मुग्धा आणि अनिकेत, एक सुंदर जोडप, जेमतेम गद्देपंचवीशीत असलेले हे दोघे कुठल्याश्या आईटी कंपनीत नोकारीला होते. नुकताच ब्लॉक बुक केलेला आणि घर ताब्यात आले की पिल्लूच प्लानिंग करु असा मान्य झालेला ठराव. तारुण्य म्हणजे माणसाच्या आयुष्यतला म्हंटल तर सर्वोत्तम काळ आणि म्हंटल तर सर्वाधीक कष्टाचा काळ. दोघेही प्रेमात आकंठ बुडालेले आणि कष्टात देखील. तिशी पार करायच्या आधी घर, गाडी वगरे समाजात प्रतिष्ठा देणाऱ्या भौतिक गोष्टी त्यांना हव्या होत्या. तसेही दोघांवर विशेष अश्या काही जावाबदाऱ्या ही नव्हत्या. अनिकेत चे वडील रिटायर झालेले, योग्य पूंजी साठवलेली तर मुग्धा आईबापाची एकुलती एक लेक. त्यांचेही सगळ वेल प्लांड.
-पुढील फेब मध्ये मिळेल का ब्लॉक ताब्यात
-यस सर, तुमचा पुढचा वैलेंटाइन्स डे नक्की नव्या घरात होणार
-धन्यवाद, आता उरलेले पाच टक्के ताबा देतांना न ?
-यस सर
-चला येतो आम्ही,
-बाय सर
घर ताब्यात मिळणार याचा मध्यमवर्गीय माणासला किती आंनद होतो नाही, दोघेही खुश होते आज. बरोबर दहा फेबला अनिकेतचा फोन वाजला,
-नमस्कार अनिकेत साहेब, मी बोलतो आहे
-बोला साहेब, काय म्हणता आहात
-सर, तुमचा फ्लैट रेड़ी आहे, आज म्हंटल तर आज ताबा देतो.
-धन्यवाद देवा, आत्ता मुग्धाला बोलतो आणि तुम्हाला फोन करतो
-सर, ते उरलेले पाच टक्के
-चिंता नका करु देवा, पैसे रेड़ी आहेत
-धन्यवाद, हैव अ नाईस डे
अनिकेतला प्रचंड आंनद झालेला, डेस्कवर असलेल्या बाप्पाला नमस्कार करत त्यानी मुग्धाला फोन लावला
-आजकल पाव जमीपर नहीं पड़ते मेरे
-आवारा स्वतःला, ऑफिसमध्ये आहेस न तू , काय झाल एवढं
-आपला ब्लॉक रेड़ी झाला, ताबा घ्या म्हणाले
-क्या बात है,
-कधी घेवुया ताबा
-कधी काय, आत्ता, लगेच, तू घे सुट्टी आणि मी पण घेत, अरे पण चेक बुक घरीच आहे यार
-फिकर नॉट मैडम, दोन कोरे चेक नेहमीच असतात माझ्या खीश्यात
-चल मग भेट गेट नंबर 2 ला, विस मिनिटांत
-यस डिअर, बाय
छान छोटेसे तोरण, दारासमोर रांगोळी आणि सत्यनारायण. आई बाप आणि बाप्पाचे आशीर्वाद घेवून दोघेही नव्या घरात राहायला आले. सगळच नवीन. बघता बघता रूटीन लागल आणि दोघांना आता दोघात हवा हवा असलेला तीसरा हवा होता. इथेही अनिकेतनी परफॉरमेंस मध्ये बाजी मारली. मार्च एन्डचा प्रेशर सोमवार, दुपारी एकला आलेला मुग्धाचा फोन कट करत अनिकेत क्लाइंट कॉल वर बोलला.
-अग क्लाइंट होता सटकलेला, बोल काय म्हणतेस
-We are pregnant dear
-क्या बात है, क्या बात है आणि कधी कळाले तुला हे
-मुर्ख माणूस, तारखा असतात का तुझ्या लक्षात.
- सो सॉरी डिअर, पण आज सेलिब्रेशन तो बनता है,
-Yesss, भेटु संध्याकाळी, गेट नंबर 2
जोरदार सेलिब्रेशन नंतर दिवस कसे गेले हे दोघांनाही कळालेच नाही, योग्य वेळेत एक सुंदर कळीनी वेलावर जन्म घेतला आणि अख्ख घर आनंदात नाहुन निघाले. दोन्ही आजी आबू आणि आईबाबाच्या प्रेमात कळी हळूहळू मोठी होत होती. मित्र, क्रिकेट,कट्टा अश्या गोष्टी अनिकेतच्या आयुष्यातुन कमी होत गेल्या. मुग्धाच तर विश्वच सीमीत झाल. दिवस भराभर जात होते. मुलीनी दोन्ही पेरेंट्सच बेस्ट उचलल होत.
आज कधी नव्हे ते अनिकेत दोन चार लावून आलेला. शांत पणे कपळाला हात लावून बसलेला अनिकेत मुग्धाला चटकाच देवून गेला. पण त्याला आंघोळीला पाठवत तीनी जेवणाची तयारी केली. अस का ला असेल हां विचार मुग्धाच्या मनात. आंघोळ करुन ज़रा होश मध्ये आलेल्या अनिकेतनी शांतपणे जेवण केले आणि गैलरीत जावुन बसला. अनिकेतची बैग उचलतांना मुग्धाला एक ट्रॉफी दिसली, बेस्ट परफ़ॉर्मरच ते बक्षीस होत.
-अरे वाह याची पार्टी झाली तर, मला पण बोलवायचे न रे, एक दोन ड्रिंकला नाही म्हंटल नसत मी
-हम्म्म, ये आवारुन, बोलायचे आहे तुझ्याशी
-ओके
-बोल रे
-आठवत तुला, मी अण्णांची ट्रंक आणली होती
-हो, आठवत न
-त्यात मला एक पत्र सापडले
-कोणाचे रे
-त्यांनी माझ्या आजोबांना लिहिलेले
-ओके, काही ख़ास त्यात
-ख़ास आहेच, मी त्यांचा मुलगा नाहीच आहे, कोणीतरी बाई मला साडीत गुंडाळून मंदिराच्या पायऱ्यांवर सोडुन गेली होती. ते मला घेवून आले,कोण आहे मी, कुठून आलो मी, एका कागदानी मला पार पुसून टाकले. एका क्षणात मी शून्य झालो आणि आता मी कळत नकळत तुलाही फसवल अस मला वाटू लागले आहे.दोन क्षणासाठी का होइना मुग्धा पण पार हादरली होती पण लगेच स्वतःला आणि अनिकेतला सावरत मुग्धा म्हणाली,
-आता झोपु या आपण, सकाळी बोलू, एक मात्र मी निश्चित सांगते की माझ तुझ्यावर असलेले प्रेम मात्र तसुभरही कमी होणार नाही
मुग्धाच्या कुशीत हमसुन हमसुन रडलेला अनिकेत कधी झोपला हे त्याला देखील कळले नाही.
सकाळ झाली, थोडासा सावरलेला अनिकेत परत गैलरीत जावुन बसला
-अनिकेत हां घे दूसरा चहा आणि चल आंघोळीला जा
-आज मूड नाही
-का
-काल काय बोललो मी तुला
-त्यानी काय फरक पडेल अनिकेत,
-आईनी तरी मला सांगायला हवे होते
-का, कुठे कमी पडली ती माउली.
-कुठेच नाही, जीव होता माझ्यात तीचा, अग अनी,अनी अस जप करत जीव सोडला तीनी
-मग
-पण तरीही
-आता आंघोळ कर पटापट, बॉसचा फोन येवून गेला आहे सकाळीच, नाष्टयाला बोलू परत आंघोळ करुन आलेला अनिकेतच लक्ष कशात नाही आहे हे मुग्धाच्या ध्यानी आले.
-अरे अनिकेत काय विचार करतो आहेस
-काय मजबूरी असेल ग तीची, की तीनी एका नवजात अर्भकाला मंदिराच्या पायरीवर सोडल
-ऐक राजा, कोणतीही आई आपल्या लेकारासाठी योग्य तोच निर्णय घेते, कधीही
-यात योग्य काय
-विचार कर, तीनी कमीत कमी साडी तर गुंडाळली, नंगे तर नाही सोडले तुला, कचऱ्याच्या डब्यात तर नाही टाकले किंवा गटारात. तू अनिकेत आहेस आई अण्णांचा बाकी कोणी नाही राजा. काढून टाक ते सगळे विचार आणि पुढे हो.
थोड्यावेळ शांतपणे विचार केल्यावर अनिकेत उठला आणि मुग्धाचे हात हातात धरून म्हणाला कुठून येते एवढी शक्ति तुम्हा स्त्रियात.
-खर सांगू अनिकेत, मला स्वतःला याचे उत्तर माहीत नाही. कदाचीत शाररिक दृष्टया आम्ही थोड़े कमी असतो तुमच्या पेक्षा म्हणून परमेश्वरानी मन जास्त कणखर दिले असेल आम्हाला, विसर सगळे आणि कामाला जा. आणि एक सांगते, तुला अस काही पत्र मिळाले आहे हे अण्णांना सांगू नकोस, कदाचीत हे सत्य तुला कळले आहे हे सत्य त्यांना या वयात झेपणार नाही. त्यांना अतिशय अभिमान आहे तुझा, तो तसाच राहु दे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा