, नोकरी, घर…
सगळ्या चौकश्या करून झाल्या.
“काॅफी घेवूयात?”
लाऊंजमधे काॅफी घेताघेता पुन्हा गप्पा.
तिच्या लेकीचं कौतुक वाटलं.
ईअरफोनचं कानातलं तिनं काढून ठेवलेलं.
आमच्या गप्पा मनापासून एन्जाॅय करत होती.
मधेच हसून दादही दिली.
जुनी ओळख नव्यानं पटावी तसं झालेलं.
“काका, तू आवडलास मला…
नक्की भेटू पुन्हा.”
“माझी लेकही अशीच आहे…
तुमच्या दोघींचं छान ट्यूनिंग जमेल!”
जाताना तिच्या लेकीचं डोकं हलकेच कुरवाळलं.
ती गोड हसली.
वेळ संपत आलेली.
एक तास शून्य मिनटात संपून गेलेला.
सेल नं. ची देवाणघेवाण.
जाताना तिनं हलकेच कवेत घेऊन डिसेंट थोपटलं.
“भेटू पुन्हा…”
“ठरवून…”
“नक्की!”
खोटं कशाला सांगू?
ईनफानाईट गुदगुल्या झाल्या.
अगदी हार्टपर्यंत पोचल्या.
रात्री दोन वाजता घरी पोचलो.
का कुणास ठाऊक?
कसंसंच वाटत होतं.
बहुतेक गिल्टी.
बायकोनं दरवाजा उघडला.
माझा उघडा चेहरा घडाघडा वाचला.
ती खुदूक हसली.
अजूनही…
ही हसली की जाम भारी दिसते!
“तू फ्रेश हो…
छान काॅफी टाकते.”
हातांचा टी करून त्यावर मान टेकवून,
मी डायनिंग टेबलपाशी बसलो.
काॅफीचा वाफाळता मग पुढ्यात ठेवून ती म्हणाली.
“बोल आता…”
मी सगळं सांगून टाकलं.
काॅलेजातली मज्जाही.
मित्रांबरोबर लागलेली पैज.
“माझ्याबरोबर काॅफी यायला येशील?”
मी तिला भीत भीत विचारलेलं.
“चल…”
ती सहज हो म्हणालेली.
“पुढे काय…?”
तिनंच विचारलं.
“मित्रांनी फोर्स केलं म्हणून
की तुलाच यायचं होतं?”
मी गप्प.
ती मनापासून हसली.
‘जसा आहेस तसाच रहा…
करिअरकडे लक्ष दे!’
बस…
पुढं काहीच नाही…
काॅफीचं बिलही तिनंच दिलं.
आईशप्पथ!
त्यानंतर एकदम ही आजची काॅफी…”
शुभमन् गीलने लगातार सिक्सर माराव्यात
तसं झालेलं…
ही पुन्हा एकदा मनापासून हसली.
माझ्या नाकाचा शेंडा
हलकेच कुरवाळत म्हणाली…
“ओळख…
तिला आणि स्वतःलाही!
_किती डिसेंन्टली तिनं तुला ‘नाही’ म्हटलं,
आणि मित्र म्हणून जवळ केलं…
तुला तिची ओळख पटलेलीच नाहीये अजून!
‘पटली नाही’च्या काॅम्प्लेक्समधनं
बाहेर या आता…
छान मैत्रीण मिळालीय नशिबानं!
“खरं सांग?
तिचा नंबर डिलीटलास ना?”
मी जीभ चावली.
बायको ओळखून आहे मला.
एकदम आठवलं…
तिच्या लेकीला माझ्या लेकीचा नंबर
शेअर केलाय मी…
झालं तर मग!
पुण्यात आली तर नक्की भेटेल!
तुला अन् मलाही...
मला बायकोचं जाम कौतुक वाटाया लागलं..
माझ्या परीनं मी गोड हसून बघितलं..
अन् समोरची पंचेचाळीशीतली अल्लड परी,
एकदम खिदळायला लागली...
ओळख पटली !
— कौस्तुभ केळकर नगरवाला
इतक्या वर्षांनंतरही सहज ओळखणेबल.
फार नाही बदलली...
0%.
तशीच काॅन्फीडन्ट, ग्रेसफुल, डिसेन्ट.
स्लीम ट्रीम.
आता अजूनच मॅच्युअर्ड वाटत होती.
केसांचा बाॅबकट.
त्यातून डोकावणारी एखादी रूपेरी बट.
जीन्स, फ्लोरल टाॅप.
सगळं तिला शोभून दिसणारं…
सोबत एक काॅलेजियन मुलगी.
तिचीच वाटत होती.
एअरपोर्टवर दोघी एकदम पुढ्यातच आल्या.
तिच्या डोळ्यांनी सहज ओळख दाखवली.
तिनं अगदी हात हातात घेऊन चौकशी केली.
काॅलेजचे दिवस रिवाईंड करून झाले.
हसून टाळ्यांचे झेंडे फडकावून झाले.
मुलं किती?
बायको, नवरा, नोकरी, घर…
सगळ्या चौकश्या करून झाल्या.
“काॅफी घेवूयात?”
लाऊंजमधे काॅफी घेताघेता पुन्हा गप्पा.
तिच्या लेकीचं कौतुक वाटलं.
ईअरफोनचं कानातलं तिनं काढून ठेवलेलं.
आमच्या गप्पा मनापासून एन्जाॅय करत होती.
मधेच हसून दादही दिली.
जुनी ओळख नव्यानं पटावी तसं झालेलं.
“काका, तू आवडलास मला…
नक्की भेटू पुन्हा.”
“माझी लेकही अशीच आहे…
तुमच्या दोघींचं छान ट्यूनिंग जमेल!”
जाताना तिच्या लेकीचं डोकं हलकेच कुरवाळलं.
ती गोड हसली.
वेळ संपत आलेली.
एक तास शून्य मिनटात संपून गेलेला.
सेल नं. ची देवाणघेवाण.
जाताना तिनं हलकेच कवेत घेऊन डिसेंट थोपटलं.
“भेटू पुन्हा…”
“ठरवून…”
“नक्की!”
खोटं कशाला सांगू?
ईनफानाईट गुदगुल्या झाल्या.
अगदी हार्टपर्यंत पोचल्या.
रात्री दोन वाजता घरी पोचलो.
का कुणास ठाऊक?
कसंसंच वाटत होतं.
बहुतेक गिल्टी.
बायकोनं दरवाजा उघडला.
माझा उघडा चेहरा घडाघडा वाचला.
ती खुदूक हसली.
अजूनही…
ही हसली की जाम भारी दिसते!
“तू फ्रेश हो…
छान काॅफी टाकते.”
हातांचा टी करून त्यावर मान टेकवून,
मी डायनिंग टेबलपाशी बसलो.
काॅफीचा वाफाळता मग पुढ्यात ठेवून ती म्हणाली.
“बोल आता…”
मी सगळं सांगून टाकलं.
काॅलेजातली मज्जाही.
मित्रांबरोबर लागलेली पैज.
“माझ्याबरोबर काॅफी यायला येशील?”
मी तिला भीत भीत विचारलेलं.
“चल…”
ती सहज हो म्हणालेली.
“पुढे काय…?”
तिनंच विचारलं.
“मित्रांनी फोर्स केलं म्हणून
की तुलाच यायचं होतं?”
मी गप्प.
ती मनापासून हसली.
‘जसा आहेस तसाच रहा…
करिअरकडे लक्ष दे!’
बस…
पुढं काहीच नाही…
काॅफीचं बिलही तिनंच दिलं.
आईशप्पथ!
त्यानंतर एकदम ही आजची काॅफी…”
शुभमन् गीलने लगातार सिक्सर माराव्यात
तसं झालेलं…
ही पुन्हा एकदा मनापासून हसली.
माझ्या नाकाचा शेंडा
हलकेच कुरवाळत म्हणाली…
“ओळख…
तिला आणि स्वतःलाही!
_किती डिसेंन्टली तिनं तुला ‘नाही’ म्हटलं,
आणि मित्र म्हणून जवळ केलं…
तुला तिची ओळख पटलेलीच नाहीये अजून!
‘पटली नाही’च्या काॅम्प्लेक्समधनं
बाहेर या आता…
छान मैत्रीण मिळालीय नशिबानं!
“खरं सांग?
तिचा नंबर डिलीटलास ना?”
मी जीभ चावली.
बायको ओळखून आहे मला.
एकदम आठवलं…
तिच्या लेकीला माझ्या लेकीचा नंबर
शेअर केलाय मी…
झालं तर मग!
पुण्यात आली तर नक्की भेटेल!
तुला अन् मलाही...
मला बायकोचं जाम कौतुक वाटाया लागलं..
माझ्या परीनं मी गोड हसून बघितलं..
अन् समोरची पंचेचाळीशीतली अल्लड परी,
एकदम खिदळायला लागली...
ओळख पटली !
— कौस्तुभ केळकर नगरवाला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा